Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 22
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - प्रथतामितिपर्य्यन्तस्य यज्ञो देवता । अन्त्यस्याग्निवितारौ देवते छन्दः - भुरिक् त्रिष्टुप्,गायत्री, स्वरः - षड्जः
    7

    जन॑यत्यै त्वा॒ संयौ॑मी॒दम॒ग्नेरि॒दम॒ग्नीषोम॑योरि॒षे त्वा॑ घ॒र्मोऽसि वि॒श्वायु॑रु॒रुप्र॑थाऽउ॒रु प्र॑थस्वो॒रु ते॑ य॒ज्ञप॑तिः प्रथताम॒ग्निष्टे॒ त्वचं॒ मा हि॑ꣳसीद् दे॒वस्त्वा॑ सवि॒ता श्र॑पयतु॒ वर्षि॒ष्ठेऽधि॒ नाके॑॥ २२॥

    स्वर सहित पद पाठ

    जन॑यत्यै। त्वा॒। सम्। यौ॒मि॒। इ॒दम्। अ॒ग्नेः। इ॒दम्। अ॒ग्नीषोम॑योः। इ॒षे। त्वा॒। घ॒र्मः। अ॒सि॒। वि॒श्वायु॒रिति॑ वि॒श्वऽआ॑युः। उ॒रुप्र॑था॒ इत्यु॒रुऽप्र॑थाः। उ॒रु। प्र॒थ॒स्व॒। उ॒रु। ते॒। य॒ज्ञप॑ति॒रिति॑ य॒ज्ञऽप॑तिः। प्र॒थ॒ता॒म्। अ॒ग्निः। ते॒। त्वच॑म्। मा। हि॒ꣳसी॒त्। दे॒वः। त्वा॒। स॒वि॒ता। श्र॒प॒य॒तु॒। वर्षि॑ष्ठे। अधि॑। नाके॑ ॥२२॥


    स्वर रहित मन्त्र

    जनयत्यै त्वा संयौमीदमग्नेरिदमग्नीषोमयोरिषे त्वा घर्मासि विश्वायुरुरुप्रथाऽउरु प्रथस्वोरु ते यज्ञपतिः प्रथतामग्निष्टे त्वचम्मा हिँसीद्देवस्त्वा सविता श्रपयतु वर्षिष्ठेधि नाके ॥


    स्वर रहित पद पाठ

    जनयत्यै। त्वा। सम्। यौमि। इदम्। अग्नेः। इदम्। अग्नीषोमयोः। इषे। त्वा। घर्मः। असि। विश्वायुरिति विश्वऽआयुः। उरुप्रथा इत्युरुऽप्रथाः। उरु। प्रथस्व। उरु। ते। यज्ञपतिरिति यज्ञऽपतिः। प्रथताम्। अग्निः। ते। त्वचम्। मा। हिꣳसीत्। देवः। त्वा। सविता। श्रपयतु। वर्षिष्ठे। अधि। नाके॥२२॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 22
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे मी (जनयत्त्ये) सर्वसुख देणार्‍या राज्यलक्ष्मीसाठी (त्वा) त्या यज्ञाच्या (संयीमि) अग्नीमधे पदार्थ टाकून यज्ञाची सिद्धता करतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील अग्नीच्या संयोगाने कार्यांची सिद्धी करा. आम्ही संस्कारित केलेला हवि (अग्नेः) अग्नीमध्ये टाकतो (इदं) तो प्रसृत होऊन (अग्निषोमयोः) अग्नी आणि सोम यांच्या पर्यंत पोहचतो आणि (इषे) अन्नआदी पदार्थांना उत्पन्न करतो. अशा प्रकारचा यज्ञ (विश्‍वायुः) पूर्ण आयु देणारा आणि (अरूप्रण्याः) अतिशय सुख देणारा होतो. मी या यज्ञाचा अनेक प्रकारे प्रसार किंवा विस्तार करतो. याप्रमाणे तुम्ही देखील या यज्ञात (उरु प्रथस्व) पुष्कळ प्रसार व विस्तार करा. अशा प्रकारे यज्ञाचे अनुष्ठान करणार्‍या (ते) तुमच्यासाठी (यज्ञपतिः) यज्ञाचा स्वामी (अग्निः) हा यज्ञीय अग्नी तसेच (ते) तुमच्यासाठी, (सविता) तो अंतर्यामी (देवः) जगदीश्‍वर (उरु प्रथताम्) अनेक प्रकारे सुखांची वृद्धी करोत. (मा हिंसीत्) तुमचा कधीही नाश किंवा हानी न कराल. परमेश्‍वर (वर्षिष्टे) अत्यंत वृद्धीस पावलेल्या (अधिनाके) अशा अत्युत्तम सुखाशी (त्वा) तुम्हांस (श्रपयतु) सहजपणे संयुक्त करो. हा या मंत्राचा पहिला अर्थ झाला.^आतां दुसरा अर्थ सांगत आहोत-हे मनुष्यांनो, जाणून घ्या की हा (विश्‍वायुः) पूर्ण आयु देणारा आणि (उरुप्रथाः) अत्यंत सुखकारक असा (घर्मः) यज्ञ (असि) आहे. (त्वा) त्या यज्ञाचे मी (जनयत्यै) राज्य लक्ष्मीच्या प्राप्तीकरिता आणि (इषे) अन्न आदी पदार्थांच्या उत्पत्तिकरिता (संयौमि) उपयोग करीत आहे. तसेच त्या कार्याच्या सिद्दीकरिता (इदं) या (अग्नेः) अग्नीमधे (इदं) या (अग्नीषोमयायोः) अग्नी आणि सोम यांच्याद्वारे संस्कारित हवीची यज्ञात आहुती देतो. या प्रमाणे तुम्ही देखील त्या यज्ञाचा (उरु प्रथस्व) विस्तार करीत जा. (नित्य यज्ञ करा) ज्यायोगे हा (अग्निः) भौतिक अग्नी (ते) तुमच्या (त्वचं) शरीरास (मा हिंसीत्) रोगादीद्वारे नष्ट करू शकणार नाही. (यज्ञाग्नीमुळे रोग शरीराची हानी करणार नाहीत) नाही तसेच (देवः) ज्याप्रमाणे जगदीश्‍वर (सविता) अंतर्यामी परमेश्‍वर (वर्षिष्ठ) अत्यंत वृद्धिंगत झालेल्या अशा (अधिनाके) अत्युत्तम सुखाची (त्वा) त्या यज्ञाच्या अग्नीमधे परिपक्वता स्थापन करतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील त्या यज्ञाला (श्रपयतु) परिपक्व करा. (ते) तुमच्या (यज्ञपति) यज्ञाचा स्वामी असा देखील त्या यज्ञाचा (उरुप्रथताम्) विस्तार करोत. ॥22॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात लुप्तोपमालंकाराचा उपयोग केला आहे. सर्व माणसांनी यज्ञ अवश्य केला पाहिजे, कारण की तो समस्त लक्ष्मी, संपूर्ण आयुष्य, अन्न आदी पदार्थ देणारा आहे, रोगांचा नाश करणारा आहे आणि सुखांचा विस्तार करणारा आहे. अशा परमलाभकारी यज्ञाचा कधीही त्याग करू नये. कारण की यज्ञाविना वायु आणि वृष्टि जलाची शुद्धता व ओषधींची वृद्धी होणे अशक्य आहे. शुद्धता नसेल तर कोणाही प्राण्याला चांगल्या प्रकारे सुख मिळणार नाही. ईश्‍वराने याच दृष्टीने सर्व माणसांना यज्ञ करण्याचा आदेश दिला आहे. ॥22॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top