Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 4
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - विष्णुर्देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    सा वि॒श्वायुः॒ सा वि॒श्वक॑र्मा॒ सा वि॒श्वधा॑याः। इन्द्र॑स्य त्वा भा॒गꣳ सोमे॒नात॑नच्मि॒ विष्णो॑ ह॒व्यꣳर॑क्ष॥४॥

    स्वर सहित पद पाठ

    सा। वि॒श्वायु॒रिति॑ वि॒श्वऽआ॑युः। सा। वि॒श्वक॒र्मेति॑ वि॒श्वऽक॑र्मा। सा। विश्वधा॑या॒ इति॑ वि॒श्वऽधा॑याः। इन्द्र॑स्य। त्वा॒। भा॒गं। सोमे॑न। आ। त॒न॒च्मि॒। विष्णो॒ इति॒ वि॒ष्णो॑। ह॒व्यं। र॒क्ष॒ ॥४॥


    स्वर रहित मन्त्र

    सा विश्वायुः सा विश्वकर्मा सा विश्वधायाः । इन्द्रस्य त्वा भागँ सोमेना तनच्मि विष्णो हव्यँ रक्ष ॥


    स्वर रहित पद पाठ

    सा। विश्वायुरिति विश्वऽआयुः। सा। विश्वकर्मेति विश्वऽकर्मा। सा। विश्वधाया इति विश्वऽधायाः। इन्द्रस्य। त्वा। भागं। सोमेन। आ। तनच्मि। विष्णो इति विष्णो। हव्यं। रक्ष॥४॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 4
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (विष्णो) हे व्यापक परमेश्‍वरा, आपण ज्या वाणीचे धारण करणारे आहात (सा) ती वाणी (विश्‍वायुः) पूर्ण आयुष्य देणारी आहे. (सा) ती विश्‍वकर्मा) ज्याच्या साहाय्याने यज्ञाचे संपूर्ण क्रिया-कांड सिद्ध होतात अशी आहे तसेच ती (विश्‍वधायाः) संपूर्ण जगाला विद्या आणि गुणांद्वारे धारण करणारी आहे. पूर्वीच्या मंत्रात (क्र.3) जो प्रश्‍न केला आहे, त्याचे उत्तर हे की हीच तीन प्रकारची वाणी म्हणजे विश्‍वायुः, विश्‍वकर्मा, आणि विश्‍वधायाः, ग्रहण करण्यास योग्य आहे. (इन्द्रस्य) मी त्या परमेश्‍वराच्या (भागम्) सेवन करण्यास योग्य अशा त्या यज्ञाला (सोमेन) विशिष्ट प्रकारच्या विद्या आणि पद्धतीद्वारे तयार केलेल्या रसाने अथवा हृदयास आनंदाने दृढ करीत आहे. तसेच हे परमेश्‍वर, आपण (हव्यम्) पूर्वोत्त्स यज्ञविषयक देण्या-घेण्यास पात्र अशा द्रव्याचे किंवा विज्ञानाचे (रक्ष) निरंतर रक्षण करा. ॥4॥

    भावार्थ - भावार्थ - वाणी तीन प्रकारची आहे. पहिल्या प्रकारची ती की जिचा ब्रह्मचर्याश्रमात पूर्ण विद्या प्राप्त करण्यासाठी आणि दीर्घ आयु मिळविण्यासाठी उपयोग केला जातो. (विश्‍वायुः) दूसरी वाणी ती की जिचा गृहस्थाश्रमामधे अनेक क्रिया अथवा उद्योगादी द्वारे सुख-प्राप्तीकरिता प्रयोग केला जातो आणि जिचा प्रयोग विस्ताराने भरपूर केला जातो. (विश्‍वकर्मा) तिसर्‍या प्रकारची वाणी ती की जी या संसारात सर्व माणसांच्या शरीर आणि आत्म्याच्या सुखात वृद्धी करते. किंवा जी ईश्‍वरादी पदार्थाच्या विज्ञानाचे दान करणारी आहे आणि ज्या वाणीचा उपयोग वानप्रस्थाश्रमात व संन्यासाश्रमात विद्वान् मंडळी करीत असतात. (विश्‍वधायाः) या तीन प्रकारच्या वाणीशिवाय कोणाला कोणतेही सुख प्राप्त होत नाही. कारण की याच वाणीद्वारे पूर्वोक्त यज्ञाची पूर्तता आणि व्यापक ईश्‍वराची स्तुती, प्रार्थना आणि उपासना करणे उचित आहे. ईश्‍वराचा हा आदेश आहे की नियम व पद्धतीप्रमाणे केलेला यज्ञ या जगात सुखाचा हेतु होत असतो. प्रेमाने आणि आंतरिक सत्य भावनेने प्रार्थित परमेश्‍वर सदैव विद्वानांचे रक्षण करतो. तोच सर्वांचा अध्यक्ष आहे. जे जे कर्म-कुशल धार्मिक परोपकारी मनुष्य आहेत, तेच ईश्‍वरास आणि खर्‍या धर्मास जाणतात आणि मोक्ष व सम्यक् क्रिया-साधनांद्वारे या लोकात तसेच परलोकात सुख प्राप्त करतात. ॥4॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top