Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 5
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - आर्ची त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    अग्ने॑ व्रतपते व्र॒तं च॑रिष्यामि॒ तच्छ॑केयं॒ तन्मे॑ राध्यताम्।इ॒दम॒हमनृ॑तात् स॒त्यमुपै॑मि॥५॥

    स्वर सहित पद पाठ

    अग्ने॑। व्र॒त॒प॒त॒ इति॑ व्रतऽपते। व्र॒तं। च॒रि॒ष्या॒मि॒। तत्। श॒के॒यं॒। तत्। मे॒। रा॒ध्यता॒म्। इ॒दं। अ॒हं। अनृ॑तात्। स॒त्यं। उप॑ ए॒मि॒ ॥५॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्ने व्रतपते व्रतं चरिष्यामि तच्छकेयं तन्मे राध्यताम् । इदमहमनृतात्सत्यमुपैमि ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्ने। व्रतपत इति व्रतऽपते। व्रतं। चरिष्यामि। तत्। शकेयं। तत्। मे। राध्यताम्। इदं। अहं। अनृतात्। सत्यं। उप एमि॥५॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 5
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (व्रतपते) सत्य सत्यभाषण आदी धर्मांचे स्वामिन् (अग्ने) सत्याचा उपदेश करणार्‍या हे परमेश्‍वरा, मी असत्याहून जे वेगले, त्या (सत्यम्) अनूष्ठान करण्याची इच्छा करतो. सत्य म्हणजे वेदविद्या, प्रत्यक्षादी प्रमाण, सृष्टिक्रम, विद्वज्जनांची संगती, श्रेष्ठ विचार आणि आत्म्याची शुद्धता या सर्व प्रकारानें जे निर्भ्रम, सर्व हितकारी तत्त्व प्राप्त होते, म्हणजे सत्य-सिद्धान्ताचे प्रकटन करणार्‍या विद्वानांकडून जे प्रमाणित केले गेले आहे, असे ते (व्रतम्) सत्यभाषण, सत्यग्रहण आणि सत्याचरण आहे, मी (उपैमि) त्या सत्याचा अनुष्ठानाची इच्छा करीत आहे, म्हणजे जे नियमाने ग्रहणीय आणि ज्ञातव्य आहे, त्याच्या प्राप्तीची इच्छा बाळगतो आहे. (मे) माझ्या (तत्) त्या सत्यव्रताला तू (राध्यताम्) चांगल्या प्रकारे पुर्ण कर. असे कर की ज्यायोगे (अहम्) मी त्या सत्यव्रताला जीवनाचा नित्य नियम बनवण्यात (शकेयम्) यशस्वी होऊ शकेन. मी सदैव (इदम्) या प्रत्यक्ष सत्यव्रताप्रमाणेच (चरिष्यामि) आचरण करीन. ॥5॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात परमेश्‍वराने सर्व मनुष्यांना नित्य नियमाने सेवन व पालन करण्यास योग्य असा जो धर्म, त्या धर्माचा उपदेश केला आहे. न्यायोचित केलेले, सर्वांचे हित करणारे तसेच लोकात व परलोकात म्हणजेच मोक्ष अवस्थेत जे सुखदायक आहे, त्याच धर्माचे सर्वांनी आचरण व पालन केले पाहिजे. त्याच्या जे विपरीत आहे, त्यास अधर्म म्हणतात. हा अधर्म कोणासाठी कधीही ग्राह्य किंवा स्वीकारणीय नाहीं. त्याचा तर सर्वत्र सदैव त्याग करायला हवा. आम्ही देखील अशी प्रतिज्ञा केली पाहिजे की हे परमेश्‍वरा, वेदांमधे तू ज्या सत्यधर्माचा प्रकाश केला आहेस, त्याचाच आम्ही स्वीकार करावा. हे परमात्मन् आम्हांवर अशी कृपा कर की आम्ही त्या सत्यधर्माचे पालन करून अर्थ, काम आणि मोक्ष या फळांची प्राप्ती सहजपणे करू शकू. ज्याप्रमाणे तू सत्य व्रतांचा पालना विषयीचा व्रतपति आहेस, त्याप्रमाणे आम्ही देखील तुझ्या कृपेने आणि स्वपुरुषार्थाने यथाशक्ती सत्यव्रताचे पालन करणारे होऊ. धर्माचे पालन करीत सत्कर्मांद्वारे सर्व सुखांची प्राप्ती करीत सर्व जण सर्वांना सुख देणारे असोत, अशी इच्छा सर्व मनुष्यांनी ठेवावी. शतपथब्राह्मणात या मंत्राची विशेष व्याख्या सांगितली आहे. तिथे असे म्हटले आहे की माणसांचे आचरण दोन प्रकारचे असते. एक-सत्याचे, दुसरे-असत्याचे. जे लोक वाणी, मन आणि शरीराने सत्याचरण करतात, त्यांना ‘देव’ म्हणतात आणि जे लोक असत्याचे आचरण करतात, त्यांना ‘असुर’ (राक्षस) आदी नांवाने संबोधले जाते. ॥5॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top