यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 12
ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः
देवता - अप्सवितारौ देवते
छन्दः - भूरिक् अत्यष्टि,
स्वरः - गान्धारः
3
प॒वित्रे॑ स्थो वैष्ण॒व्यौ सवि॒तुर्वः॑ प्रस॒व उत्पु॑ना॒म्यच्छि॑द्रेण प॒वित्रे॑ण॒ सूर्य्य॑स्य रश्मिभिः॑। देवी॑रापोऽअग्रेगुवोऽअग्रेपु॒वोऽग्र॑ऽइ॒मम॒द्य य॒ज्ञं न॑य॒ताग्रे॑ य॒ज्ञप॑तिꣳ सु॒धातुं॑ य॒ज्ञप॑तिं देव॒युव॑म्॥१२॥
स्वर सहित पद पाठप॒वित्रे॒ऽइति॑ प॒वित्रे॑। स्थः॒। वै॒ष्ण॒व्यौ᳖। स॒वि॒तुः। वः॒। प्र॒स॒व इति॑ प्र॒ऽस॒वे। उत्। पु॒ना॒मि॒। अच्छि॑द्रेण। प॒वित्रे॑ण। सूर्य्य॑स्य। र॒श्मिभि॒रिति॑ र॒श्मिऽभिः॑। देवीः॑। आ॒पः॒। अ॒ग्रे॒गु॒व॒ इत्य॑ग्रेऽगुवः। अ॒ग्रे॒पु॒व॒ इत्य॑ग्रेऽपुवः॒। अग्रे॑। इ॒मम्। अ॒द्य। य॒ज्ञम्। न॒य॒त॒। अग्रे॑। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽप॑तिम्। सु॒धातु॒मिति॑ सु॒धाऽतु॑म्। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ यज्ञऽप॑तिम्। दे॒व॒युव॒मिति॑ देव॒ऽयुव॑म् ॥१२॥
स्वर रहित मन्त्र
पवित्रे स्थो वैष्णव्यौ सवितुर्वः प्रसवऽउत्पुनाम्यच्छिद्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः । देवीरापोऽअग्रेगुवो अग्रेपुवोग्रऽइममद्ययज्ञन्नयताग्रे यज्ञपतिँ सुधातुँ यज्ञपतिन्देवयुवम् ॥
स्वर रहित पद पाठ
पवित्रेऽइति पवित्रे। स्थः। वैष्णव्यौ। सवितुः। वः। प्रसव इति प्रऽसवे। उत्। पुनामि। अच्छिद्रेण। पवित्रेण। सूर्य्यस्य। रश्मिभिरिति रश्मिऽभिः। देवीः। आपः। अग्रेगुव इत्यग्रेऽगुवः। अग्रेपुव इत्यग्रेऽपुवः। अग्रे। इमम्। अद्य। यज्ञम्। नयत। अग्रे। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। सुधातुमिति सुधाऽतुम्। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। देवयुवमिति देवऽयुवम्॥१२॥
विषय - होम करतांना ज्या द्रव्यांची अग्नीमधे आहुती दिली जाते, ती द्रव्यें मेघमंडळा पर्यंत जाऊन कोणत्या प्रकारे कोण-कोणते गुण धारण करतात, पुढील मंत्रात परमेश्वराने याविषयी सांगितले आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - विद्वज्जन हो, (सवितुः) परमेवराचे (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या संसारामधे (अच्छिद्रेण) दोषरहित व (पवित्रेण) पवित्र करणारी अशी (सूर्यस्य) सूर्याची (रश्मिभिः) किरणें आहेत. ती किरणें (वैष्णव्यौ) यज्ञविषयक प्राण आणि अपान यांची गती नियमित करण्यात (पवित्रे) पवित्र करण्यात समर्थ (स्थः) व्हावीत. तसेच निर्दोष व पवित्रकारी अशी ही सूर्यकिरणे (अग्रेगुवः) पुढे समुद्रा पर्यंत व अंतरिक्षापर्यंत जावीत. (अग्रेगुवः) पृथिवीवर पूर्वीपासून अस्तित्वात असणारी जी सोम नामक औषधि आहे, त्याचे सेवन करणाऱ्याने (देवीः) दिव्यगुणयुक्त (आपः) जल देखील पवित्र व्हावे. हे विद्वानजनहो, तुम्ही या होमाग्नीत अशा पवित्र पदार्थांची आहुती देऊन त्यांना (नयत) यासाठी योग्य बनवा. त्याप्रमाणे (अद्य) आज (इमं) या (यमं) पूर्वोक्त यज्ञ क्रियाद्वारे करणारा (अग्ने) जो प्रथम (सुधातुं) श्रेष्ठमन आणि इन्द्रियें असणारा तसेच सुवर्ण आदी धनानी समृद्ध असलेला (यज्ञपतिं) यज्ञपति आहे, जो नियम पूर्वक यमाचे पालन करतो व (देवयुवं) विदयवान् व श्रेष्ठगुणांना प्राप्त करणारा किंवा त्यांच्या प्राप्तीसाठी यत्न करणारा आहे अशा (यज्ञपति) यज्ञाची इच्छा करणारा जो यजमान मनुष्य आहे. त्यास मी (उत्पानामि) पवित्र करतो. ॥12॥
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात लुप्तोपमा अलंकार आहे. जे पदार्थ अन्य पदार्थांच्या संयोगामुळे विकारयुक्त होतात, ते अग्नीच्या माध्यमातून अतिसूक्ष्म परमाणूंचे रूप धारण करून वायुमंडळात राहतात आणि किंचित शुद्ध ही होतात, पण यज्ञाद्वारे वायूची व जलाची जितकी व जशी शुद्धी आणि पुष्टी होते, तशी अन्य उपायाने कदापी होणे शक्य नाही. याकरिता विद्वान् बुद्धिमंताना आवश्यक आहे की त्यांनी होम-कर्माद्वारे वायु, अग्नी, जल आदी पदार्थांपासून अनेक प्रकारे लाभ घ्यावेत. तसेच शिल्पविद्याद्वारे उत्तमोत्तम वाहन, यानादींचे निर्माण करून स्वतःच्या मनोभावना पूर्ण करीत इतरांच्या कामनांचीही पूर्तता करावी. पाण्याचा जो भाग पृथिवीपासून वर जात जात अंतरिक्षात जातो व पुन्हा तेथून परत येऊन पृथिवी आदी पदार्थांना मिळतो, त्यास भागास प्रथम म्हणतात आणि जो भाग मेघमंडळात राहतो, त्यास दुसरा असे म्हणतात, शतपथ ब्राह्मण ग्रंथात मेघास ‘वृत्र’ असे संबोधले आहे आणि सूर्यास ‘इन्द्र’ नांवाने संबोधून इन्द्र-वृत्र कथेच्या रूपाने याच मेघविद्येचे वर्णन केले आहे. ॥12॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal