Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 15
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - निचृत् जगती,याजुषी पङ्क्ति, स्वरः - निषादः
    6

    अ॒ग्नेस्त॒नूर॑सि वा॒चो वि॒सर्ज॑नं दे॒ववी॑तये त्वा गृह्णामि बृ॒हद् ग्रा॑वासि वानस्प॒त्यः सऽइ॒दं दे॒वेभ्यो॑ ह॒विः श॑मीष्व सु॒शमि॑ शमीष्व। हवि॑ष्कृ॒देहि॒ हवि॑ष्कृ॒देहि॑॥१५॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒ग्नेः। त॒नूः। अ॒सि॒। वा॒चः। वि॒सर्ज॑न॒मिति॑ वि॒ऽसर्ज॑नम्। दे॒ववी॑तय॒ इति॑ दे॒वऽवी॑तये। त्वा॒। गृ॒ह्णा॒मि॒। बृ॒हद्ग्रा॒वेति॑ बृ॒हत्ऽग्रा॑वा। अ॒सि॒। वा॒न॒स्प॒त्यः। सः। इ॒दम्। दे॒वेभ्यः॑। ह॒विः। श॒मी॒ष्व॒। श॒मि॒ष्वेति॑ शमिष्व। सु॒शमीति॑ सु॒ऽशमि॑। श॒मी॒ष्व॒। श॒मि॒ष्वेति॑ शमिष्व। हवि॑ष्कृत्। हविः॑कृ॒दिति॒ हविः॑कृत्। आ। इ॒हि॒। हवि॑ष्कृत्। हविः॑कृ॒दिति॒ हविः॑ऽकृत्। आ। इ॒हि॒ ॥१५॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्नेस्तनूरसि वाचो विसर्जनन्देववीतये त्वा गृह्णामि बृहद्ग्रावासि वानस्पत्यः स इदन्देवेभ्यो हविः शमीष्व सुशमि शमीष्व हविष्कृदेहि हविष्कृदेहि ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्नेः। तनूः। असि। वाचः। विसर्जनमिति विऽसर्जनम्। देववीतय इति देवऽवीतये। त्वा। गृह्णामि। बृहद्ग्रावेति बृहत्ऽग्रावा। असि। वानस्पत्यः। सः। इदम्। देवेभ्यः। हविः। शमीष्व। शमिष्वेति शमिष्व। सुशमीति सुऽशमि। शमीष्व। शमिष्वेति शमिष्व। हविष्कृत्। हविःकृदिति हविःकृत्। आ। इहि। हविष्कृत्। हविःकृदिति हविःऽकृत्। आ। इहि॥१५॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 15
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हवि म्हणजे हव्य पदार्थांचे संस्कार, शुद्धी व स्वच्छता करण्यासाठी जे (बृहद्ग्रावासि) मोठे-मोठे प्रस्तर (असि) आहेत, तसेच त्यासाठी जे (वानस्पत्य।) काष्ठनिर्मित मुसळ आदी वस्तू आहेत त्या वस्तूंचे मी ग्रहण करतो (दवेभ्यः) विद्वज्जनांसाठी अथवा पदार्थातील दिव्य गुणांना प्रकट करण्यासाठी, तसेच (देववीतये) श्रेष्ठ गुणांच्या प्रकटनासाठी, श्रेष्ठ विद्वानांसाठी किंवा विविध भोगाच्या प्राप्तीसाठी (प्रतिगृह्णामि) मी या यज्ञाचे ग्रहण करतो. (या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी यज्ञाचे अनुष्ठान करतो) हे विद्वज्जन हो, (देवेभ्यः) विद्वानांच्या सुखाकरिता (सुशमि) तसेच दुःखास पूर्णपणे शांत करण्याकरिता (हविः) यज्ञीय पदार्थांना (शमीष्व) (शमीष्व) अत्यंत शुद्ध करा जे लोक श्रद्धेने व प्रेमाने वेदादी शास्त्रांचे पठन व पाठन करतात, त्यांना हवि (हविष्कृत्) अर्थात होमात आहुत करण्यास योग्य अशा पदार्थांचे ज्ञान करून देणारी वाणी प्राप्त होते. यज्ञाच्या विस्तारासाठी या वारीचे ज्ञान आवश्यक असून वेदपठनाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या सर्वांना ही शुद्ध, सुसंस्कृत आणि प्रसिद्ध वाणी प्राप्त होते. ॥15॥

    भावार्थ - भावार्थ - जेंव्हा माणसें वेदादी शास्त्रांद्वारे यज्ञ-क्रिया आणि त्याचे फळ यांचे ज्ञान संपादित करून शुद्ध आणि उत्तम प्रकारे यज्ञ करतात, तेंव्हा सुगंधित पदार्थ होमाद्वारे परमाणुरुप म्हणजे अती सुक्ष्म होतात आणि वायु व वृष्टि-जलामधे प्रसृत होऊन सर्व पदार्थांना उत्तम करतात आणि दिव्य उत्पत्ती करतात. जो माणूस प्राणिमात्राच्या सुखासाठी नित्यच पूर्वोक्त तीन प्रकारचे यज्ञ करतो, त्याला सर्व जण ‘हविष्कृत्, हविष्कृत्’ ‘हा यज्ञाचे प्रसार करणारा, यज्ञाचा विस्तार करणारा उत्तम मनुष्य आहे, असे वारंवार म्हणतात. अशा हविष्कृत् मनुष्याचा सर्वांनी अवश्य सत्कार करावा. ॥15॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top