Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 18
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - ब्राह्मी उष्णिक्,आर्ची त्रिष्टुप्,आर्ची पङ्क्ति, स्वरः - ऋषभः
    3

    अग्ने॒ ब्रह्म॑ गृभ्णीष्व ध॒रुण॑मस्य॒न्तरि॑क्षं दृꣳह ब्रह्म॒वनि॑ त्वा क्षत्र॒वनि॑ सजात॒वन्युप॑दधामि॒ भ्रातृ॑व्यस्य व॒धाय॑। ध॒र्त्रम॑सि॒ दिवं॑ दृꣳह ब्रह्म॒वनि॑ त्वा क्षत्र॒वनि॑ सजात॒वन्युप॑दधामि॒ भ्रातृ॑व्यस्य व॒धाय॑। विश्वा॑भ्य॒स्त्वाशा॑भ्य॒ऽउप॑दधामि॒ चित॑ स्थोर्ध्व॒चितो॒ भृगू॑णा॒मङ्गि॑रसां॒ तप॑सा तप्यध्वम्॥१८॥

    स्वर सहित पद पाठ

    अग्ने॑। ब्रह्म॑। गृ॒भ्णी॒ष्व॒। ध॒रुण॑म्। अ॒सि॒। अ॒न्तरि॑क्षम्। दृ॒ꣳह॒। ब्र॒ह्म॒वनीति॑ ब्रह्म॒ऽवनि॑। त्वा॒। क्ष॒त्र॒वनीति॑ क्षत्र॒ऽवनि॑। स॒जा॒त॒वनीति॑ सजात॒ऽवनि॑। उप॑। द॒धा॒मि॒। भ्रातृ॑व्यस्य। व॒धाय॑। ध॒र्त्रम्। अ॒सि॒। दिव॑म्। दृ॒ꣳह॒। ब्र॒ह्म॒वनीति॑ ब्रह्म॒ऽवनि॑। त्वा॒। क्ष॒त्र॒वनीति॑ क्षत्र॒ऽवनि॑। स॒जा॒त॒वनीति॑ सजात॒ऽवनि॑। उप॑। द॒धा॒मि॒। भ्रातृ॑व्यस्य। व॒धाय॑। विश्वा॑भ्यः। त्वा॒। आशा॑भ्यः। उप॑। द॒धा॒मि॒। चितः॑। स्थ॒। ऊ॒र्ध्व॒चित॒ इत्यू॑र्ध्व॒ऽचि॒तः॑। भृगू॑णाम्। अङ्गि॑रसाम्। तप॑सा। त॒प्य॒ध्व॒म् ॥१८॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्ने ब्रह्म गृभ्णीष्व धरुणमस्यन्तरिक्षन्दृँह ब्रह्मवनि त्वा क्षत्रवनि सजातवन्युप दधामि भ्रातृव्यस्य बधाय । धर्त्रमसि दिवन्दृँह ब्रह्मवनि त्वा क्षत्रवनि सजातवन्युप दधामि भ्रातृव्यस्य बधाय । विश्वाभ्यस्त्वाशाभ्यऽउप दधामि चित स्थोर्ध्वचितो भृगूणामङ्गिरसां तपसा तप्यध्वम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्ने। ब्रह्म। गृभ्णीष्व। धरुणम्। असि। अन्तरिक्षम्। दृꣳह। ब्रह्मवनीति ब्रह्मऽवनि। त्वा। क्षत्रवनीति क्षत्रऽवनि। सजातवनीति सजातऽवनि। उप। दधामि। भ्रातृव्यस्य। वधाय। धर्त्रम्। असि। दिवम्। दृꣳह। ब्रह्मवनीति ब्रह्मऽवनि। त्वा। क्षत्रवनीति क्षत्रऽवनि। सजातवनीति सजातऽवनि। उप। दधामि। भ्रातृव्यस्य। वधाय। विश्वाभ्यः। त्वा। आशाभ्यः। उप। दधामि। चितः। स्थ। ऊर्ध्वचित इत्यूर्ध्वऽचितः। भृगूणाम्। अङ्गिरसाम्। तपसा। तप्यध्वम्॥१८॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 18
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (अग्ने) हे परमेश्‍वरा, तू (धरूणं) सर्वांना धारण करणारा (असि) आहेस. (ब्रह्म) वेदमंत्राद्वारे मी तुझी जी स्तुती करीत आहे, त्याचा तू (गृभ्णीष्व) स्वीकार कर. (अन्तरिक्षं) आत्म्यामधे स्थित जे अक्षय ज्ञान आहे, त्याची (दृंह) वृद्धी कर. (भ्रातृव्यस्य) शच्ंिया (वधाय) विनाशासाठी मी तुला हृदयात धारण करतो. (ब्रह्मवनि) सर्व मनुष्यांनी सुखी करण्यासाठी वेदांच्या शाखा-शाखात्तरांद्वारे जे त्यांची (रक्षण/जपणूक) व विभाग करतात ते ब्राह्मण, तसेच (क्षत्रवनि) राजधर्माचे पालन करणारे क्षात्र धर्माचा प्रकाश करणारे क्षत्रिय, व जे भौतिक मूर्तिमान पदार्थ आहेत, त्यां वरील सर्वांना भिन्न-भिन्न प्रकाश व प्रेरणा देणारा तू आहेस, अशा (त्वा) तुला मी (उपदधामि) हृदयात धारण करतो, तुझे ध्यान करतो. हे सर्वाधार परमेश्‍वरा, तूच (धर्त्रम्) लोक-लोकान्तरांना धारण करणारा आहेस, म्हणून कृपा करून आम्हांमधे (दिवं) अत्युत्तम ज्ञानाची वृद्धी कर. (भ्रातृव्यस्य) शत्रूंच्या (वधाय) विनाशासाठी (ब्रह्मवनि) (क्षत्रवनि) (सजातवनि) वेदांचा विद्या-अध्याय करणारे ब्राह्मणांना तसेच राज्याचे यथायोग्य समान न्याय व व्यवहार करणार्‍या क्षत्रियांना प्रेरणा देणारा, अशा (त्वा) तुला मी (उपदधामि) आपल्या हृद्यात धारण करतो. तसेच मी (त्वा) तुला सर्वव्यापक जाणून (विश्‍वायः) सार्‍या (आशाभ्यः) दिशांकडून सुख मिळविण्याकरिता वारंवार तुला (उपदधामि) आपल्या मनात धारण करतो. तुझे स्मरण करतो. हे मनुष्यांनो, तुम्ही वर वर्णन केलेल्या विद्या, राज्यआदी व्यवहारांना चांगल्या प्रकारे जाणून घ्या, तसेच विज्ञानी व उत्तम ज्ञानी पुरूषांच्या प्रेरणेने कपालांना (खप्पर किंवा मृत्रिकापात्र) अग्नीवर ठेऊन उत्तम गुणांना प्राप्त करा. यासाठी (भृगुणां) विद्या आदी गुणांची प्राप्ती करून देणारे (अंगिरसां) जे प्राण आहेत, त्यांच्या शक्तीने व प्रभावाने (तप्यध्वं) स्वतः) तप्त व्हा आणि इतरांना तप्त करा म्हणजे लाभ घेण्यास तत्पर व्हा. हा या मंत्राचा पहिला अर्थ झाला. ^आतां दुसरा अर्थ सांगत आहोत. हे विद्वान धर्मात्मा पुरुष, ज्या (अग्ने) भौतिक अग्नीद्वारे (धरुणं) सर्वांना धारण करणारा तेज प्राप्त होतो, (ब्रह्म) वेद आणि (अन्तरिक्षं) आकाशात असणारे सर्व पदार्थांचे ज्ञान/ग्रहण होते आणि त्यांची वृद्धी होते, (त्वा) त्या अग्नीला तुम्ही होमा करिता तसेच शिल्पविद्येच्या सिद्धते करिता (गृभ्णीष्व) ग्रहण करा, त्याचा उपयोग करा. आणि (दृंह) विद्यायुक्त क्रियांनी (विज्ञानयुक्त प्रयोगांनी) आणखी वाढवा. मी देखील (भ्रातृव्यस्य) शत्रूंच्या (वधाय) विनाशासाठी (त्वा) त्या (ब्रह्मवनिं) (क्षत्रवनिं) (सजातवनि) भौतिक पदार्थांना प्रकाशित करण्यासाठी अथवा दृष्टांत रूपाने राज-धर्माची व्यवस्था सांगण्यासाठी भौतिक अग्नीला शिल्पविद्या आदी व्यवहारात (उपदधामि) स्थापित करीत आहे. या प्रकारे स्थापित केलेला अग्नी आमच्याकरिता अनेक सुखांची प्राप्ती करून देतो. याच प्रकारे वायु देखील सर्व प्राण्यांना (धर्त्रं) धारण करणारा (असि) आहे. तो (दिवं) प्रकाशमय सूर्यलोकास (दृंह) करतो. हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे मी आपल्या शत्रूंच्या (वधा) विनाशाकरिता (ब्रह्मवनि) (क्षत्रवनि) (सजातवनि) वेद आणि राज्यासाठी समान उत्तमोत्तम शिल्पविद्यांचा यथायोग्य कार्यामधे प्रयुक्त करणार्‍या भौतिक अग्नीला (उपदधामि) स्थापित करतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील त्या अग्नीचा उत्तमोत्तम कार्यामधे उपयोग करून विद्या-ज्ञानाच्या साहाय्याने (दृंह) त्यास वाढवा, विद्येविषयी जिज्ञासू असलेल्या हे माणसा, ज्या वायूने पृथिवी, सूर्य आदी लोकांना धारण केले आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील आपल्या जीवनात सुख-वृद्धीसाठी व शिल्पविद्येच्या प्रगतीसाठी यथायोग्य कार्य व उदिष्टांसाठी त्या वायूचा प्रयोग करा (दृंह) त्याची वृद्धी करा आणि ज्याप्रमाणे आम्ही आपल्या शत्रूंच्या नाशाकरिता (ब्रह्मवनि) (क्षत्रवनि) (सजातवनि) अग्नीतील गुणांप्रमाणे वायूतील गुणांचा देखील शिल्पविद्यादी कार्यात (उपदधामि) वापर करतो, त्याप्रमाणे तुम्हीही आपल्या अनेक दुःखाच्या विनाशासाठी त्याचा यथायोग्य कार्यासाठी प्रयुक्त करा. हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे वायुविद्येचा ज्ञाता मी (त्वा) त्या अग्नीला व वायूला (विश्‍वाभ्यः) सर्व (आशाभ्यः) दिशांमधे सर्वांच्या सुख-प्राप्तीकरिता यथायोग्य कार्यात (उपदधामि) करून आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील त्यांचा उपयोग घ्या. तसेच शिल्पविद्येसाठी किंवा होम करण्यासाठी (चितः) (उर्ध्वचितः) यज्ञीय पदार्थांनी भरलेल्या पात्रामधे किंवा वाहन आदीमधे स्थापित अशा कलायंत्रामधे (भगणाम्) ज्याच्या सहाय्याने पदार्थांना शिजवतात, त्या निखार्‍यांच्या (तपसा) तापाने, उष्णतेने (तप्यध्वम्) वरील पदार्थांना तप्त करा. (उष्णता निर्माण करून त्याद्वारे ऊर्जा व शक्ती मिळवा) ॥18॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. ईश्‍वर उपदेश करीत आहे की मनुष्यांनो, तुम्ही विद्वानांच्या उन्नतीसाठी, अज्ञानाच्या विनाशासाठी आणि शत्रूंचे निर्दालन करून राज्याच्या वृद्धीसाठी वेद विद्येचे ग्रहण करा. तसेच वृद्धीचे कारण जो अग्नी, सर्वांना धारण करणारा जो वायू, अग्निमय सूर्य आणि परमेश्‍वर या सर्वांना सर्व दिशांमध्ये व्याप्त जाणून यज्ञ-सिद्ध करा आणि विमान आदी यानांची रचना करा पण धर्माच्या मार्गाने करा. अग्नी, वायू आणि सूर्य यांच्या गुणांचा व लाभांचा शोध घेऊन आपले दुःख दूर करा आणि शत्रूंवर विजय मिळवा. ॥18॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top