Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 16
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - वायुः सविता देवता छन्दः - स्वराट् ब्राह्मी त्रिष्टुप्,विराट् गायत्री, स्वरः - षड्जः
    3

    कु॒क्कु॒टोऽसि॒ मधु॑जिह्व॒ऽइष॒मूर्ज॒माव॑द॒ त्वया॑ व॒यꣳ स॑ङ्घा॒तꣳ स॑ङ्घातं जेष्म व॒र्षवृ॑द्धमसि॒ प्रति॑ त्वा व॒र्षवृ॑द्धं वेत्तु॒ परा॑पूत॒ꣳ रक्षः॒ परा॑पूता॒ अरा॑त॒योऽप॑हत॒ꣳ रक्षो॑ वा॒युर्वो॒ विवि॑नक्तु दे॒वो वः॑ सवि॒ता हिर॑ण्यपाणिः॒ प्रति॑गृभ्णा॒त्वच्छि॑द्रेण पा॒णिना॑॥१६॥

    स्वर सहित पद पाठ

    कु॒क्कु॒टः। अ॒सि॒। मधु॑जिह्व॒ इति॒ मधु॑ऽजिह्वः। इष॑म्। ऊर्ज्ज॑म्। आ। वद॒। त्वया॑। व॒यं। सं॒घा॒तम् सं॑घात॒मि॑ति संघा॒तꣳसं॑घातम्। जे॒ष्म॒। व॒र्षवृद्ध॒मिति व॒र्षऽवृद्ध॑म्। अ॒सि॒। प्रति। त्वा॒। व॒र्षवृ॑द्ध॒मिति व॒र्षऽवृ॑द्धम्। वे॒त्तु॒। परा॑पूत॒मिति॒। परा॑ऽपूतम्। रक्षः॑। परा॑पूता॒ इति॒ परा॑ऽपूताः। अरा॑तयः। अप॑हत॒मित्यप॑ऽहतम्। रक्षः॑। वा॒युः। वः॒। वि। वि॒न॒क्तु दे॒वः। वः॒। स॒वि॒ता। हिर॑ण्यपाणि॒रिति॒ हिर॑ण्यऽपाणिः। प्रति॑। गृ॒भ्णा॒तु॒। अच्छिद्रेण। पा॒णिना॑ ॥१६॥


    स्वर रहित मन्त्र

    कुक्कुटो सि मधुजिह्वऽइषमूर्जमावद त्वया वयँ सङ्धातँसङ्धातञ्जेष्म वर्षवृद्धमसि प्रति त्वा वर्षवृद्धं वेत्तु परापूतँ रक्षः परापूताऽअरातयो अपहतँ रक्षो वायुर्वो वि विनक्तु देवो वः सविता हिरण्यपाणिः प्रति गृभ्णात्वच्छिद्रेण पाणिना ॥


    स्वर रहित पद पाठ

    कुक्कुटः। असि। मधुजिह्व इति मधुऽजिह्वः। इषम्। ऊर्ज्जम्। आ। वद। त्वया। वयं। संघातम् संघातमिति संघातꣳसंघातम्। जेष्म। वर्षवृद्धमिति वर्षऽवृद्धम्। असि। प्रति। त्वा। वर्षवृद्धमिति वर्षऽवृद्धम्। वेत्तु। परापूतमिति। पराऽपूतम्। रक्षः। परापूता इति पराऽपूताः। अरातयः। अपहतमित्यपऽहतम्। रक्षः। वायुः। वः। वि। विनक्तु देवः। वः। सविता। हिरण्यपाणिरिति हिरण्यऽपाणिः। प्रति। गृभ्णातु। अच्छिद्रेण। पाणिना॥१६॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 16
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    हा यज्ञ (मधुजिह्वः) मधुर वाणी व मधुर गुणांनी युक्त असा तसेच (कुकुटः) चोर आणि शत्रूंचा नाश करणारा (असि) आहे. हा यज्ञ (इसं) अन्नादी पदार्थांचा अथवा (ऊर्जं) विद्या, शक्ती आणि उत्तमोत्तम रसांचा दाता आहे, त्यामुळे नेहमी यज्ञाचे अनुष्ठान करावे. हे विद्वज्जनहो, पूर्वोक्त गुणांची प्राप्ती करून देणार्‍या उपरिलिखित तीन प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान करा आणि आम्हांस त्याचे गुण (आवद) करून सांगा ज्यामुळे (वयं) आम्ही (त्वया) तुमच्या सह संग्रमामधे (संघातं संघातं) शत्रूंचा भीषण व निश्‍चित पराभव करू शकू. (आ. जेष्म) वारवार शत्रूंवर विजय मिळवू. कारण की तुम्ही युद्धविद्येचे ज्ञाता (असि) आहात. यासाठी सर्व मनुष्यांनी यज्ञाला (वर्षवृद्धं) वृष्टीची वृद्धी करणार्‍या यज्ञाला नीट पक्रारे (प्रीतिवेत्तु) जाणावे. यामुळे सर्व माणसांना पाहिजे की (पराभूत) पावित्र्य आदी गुणांचा त्याग करणारे जे ( रक्षः) दुष्ट मनुष्य आहेत, तसेच (परापूतः) शुद्धतेपासून दूर असे अशुद्धजन आहेत (अराययः) दानादी धर्मापासून दूर असे जे आमचे शत्रु आहेत, तसेच जे (रक्षः) लुटारू व दरोडेखोर आहेत, त्याचा नाश होईल, असेच प्रयत्न सदैव करावेत. (हिरण्यपाणि) ज्योती ज्याचा हात आहे असा (वायुः) वायु आपल्या (अच्छिद्रेण) सतत वाहणार्‍या स्वभावाने (पाणिना) सातत्याने गमनागमन करणार्‍या व्यवहाराद्वारे अग्नी आणि सूर्य यांच्यामुळे सूक्ष्म झालेल्या पदार्थांचे (प्रतिगृभ्णातु) ग्रहण करतो. ^अथवा दुसरा अर्थ- (हिरण्यपाणिः) किरणें ज्याचा हात आहे, असा (सविता) सूर्य की जो वृष्टी आणि प्रकाश यांद्वारे पदार्थांमधे दिव्यगुणांची स्थापना करतो, तो (देवः) प्रकाशमय सूर्य (वः) त्या पदार्थांना (विविनक्तु) भिन्न-भिन्न करतो किंवा परमाणुरूप करतो. याप्रमाणेच परमेश्‍वराने अथवा विद्वान पुरुषांनी ((अच्छिद्रेण) नित्य निरंतर (पाणिना) आपल्या उपदेशाने सर्व विद्यांचे (विविनक्तु) व्याख्यान करावे. त्याचप्रमाणे हे परमेश्‍वरा, आम्ही स्वतः आनन्द-प्राप्ती करीतां अत्यंत प्रेमाने तुमचे (प्रतिगृभ्णातु) ग्रहण करतो किंवा स्वीकार करतो. ॥16॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. परमेश्‍वर सर्व मनुष्यांना आदेश देत आहे की यज्ञाचे अनुष्ठान करा. युद्धात शत्रूचा पराभव करा. पदार्थातील गुणांचे ज्ञान मिळवा, विद्वज्जनांची सेवा करा. दुर्जनांपासून दुर राहा, दुर्गुणांचा त्याग करा. तसेच अग्नी व सूर्य हे आपल्या तापानें सर्व पदार्थांना छिन्न-भिन्न करतात आणि वायु त्या सुक्ष्मरूप पदार्थांना धारण करतो, याचे ज्ञान मिळवा. ईश्‍वराची उपासना व विद्वानांची संगती करा. अशा प्रकारे सर्वांनी सर्व विद्यांची प्राप्ती करून सर्वांसाठी सर्व सुखदायक अशी उन्नती सदा व अवश्य करावी. ॥16॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top