Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 14/ मन्त्र 11
    ऋषिः - विश्वेदेवा ऋषयः देवता - इन्द्राग्नी देवते छन्दः - भुरिगनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    1

    इन्द्रा॑ग्नी॒ऽ अव्य॑थमाना॒मिष्ट॑कां दृꣳहतं यु॒वम्। पृ॒ष्ठेन॒ द्यावा॑पृथि॒वीऽ अ॒न्तरि॑क्षं च॒ विबा॑धसे॥११॥

    स्वर सहित पद पाठ

    इन्द्रा॑ग्नी॒ इतीन्द्रा॑ग्नी। अव्य॑थमानाम्। इष्ट॑काम्। दृ॒ꣳह॒त॒म्। यु॒वम्। पृ॒ष्ठेन॑। द्यावा॑पृथि॒वी इति॒ द्यावा॑ऽपृथि॒वी। अ॒न्तरि॑क्षम्। च॒। वि। बा॒ध॒से॒ ॥११ ॥


    स्वर रहित मन्त्र

    इन्द्राग्नीऽअव्यथमानामिष्टकान्दृँहतँयुवम् । पृष्ठेन द्यावापृथिवी अन्तरिक्षञ्च विबाधसे ॥


    स्वर रहित पद पाठ

    इन्द्राग्नी इतीन्द्राग्नी। अव्यथमानाम्। इष्टकाम्। दृꣳहतम्। युवम्। पृष्ठेन। द्यावापृथिवी इति द्यावाऽपृथिवी। अन्तरिक्षम्। च। वि। बाधसे॥११॥

    यजुर्वेद - अध्याय » 14; मन्त्र » 11
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (इंद्राग्नी) विद्युत व सूर्याप्रमाणे असलेल्या पति-पत्नी, (युवम्) तुम्ही दोघे (अव्यथमामाम्) निश्चयात्मक बुद्धीला दृढ करा (आपसातील संशय दूर ठेवा) ज्याप्रमाणे (इष्टकाम्) वीट ही घराला दृढ करते, तद्वत तुम्ही आपल्या गृहाश्रमाला (दृंहतम्) दृढ करा. जसे हे (द्यावापृथिवी) प्रकाश आणि पृथ्वी (पृष्ठेन) आपल्या पाठीशी आकाशाला बांधून ठेवतात (आकाशातील सूर्यप्रकाश पृथ्वीग्रहण करते आणि पृथ्वीचा संबंध आकाशाशीं असतो) तसे तुम्ही दु:ख आणि शत्रू यांना बांधून (कैद करून) ठेवा. हे पती, जसे तू आपल्या पत्नीचे दु:ख व पीडा (विबाधसे) दूर करतोस, तसे तुझ्या पत्नीनेदखील अवश्य तुझे संपूर्ण दु:ख हरावे आणि (सेवा करून) पीडा दूर करावी ॥11॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्लेष आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत ज्याप्रमाणे विद्युत आणि सूर्य जल, वृष्टी औषधी आदी पदार्थांच्या वृद्धीचे कारण आहेत, त्याप्रमाणे पति-पत्नीने आपल्या परिवाराची वृद्धी उन्नती करावी. जसे प्रकाश आणि पृथ्वी आकाशाचे आच्छादन वा आवरण असल्याप्रमाणे आहेत, तसे पति-पत्नीनी गृहाश्रमाचे सर्व व्यवहार संपूर्णत: कर्तव्य म्हणून पूर्ण करावेत ॥11॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top