Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 20
    ऋषिः - वत्सार काश्यप ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - निचृत् आर्षी जगती स्वरः - निषादः
    5

    उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्याग्रय॒णोऽसि॒ स्वाग्रयणः। पा॒हि य॒ज्ञं पा॒हि य॒ज्ञप॑तिं॒ विष्णु॒स्त्वामि॑न्द्रि॒येण॑ पातु॒ विष्णुं त्वं पा॑ह्य॒भि सव॑नानि पाहि॥२०॥

    स्वर सहित पद पाठ

    उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। आ॒ग्र॒य॒णः। अ॒सि॒। स्वा॑ग्रयण॒ इति॒ सुऽआग्रयणः। पा॒हि। य॒ज्ञम्। पा॒हि। य॒ज्ञम्। पा॒हि। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽपतिम्। विष्णुः॑। त्वाम्। इ॒न्द्रि॒येण॑। पा॒तु॒। विष्णु॑म्। त्वम्। पा॒हि॒। अ॒भि। सव॑नानि। पा॒हि॒ ॥२०॥


    स्वर रहित मन्त्र

    उपयामगृहीतोस्याग्रयणो सि स्वाग्रयणः पाहि यज्ञम्पाहि यज्ञपतिँविष्णुस्त्वामिन्द्रियेण पातु विष्णुन्त्वम्पाह्यभि सवनानि पाहि ॥


    स्वर रहित पद पाठ

    उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। आग्रयणः। असि। स्वाग्रयण इति सुऽआग्रयणः। पाहि। यज्ञम्। पाहि। यज्ञम्। पाहि। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। विष्णुः। त्वाम्। इन्द्रियेण। पातु। विष्णुम्। त्वम्। पाहि। अभि। सवनानि। पाहि॥२०॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 20
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ : हे सभापती राजा अथवा हे उपदेश करणारे विद्वान, आपण (उपयामगृहीत:) विनय आदी राजगुणांनी युक्त वेद आदी शास्त्रज्ञानाने युक्त (असि) आहात. यामुळे कृपा करून (यज्ञम्) राजा व प्रजा दोघांचे पालन करणार्‍या यज्ञाचे (पाहि) रक्षण करा. हे राजन्, आपण (स्वाग्रमण:) उत्तम विज्ञानयुक्त कर्माच्या सिद्धीसाठी व्यवस्था करणारे आहात आणि हे विद्वान, (आग्रयण:) आपण उत्तम विचारयुक्त कर्मांची सिद्धी करणारे आहात. (यज्ञयतिम्) कृपया न्यायाचे यथोचित पालन करणार्‍याचे (पाहि) दोघांनीही रक्षण करावे. (विद्वानांनी व राज्यधिकारीजनांनी विज्ञान व विचारांच्या प्रगतीसाठी कार्य करणार्‍यांचे रक्षण करावे. त्यांना निर्भय करावे) (विष्णु:) समस्त सद्गुणांचे आणि कर्माचे ज्ञान असणारा हा जो विद्वान आहे, तो (इन्द्रियेण) मनाने व धनाने (त्वां) तुझी (राजाची) (पातु) रक्षा करो आणि तू (राजा देखील (विष्णुम्) या विद्वानाची (पाहि) रक्षा करावी अशाप्रकारे सभाध्यक्ष व विद्वान दोघांनीही (सवनानि) ऐश्वर्यकारी कर्मांचे (अभि) सर्वप्रकारे (पाहि) रक्षण करावे. (राष्ट्राचा राजा व राज्यातील विद्वान यांचे परस्परात यथोचित सामंजस्य असावे )॥20॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. राजा आणि राष्ट्रातील विद्वज्जन यांनी सदैव राज्याच्या उन्नतीकरिता यज्ञ करावेत, कारण की राज्याची उन्नती झाल्याशिवाय विद्वान लोक विद्येचा प्रसार करू शकणार नाहीत आणि कोणास उपदेश देऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे विद्वज्जनांचा संग आणि उपदेश (सल्ला व मार्गदर्शन) न मिळाल्यास राजा राज्याची रक्षा करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तसेच राजा, प्रजाजन आणि विद्वान यांचे आपसात प्रीतीभाव असल्याशिवाय राज्याच्या वैभवात वृद्धी होणार नाही आणि वैभववृद्धी झाल्याशिवाय राज्यात सदा आनंद नांदू शकणार नाही. ॥20॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top