Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 48
    ऋषिः - आङ्गिरस ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - आर्षी उष्णिक् स्वरः - ऋषभः
    3

    को॑ऽदा॒त् कस्मा॑ऽअदा॒त् कामो॑ऽदा॒त् कामा॑यादात्। कामो॑ दा॒ता कामः॑ प्रतिग्रही॒ता कामै॒तत्ते॑॥४८॥

    स्वर सहित पद पाठ

    कः। अ॒दा॒त्। कस्मै॑। अ॒दा॒त्। कामः॑। अ॒दा॒त्। कामा॑य। अ॒दा॒त्। कामः॑। दा॒ता। कामः॑। प्र॒ति॒ग्र॒ही॒तेति॑ प्रतिऽग्रही॒ता। काम॑। ए॑तत्। ते॒ ॥४८॥


    स्वर रहित मन्त्र

    को दात्कस्मा ऽअदात्कामो दात्कामायादात् । कामो दाता कामः प्रतिग्रहीता कामैतत्ते ॥


    स्वर रहित पद पाठ

    कः। अदात्। कस्मै। अदात्। कामः। अदात्। कामाय। अदात्। कामः। दाता। कामः। प्रतिग्रहीतेति प्रतिऽग्रहीता। काम। एतत्। ते॥४८॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 48
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    पदार्थ - (परमेश्राने जीवास आज्ञा केली आहे प्रारंभी प्रश्न विचारून नंतर (त्यांची उत्तरे दिली आहेत) (क:) कर्माचे फळ कोण (अदात्) देतो? आणि (करमे) कोणाला कर्माचे फळ (अदात्) देतो? या दोन प्रश्नांची उत्तरे अशी - (काम:) ज्यात सर्वजण कामना करतात, तो परमेश्वर (अदात्) देतो आणि कामना करतात, तो परमेश्वर (अदात्) देतो आणि (कामाय) कामना करणार्‍या जीवाला (आत्म्याला) (अदात्) देतो. यानंतर या मंत्राना विशेष अर्थ प्रगट केला आहे. तो असा की (काम:) योगीजन ज्याची कामना करतात, तो परमेश्वर (दाता) देणारा आहे आणि (काम:) कामना करणारा जीव (प्रतिग्रहीता) घेणारा वा भोगणारा आहे. हे (काम) कामना करणार्‍या जीवा (ते) तुझ्यासाठी मी वेदांद्वारे (एतत्) अशा प्रकारे ही आज्ञा केली आहे हे तू निश्चयाने जाणून घे ॥48॥

    भावार्थ - भावार्थ - या संसारात जीव हा कर्म करणारा आणि ईश्वर हा फळ देणारा आहे. इथे हे जाणून घ्यावे (स्पष्टपणे लक्षात असू द्यावे) की कामना केल्याशिवाय (अन्य कर्म तर दूरच) डोळ्याच्या पापण्या देखील कोणी डालवू शतकत नाही. यामुळे जीवाने कामाना अवश्य करावी, पण ती कामना धर्मासंबंधी असावी, अधर्मासाठी नव्हे. याशिवाय मनु महाराज यांनी जे सांगितले आहे, ते वेदानुकूल आहे, असे सर्वांना निश्चयाने समजावे. तसे पाहता या संसारात अतिकामना करणे प्रशंसनीय नाही, पण हे ही सत्य की कामना केल्याशिवाय जगात कोणतेही कार्य सिद्ध होत नाही. यामुळे कामना करावी तर धर्माची, अधर्माची कदापी नव्हे. वेदांचे पठन-पाठन (अध्ययन, अध्यापन) आणि वेदोक्त धर्माचे आचारण आदी कार्य कामना म्हणजे इच्छेविना केव्हांही पूर्ण होऊ शकत नाही. या जगात त्रिकाळात इच्छेविना कोणतीही क्रिया संपन्न होताना दिसत नाही. जे जे केले जात आहे, ते ते सर्व इच्छेचाच व्यापार आहे. यामुळे मनुष्याने श्रेष्ठ वेदोन्त कर्माचीच कामना करावी, अन्य दुष्कर्मांची मुळीच नको ॥48॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top