Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 1
    ऋषिः - आङ्गिरस ऋषिः देवता - बृहस्पतिस्सोमो देवता छन्दः - आर्ची पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    6

    उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽस्यादि॒त्येभ्य॑स्त्वा। विष्ण॑ऽउरुगायै॒ष ते॒ सोम॒स्तꣳ र॑क्षस्व॒ मा त्वा॑ दभन्॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। आ॒दि॒त्येभ्यः॑। त्वा॒। विष्णो॒ऽइति॒ विष्णो॒। उ॒रु॒गा॒येत्यु॑रुऽगाय। ए॒षः। ते॒। सोमः॑। तम्। र॒क्ष॒स्व॒। मा। त्वा॒। द॒भ॒न् ॥१॥


    स्वर रहित मन्त्र

    उपयामगृहीतोस्यादित्येभ्यस्त्वा । विष्णऽउरुगायैष ते सोमस्तँ रक्षस्व मा त्वा दभन् ॥


    स्वर रहित पद पाठ

    उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। आदित्येभ्यः। त्वा। विष्णोऽइति विष्णो। उरुगायेत्युरुऽगाय। एषः। ते। सोमः। तम्। रक्षस्व। मा। त्वा। दभन्॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (ब्रह्मचारिणी कन्या म्हणते) हे कुमार ब्रह्मचारिन्, चोवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य सेवन केलेली मी (अदित्येभ्य:) ज्यांनी अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन केले आहे, अशा सज्जनांच्या सभेत (त्वा) अठ्ठेचाळीस वर्ष ब्रह्मचर्य पालन करणार्‍या अशा आपला स्वीकार करीत आहे. आपण (उपयामगृहीत:) शास्त्रविहित नियम-उपनियमांच्या अनुरुप वागणारे (असि) आहात (विष्णो) समस्तश्रेष्ठ विद्या उत्तम गुण, कर्म आणि स्वभाने संपन्न असे हे श्रेष्ठजन, (ते) आपला (एप:) हा गृहस्थाश्रम (सोम:) सोमलतेप्रमाणे ऐश्वर्याची वृद्धी करणारा आहे (तम्) त्याचे आपण (रक्षस्व) रक्षण व पालन करा. (उरुगाय) हे बहुलशाकाअध्येता, (त्वा) ज्या योगे आपणांस कामाचे (कामवासेनेचे) बाण (यादभन्) दु:खकारी होणार नाहीत, असे करा. (गृहस्थाश्रमातदेखील संयमाची कास सोडू नका. कामाचा अती नको) ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - ब्रह्मचर्याश्रमाने पालन करणार्‍या सर्व युवती कुमारिका कन्यांना अशी आकांक्षा अवश्य बाळगावी की त्यांनी आपल्या अनुरुप, गुण, कर्म, स्वभाव आणि विद्यासंपन्न अशा ब्रह्मचारी युवकाला गृहस्थाश्रमासाठी स्वयंवर रीतीने निवडावे. असा युवक त्या ब्रह्मचारिणीपेक्षा अधिक बलवान असावा, स्वेच्छेने निवडलेला आणि ज्यावर ती कन्या अंत:करणापासून प्रेम करते, असा असावा. अशाचेच पतीरुपेण वरण करावे आणि त्याची सेवा करावी. त्याचप्रमाणे कुमार ब्रह्मचार्‍याकरितादेखील आवश्यक आहे की त्याने (गुण, कर्मस्वभावाने समान अशा) युवतीचे पाणिग्रहण करावे. या रीतीने दोघाची (पति-पत्नीनी) सनातन गृहस्थ-धर्याचे पालन करावे. दोघांनी अतिशय विषयलोलुपता त्यागावी आणि त्याद्वारे वीर्याचा कदापी नाश करू नये. सदा ऋतुगामी असावे. दोघांनी दहा संतानें उत्पन्न करावीत व त्या सर्वांना चांगले शिक्षण व संस्कार देऊन आपले ऐश्वर्य वाढवावे आणि प्रेमाने राहावे. ज्यायोगे पति-पत्नी दोघांचा कधी वियोग होणार नाही, दोघात बेबनाव होणार नाही. आणि दोघे व्यभिचार दोषात लिप्त होणार नाही, अशाच प्रकारचे आचरण दोघांचे सदैव असावे - याप्रकारे दोघांनी सर्वकाळी सर्व प्रकारे एकमेकाची रक्षा अवश्य करावी. ॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top