Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 43
    ऋषिः - कुसुरुविन्दुर्ऋषिः देवता - पत्नी देवता छन्दः - आर्षी पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    1

    इडे॒ रन्ते॒ हव्ये॒ काम्ये॒ चन्द्रे॒ ज्योतेऽदि॑ते॒ सर॑स्वति॒ महि॒ विश्रु॑ति। ए॒ता ते॑ऽअघ्न्ये॒ नामा॑नि दे॒वेभ्यो॑ मा सु॒कृतं॑ ब्रूतात्॥४३॥

    स्वर सहित पद पाठ

    इडे॑। रन्ते॑। हव्ये॑। काम्ये॑। चन्द्रे॑। ज्योते॑। अदि॑ते। सर॑स्वति। महि॑। विश्रु॒तीति॒ विऽश्रु॑ति। ए॒ता। ते॒। अ॒घ्न्ये॒। नामा॑नि। दे॒वेभ्यः॑। मा॒। सु॒कृत॒मिति॒ सु॒ऽकृ॑तम्। ब्रू॒ता॒त् ॥४३॥


    स्वर रहित मन्त्र

    इडे रन्ते हव्ये काम्ये चन्द्रे ज्योते दिते सरस्वति महि विश्रुति । एता ते अघ्न्ये नामानि देवेभ्यो मा सुकृतम्ब्रूतात् ॥


    स्वर रहित पद पाठ

    इडे। रन्ते। हव्ये। काम्ये। चन्द्रे। ज्योते। अदिते। सरस्वति। महि। विश्रुतीति विऽश्रुति। एता। ते। अघ्न्ये। नामानि। देवेभ्यः। मा। सुकृतमिति सुऽकृतम्। ब्रूतात्॥४३॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 43
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पति आपल्या पत्नीच्या गुणांची प्रशंसा करीत म्हणत आहे) हे प्रिय पत्नी, तू (अघ्न्वे) ताडन न करावे, अशी आहेस (आदिते) आत्म्याच्या रुपाने तू अविनाशी आहेस (ज्योते) शीलवती असल्यामुळे कीर्तीमान आहेस (इठे) प्रशंसनीय गुणांनी परिपूर्ण आहेस (हव्ये) स्वीकार करण्यास योग्य आणि (काम्ये) मनोहारिणी आहेस (रन्ते) रमण करण्यास योग्य आणि (चन्द्रे) आनंददायिनी आहेस. (विश्रुति) उत्तम विचार आणि वेद जाणणारी आहेस, (महि) अत्यंत प्रशंसनीय असून (सरस्वति) प्रशंसनीय विज्ञानवती आहेस. अशा प्रकारची तू हे प्रिय पत्नी, तुझ्या सद्गुणांच्या प्रकाश करणारी ही (वर उल्लेखलेली) सर्व विशेषणें (ते) तुझी (एला) ही (नामानि) नामें आहेत. तू (देवभ्य:) उत्तम गुणांच्या प्राप्तीकरिता (मा) मला (सकृतम्) उत्तम उपदेश (आणि आचरण-रीती) (ब्रूतात्) सांगत जा ॥43॥

    भावार्थ - भावार्थ - विद्वज्जनांपासून उत्तम विद्या, शिक्षण व संस्कार घेतलेल्या स्त्रीने आपल्या पतीला आणि अन्य सर्व स्त्रियांना यथोचित उत्तम कर्मे शिकवावीत की ज्यामुळे कोणीही अधर्म-कृत्याकडे जाणार नाही. पति-पत्नी, दोघांनी विद्येची वृद्धीची वृद्धी करीत आपल्या बालकांना व कन्यांना उत्तम शिक्षण द्यावे. ॥43॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top