Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 44
    ऋषिः - शास ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - निचृत् अनुष्टुप्,स्वराट आर्षी गायत्री स्वरः - गान्धारः, षड्जः
    2

    वि न॑ऽइन्द्र॒ मृधो॑ जहि नी॒चा य॑च्छ पृतन्य॒तः। योऽअ॒स्माँ२ऽअ॑भि॒दास॒त्यध॑रं गमया॒ तमः॑। उ॒प॒या॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा वि॒मृध॑ऽए॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा वि॒मृधे॑॥४४॥

    स्वर सहित पद पाठ

    वि। नः॒। इ॒न्द्र॒। मृधः॑। ज॒हि॒। नी॒चा। य॒च्छ॒। पृ॒त॒न्य॒तः। यः। अ॒स्मान्। अ॒भि॒दास॒तीत्य॑भि॒ऽदास॑ति। अध॑रम्। ग॒म॒य॒। तमः॑। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। वि॒मृध॒ इति॑ वि॒ऽमृधे॑। ए॒षः। ते॒। योनिः॑। इन्द्रा॑य। त्वा॒। वि॒मृध॒ इति॑ वि॒ऽमृधे॑ ॥४४॥


    स्वर रहित मन्त्र

    वि न ऽइन्द्र मृधो जहि नीचा यच्छ पृतन्यतः । यो अस्माँ अभिदासत्यधरङ्गमया तमः । उपयामगृहीतो सीन्द्राय त्वा विमृधे ऽएष ते योनिरिन्द्राय त्वा विमृधे ॥


    स्वर रहित पद पाठ

    वि। नः। इन्द्र। मृधः। जहि। नीचा। यच्छ। पृतन्यतः। यः। अस्मान्। अभिदासतीत्यभिऽदासति। अधरम्। गमय। तमः। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। विमृध इति विऽमृधे। एषः। ते। योनिः। इन्द्राय। त्वा। विमृध इति विऽमृधे॥४४॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 44
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (इन्द्र) सेनापती, (पृतन्यत:) आमच्याशी युद्ध करण्याच्या इच्छा करून सैन्य एकत्रित करणार्‍या (न:) आमच्या शत्रूंचा तुम्ही (जहि) वध करा आणि त्या (नीचा) नीच मनुष्यांना (यच्छ) काबूत आणा. तसेच जे शत्रु (अस्मान्) आम्हाला (प्रजाजनांना वा गृहस्थजनांना) (अभिदासति) अनेकप्रकारे दु:ख देता वा पीडित करतात, त्या (विमृध:) दुष्टांना (तम:) सूर्य जसे अंधकार नष्ट करतो, त्याप्रमाणे त्या दुष्टांना (अधरम्) अधोगतीला (गमय) पाठवा (त्यांचा पराजय वा विनाश करा - (याच कारणासाठी) (ते) तुमचे (एष:) हे कर्तव्य आणि (योनि:) राजांचा उद्देश्य आहे. (की आमच्या शत्रूंचा विनाश करा) व तुम्ही (उपयामगृहीत:) सैन्य तसे आवश्यक युद्धसामग्रीने समृद्ध (असि) आहात. यासाठीच आम्ही (त्वा) तुम्हाला (विमृध:) घोर संग्राम करणार्‍या शत्रूंच्या विरूद्ध (इन्द्राय) तुमच्यासारख्या ऐश्वर्य व शक्तिसंपन्न सेनापतीला युद्धासाठी सेनापती म्हणून स्वीकारले आहे. (त्वा) तसेच तुम्हाला (विमृधे) शत्रुविहीन होण्यासाठी (इन्द्राय) सुखमय राज्याकरिता आम्ही प्रेरणा देत आहोत म्हणजे तुम्ही कधी अधर्माचरण करू नये, (सांगत आहोत.). ॥44॥

    भावार्थ - भावार्थ - कोणी दुष्कर्मा, कपटी, मनुष्य शक्तिशाली बनून सर्वांना दु:ख देत असेल, तर राजाने त्याला अनेक प्रकारे दंड द्यावा. तरीही जर तो दुष्ट दुष्कर्म करणे सोडत नसेल, तर त्याला ठार मारणे किंवा त्याला नगरापासून बाहेर व दूरच्या ठिकाणी घालवून द्यावे. ॥44॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top