Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 51
    ऋषिः - देवा ऋषयः देवता - प्रजापतयो गृहस्था देवताः छन्दः - भूरिक् आर्षी जगती, स्वरः - निषादः
    5

    इ॒ह रति॑रि॒ह र॑मध्वमि॒ह धृति॑रि॒ह स्वधृ॑तिः॒ स्वाहा॑। उ॒प॒सृ॒जन् ध॒रुणं॑ मा॒त्रे ध॒रुणो॑ मा॒तरं॒ धय॑न्। रा॒यस्पोष॑म॒स्मासु॑ दीधर॒त् स्वाहा॑॥५१॥

    स्वर सहित पद पाठ

    इ॒ह। रतिः॑। इ॒ह। र॒म॒ध्व॒म्। इ॒ह। धृतिः॑। इ॒ह। स्वधृ॑ति॒रिति॒ स्वऽधृ॑तिः। स्वाहा॑। उ॒प॒सृ॒जन्नित्यु॑पऽसृ॒जन्। ध॒रुण॑म्। मा॒त्रे। ध॒रुणः॑। मा॒तर॑म्। धय॑न्। रा॒यः। पोष॑म्। अ॒स्मासु॑। दी॒ध॒र॒त्। स्वाहा॑ ॥५१॥


    स्वर रहित मन्त्र

    इह रतिरिह रमध्वमिह धृतिरिह स्वधृतिः स्वाहा । उपसृजन्धरुणम्मात्रे धरुणो मातरन्धयन् । रायस्पोषमस्मासु दीधरत्स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    इह। रतिः। इह। रमध्वम्। इह। धृतिः। इह। स्वधृतिरिति स्वऽधृतिः। स्वाहा। उपसृजन्नित्युपऽसृजन्। धरुणम्। मात्रे। धरुणः। मातरम्। धयन्। रायः। पोषम्। अस्मासु। दीधरत्। स्वाहा॥५१॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 51
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे गृहस्थजन हो, (इह) या गृहाश्रमामध्ये तुमची (रति:) प्रती होवो (इह) याच गढहाश्रमामध्ये (धृति:) सर्व सांसारिक कार्य-व्यवहार आदींची आणि (इह) यामध्येच (स्वधृति:) तुमच्या स्वत:च्या पदार्थांची (स्वाहा) स्थिती व्हावी (कार्याविषयीचे ध्येय इच्छित पदार्थाची प्राप्ती तुम्हांस व्हावी) तसेच (स्वाहा) तुमची वाणी सत्य आणि तद्वत क्रियादेखील सत्य असावी. तुम (इह) या गृहाश्रमात (रमध्वम्) रमण करा (आनंदाचा उपभोग घ्या) हे गृहश्रमस्य पुरुष, तुझ्या संतानांची माता जी तुझी विवाहिता पत्नी आहे, ती (मात्रे) पुत्रांना प्रेम करणारी आणि मान देणारी आहे. त्या पत्नीमध्ये तू (धरूणम्) धारण-पोषणास योग्य अशा गर्भाची (उपसृजन्) स्थापना कर (उत्तमपुत्र होऊ दे) त्याचप्रमाणे (धरुण:) त्या गुणवान पुत्राने (मातरम्) आपल्या मातेचे (धयन्) दूध प्यावे. (अशाप्रकारे, हे गृहस्थजन, (अस्मासु) आम्हां (इतरजनांसाठी तुमच्या परिवाराने) (राय:) धन आणि (पोषम्) पुष्टिकारक समृद्धी (स्वाहा) सत्य मनाने (दीधरत्) द्यावी वा आमच्यासाठी (सार्‍या समाजासाठी) समृद्धी उत्पन्न करावी ॥51॥

    भावार्थ - भावार्थ - राजा, सभासदजन आणि प्रजाजन हे सर्व जण जोपर्यंत सत्य, धैर्य आणि सत्याचरणाद्वारे अर्जित पदार्थांचा सत्य व्यवहारांमध्ये (योग्य कामात) व्यय करणार नाहीत, तोपर्यंत राजा आणि प्रजा सुखा होऊ शकत नाही. तसेच राजपुरुष (शासकीय अधिकारी आदी) आणि प्रजाजन या सर्वांचे संबंध व पारस्परिक व्यवहार जोपर्यंत पिता-पुत्रातील संबंधाप्रमाणे होणार नाहींत आणि दोघे एकमेकास उपकार (सहकार्य) करीत नाहीत, तोपर्यंत निरंतर सुख प्राप्त होणार नाही. ॥51॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top