Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 11
    ऋषिः - भरद्वाज ऋषिः देवता - गृहपतयो देवताः छन्दः - निचृत् आर्षी अनुष्टुप्, स्वरः - गान्धारः
    2

    उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ हरि॑रसि हारियोज॒नो हरि॑भ्यां त्वा। हर्यो॑र्धा॒ना स्थ॑ स॒हसो॑मा॒ऽइन्द्रा॑य॥११॥

    स्वर सहित पद पाठ

    उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। हरिः॑। अ॒सि॒। हा॒रि॒यो॒ज॒न इति॑ हारिऽयोज॒नः। हरि॑ऽभ्या॒मिति॒ हरि॑ऽभ्याम्। त्वा॒। हर्य्योः॑। धा॒नाः। स्थ॒। स॒हसो॑मा इति॑ स॒हऽसो॑माः। इन्द्रा॑य ॥११॥


    स्वर रहित मन्त्र

    उपयामगृहीतोसि हरिरसि हारियोजनो हरिभ्यान्त्वा । हर्यार्धाना स्थ सहसोमा इन्द्राय ॥


    स्वर रहित पद पाठ

    उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। हरिः। असि। हारियोजन इति हारिऽयोजनः। हरिऽभ्यामिति हरिऽभ्याम्। त्वा। हर्य्योः। धानाः। स्थ। सहसोमा इति सहऽसोमाः। इन्द्राय॥११॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 11
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पत्नी म्हणते) हे पतिदेव, आपण (उपयामगृहीत:) गृहाश्रमासाठी मला प्राप्त झालेले (असि) आहात. (हारियोजन:) घोड्यांना रथात जुंपणार्‍या सारथीप्रमाणे आपण (हरि:) गृहाश्रमरुप रथाला यथोचित रीतीने चालविणारे (असि) आहात. यासाठी (हरिभ्याम्) उत्कृष्टपणे प्रशिक्षित अश्वांनी युक्त अशा अश्वरथात विराजमान व्हा. (त्वा) मी आपली सेवा करीन (यापुढे दोघांना ईश्वराचा वा पंडितच्या विद्वानाचा उपदेश) - गृहाश्रमी जनहो, (इन्द्राय) तुम्ही परमैश्वर्याच्या प्राप्तीसाठी (सहसोमा:) उत्तम गुणवान व्हा आणि (हर्य्यो:) वेगवान घोड्यांचे स्वामी होऊन त्यांना (धाना:) अश्वशाला आदी स्थानामध्ये ठेवणारे (स्थ) व्हा. (गृहस्थाकरिता अश्व आवश्यक आहे) ॥11॥

    भावार्थ - भावार्थ - ज्या मुली आणि मुलें ब्रह्मचर्याद्वारे शुद्ध झालेले शरीर धारण करतात, जे गुणवान, विद्यावान होऊन विवाहेच्छु आहेत, अशा मुला-मुलींनी युवावस्थेत प्रवेश केल्यानंतर एकमेकांच्या धन-संपदेची चांगली स्थिती पाहून विवाह करावा, अन्यथा धनाच्या अभावामुळे दु:खवृद्धी होते. याकरिता आवश्यक आहे सी वर वर्णित गुणांनी युक्त स्त्री-पुरुषांनी विवाह करून आनंदीत व्हावे आणि प्रतिदिनीं ऐश्वर्याची वृद्धी करीत रहावे. ॥11॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top