Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 41
    ऋषिः - प्रस्कण्व ऋषिः देवता - सूर्य्यो देवता छन्दः - निचृत् आर्षी गायत्री,स्वराट आर्षी गायत्री, स्वरः - षड्जः
    2

    उदु॒ त्यं जा॒तवे॑दसं दे॒वं व॑हन्ति के॒तवः॑। दृ॒शे विश्वा॑य॒ सूर्य॑म्। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ सूर्या॑य त्वा भ्रा॒जायै॒ष ते॒ योनिः॒ सूर्या॑य त्वा भ्रा॒जाय॑॥४१॥

    स्वर सहित पद पाठ

    उत्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। त्यम्। जा॒तवे॑दस॒मिति॑ जा॒तऽवे॑दसम्। दे॒वम्। व॒ह॒न्ति॒। के॒तवः॑। दृ॒शे। विश्वा॑य। सूर्य्य॑म्। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मगृ॑हीतः। अ॒सि॒। सूर्य्या॑य। त्वा॒। भ्रा॒जाय॑। ए॒षः। ते॒। योनिः॑। सूर्य्या॑य। त्वा॒। भ्रा॒जाय॑ ॥४१॥


    स्वर रहित मन्त्र

    उदु त्यञ्जातवेदसन्देवं वहन्ति केतवः । दृशे विश्वाय सूर्यम् । उपयामगृहीतोसि सूर्याय त्वा भ्राजायैष ते योनिः सूर्याय त्वा भ्राजाय ॥


    स्वर रहित पद पाठ

    उत्। ऊँऽइत्यूँ। त्यम्। जातवेदसमिति जातऽवेदसम्। देवम्। वहन्ति। केतवः। दृशे। विश्वाय। सूर्य्यम्। उपयामगृहीत इत्युपयामगृहीतः। असि। सूर्य्याय। त्वा। भ्राजाय। एषः। ते। योनिः। सूर्य्याय। त्वा। भ्राजाय॥४१॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 41
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (जातवेदसम्) जो परमेश्वर सर्व उत्पन्न पदार्थांना जाणतो वा आम्हांला सर्व पदार्थांचे ज्ञान करवितो, अथवा ज्या परमेश्वरापासून वेद आणि जगातील पदार्थ उत्पन्न झाले आहेत, त्या (देवम्) शुद्धस्वरूप जगदीश्वराला (विश्वाय) संसारास उपकृत करण्यासाठी (दृशे) ज्ञानचक्षुद्वारे पाहून (केतव:) किरणांप्रमाणे प्रकाशमान असे विद्वज्जन (उत्) (वहन्ति) आपल्या ज्ञानाने वादानुवाद (चर्चा, विचार, तर्क, चिंतन) करून त्यांचे व्याख्यान करतात, (उ) त्या तर्क-वितर्कांवर विचार करून (त्यम्) आम्ही देखील त्या जगदीश्वराला जाणावे व प्राप्त करावे. हे जगदीश्वर, आम्ही (उपासकांनी) (भ्राजाय) अत्यंत उत्साहाने पुरुषार्थ करीत (सूर्य्याय) प्राणांच्या उत्कर्षाकरिता (उपयामगृहीत:) यमनियम, योगाभ्यास, उपासना आदी साधनांनी आपणांस स्वीकारले (असि) आहे. (त्वा) आपणाला आम्ही वरील कामनांच्या पूर्तीसाठी साद स्वीकार करावे. हे ईश्वर, (ते) आपले (एष:) हे कार्य-कारण व्याप्तीमुळी होणारे जे अनुमान आहे, (योनि:) ते अनुपम प्रमाण आहे (कार्याला पाहून कारणाचे अनुमान होते-तद्वत् आपली ही सृष्टी पाहून आपल्या सत्तेचे अनुमान होते) अशा (त्वा) आपणांला (भ्राजाय) प्रकाशमान (सूर्य्याय) ज्ञानरुप सूर्याच्या प्राप्तीकरिता आम्ही (उपासकगण) आपणांस एक कारण मानतो. (ज्ञानाद्वारे आपणांस जाणून आपली उपासना करतो) ॥41॥

    भावार्थ - भावार्थ - ज्याप्रमाणे वेदवेत्ता विद्वज्जन वेदानुकूल मार्गाने परमेश्वराला जाणतात आणि त्या उत्तम ज्ञानाद्वारे त्याची उपासना करतात, त्याप्रमाणे सर्वांनी देखील त्या परमेश्वराला उपासनीय वा सेवनीय जाणावे. ज्ञानाविना ईश्वरोपासना करणे, कदापि शक्य नाही, कारण की ज्ञान-विज्ञान हीच त्यासाठी सीमा वा साधन आहे ॥41॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top