Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 48
    ऋषिः - देवा ऋषयः देवता - प्रजापतयो देवताः छन्दः - याजुषी पङ्क्ति,याजुषी जगती,साम्नी बृहती, स्वरः - धैवतः, मध्यमः
    2

    व्रेशी॑नां त्वा॒ पत्म॒न्नाधू॑नोमि। कुकू॒नना॑नां त्वा॒ पत्म॒न्नाधू॑नोमि। भ॒न्दना॑नां त्वा॒ पत्म॒न्नाधू॑नोमि म॒दिन्त॑मानां त्वा॒ पत्म॒न्नाधू॑नोमि म॒धुन्त॑मानां त्वा॒ पत्म॒न्नाधू॑नोमि शु॒क्रं त्वा॑ शु॒क्रऽआधू॑नो॒म्यह्नो॑ रू॒पे सूर्य॑स्य र॒श्मिषु॑॥४८॥

    स्वर सहित पद पाठ

    व्रेशी॑नाम्। त्वा। पत्म॑न्। आ। धू॒नो॒मि॒। कुकू॒नना॑नाम्। त्वा॒। पत्म॑न्। आ। धू॒नो॒मि॒। भ॒न्दना॑नाम्। त्वा॒। पत्म॑न्। आ। धू॒नो॒मि॒। म॒दिन्त॑माना॒मिति॑ म॒दिन्ऽत॑मानाम्। त्वा॒। पत्म॑न्। आ। धू॒नो॒मि॒। म॒धुन्त॑माना॒मिति॑ म॒धुन्ऽत॑मानाम्। त्वा॒। पत्म॑न्। आ। धू॒नो॒मि॒। शु॒क्रम्। त्वा॒। शु॒क्रे। आ। धू॒नो॒मि॒। अह्नः॑। रू॒पे। सूर्य्य॑स्य। र॒श्मिषु॑ ॥४८॥


    स्वर रहित मन्त्र

    व्रेशीनान्त्वा पत्मन्नाधूनोमि कुकाननानान्त्वा पत्मन्ना धूनोमि भन्दनानान्त्वा पत्मन्ना धूनोमि मदिन्तमानान्त्वा पत्मन्ना धूनोमि मधुन्तमानान्त्वा पत्मन्ना धूनोमि शुक्रन्त्वा शुक्र ऽआ धूनोम्यह्नो रूपे सूर्यस्य रश्मिषु ॥


    स्वर रहित पद पाठ

    व्रेशीनाम्। त्वा। पत्मन्। आ। धूनोमि। कुकूननानाम्। त्वा। पत्मन्। आ। धूनोमि। भन्दनानाम्। त्वा। पत्मन्। आ। धूनोमि। मदिन्तमानामिति मदिन्ऽतमानाम्। त्वा। पत्मन्। आ। धूनोमि। मधुन्तमानामिति मधुन्ऽतमानाम्। त्वा। पत्मन्। आ। धूनोमि। शुक्रम्। त्वा। शुक्रे। आ। धूनोमि। अह्नः। रूपे। सूर्य्यस्य। रश्मिषु॥४८॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 48
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (परस्त्रीविषयी रममाण एका व्यभिचारी पतीस त्याची पत्नी उपदेश करीत आहे) हे (पत्मन्) धर्माकडे मनास प्रवृत्त न करणारे हे पती, (ब्रेशीनाम्) जलाप्रमाणे निर्मळ, विद्या आणि शील यांनी संपन्न ज्या परस्त्रिया आहेत, त्यांच्याकडे व्यभिचार भावनेने जाण्यापासून वा त्यांच्याशी व्यभिचार करण्यापासून मी (त्वा) तुम्हांस (आधूनोमि) नीटपणे परावृत्त करते (तुम्ही तसे व्यभिचार करू नका वा पुढे तुमच्या हातून तसे उपकृत्य घडूं देऊ नका). (पत्मन्) अधर्माकडे मनास वळविणारे हे पती, (कुकूननानाम्) ज्या शब्दविद्येमुळे ज्या सदैव नम्र होत (मधुरभाषिणी आहेत) अशा परस्त्रियांकडे जाण्याचा मूर्खपणा करणार्‍या (त्वा) तुम्हाला मी (आ) (धूनोमि) त्यापासून सोडविते. (पत्मन्) दुराचारात मन रमविणारे हे पती, (भन्दनानाम्) कल्याणपूर्ण आचरण करणार्‍या परस्त्रियांकडे अधर्मकरणार्‍या (त्वा) तुम्हाला मी (आ) नीटपणे (धूनोमि) त्यापासून वेगळे करते. (पत्मन्) हे चंचलचित्त पती, (मदिन्तयानानाम्) आनंदात मग्न राहणार्‍या परस्त्रियांकडे जाऊन त्यांना दु:ख देणार्‍या (त्वा) तुम्हाला मी त्या कार्यापासून (आ) वारंवार (धूनोमि) कंपित करून दूर करते. (पत्मन्) हे कठोरहृदय पती (मधुन्तमानानाम्) अत्यंत गोड बोलणार्‍या परस्त्रियांकडे दुराचरण करण्यासाठी जाणार्‍या (त्वा) तुम्हाला मी (आ) त्यापासन चांगल्या प्रकारे (धूनोमि) दूर करते. (पत्नम्) अविद्येत रमणार्‍या हे पती, (अद्र:) दिवसाच्या (रुपे) समयी म्हणजे (सूर्य्यस्य) सूर्याच्या सर्वत्र प्रसृत किरणांच्या काळात घरी राहून तुमच्या संगतीची कामना करणारी मी (शुक्रम्) शुद्ध वीर्यवान (त्वा) तुम्हाला (शुक्रे) वीर्यदानासाठी मी (आ) चांगल्याप्रकारे (धूनामि) प्रवृत्त करते (परस्त्रीगमन पापापासून तुम्हांस परावृत्त करून विवाहित पत्नी म्हणून मी तुम्हाला एक पत्नीव्रती होण्यासाठी सांगते) ॥48॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांमुळे जगातील पदार्थ शुद्ध होतात, त्याप्रमाणे आपल्या सदाचारिणी पत्नीच्या सद्व्यवहार आणि सत्याचा उपदेशामुळे दुराचारी पुरुष शुद्ध होतात. गृहस्थजनांसाठी हे उचित आचरण आहे की त्यांनी अत्यंत दु:खदायी आणि कुळास भ्रष्ट करणार्‍या व्यभिचारकर्मापासून सदा दूर राहावे, कारण की व्यभिचारामुळे शरीराच्या आणि आत्मिक शक्तीचा नाश होतो आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची कदापि सिद्धी होत नाही. ॥48॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top