Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 33
    ऋषिः - मधुच्छन्दा ऋषिः देवता - विश्वेदेवा देवताः छन्दः - आर्षी गायत्री,निचृत् आर्षी उष्णिक् स्वरः - मध्यमः, षड्जः
    2

    ओमा॑सश्चर्षणीधृतो॒ विश्वे॑ देवास॒ऽआग॑त। दा॒श्वासो॑ दा॒शुषः॑ सु॒तम्। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्य॑ऽए॒ष ते॒ योनि॒र्विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्यः॑॥३३॥

    स्वर सहित पद पाठ

    ओमा॑सः। च॒र्ष॒णी॒धृ॒तः॒। च॒र्ष॒णि॒धृ॒त॒ इति॑ चर्षणिऽधृतः। विश्वे॑। दे॒वा॒सः॒। आ। ग॒त॒। दा॒श्वासः॑। दा॒शुषः॑। सु॒तम्। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। विश्वे॑भ्यः। त्वा॒। दे॒वेभ्यः॑। ए॒षः। ते॒। योनिः॑। विश्वे॑भ्यः। त्वा॒। दे॒वेभ्यः॑ ॥३३॥


    स्वर रहित मन्त्र

    ओमासश्चर्षणीधृतो विश्वे देवास आ गत । दाश्वाँसो दाशुषः सुतम् । उपयामगृहीतो सि विश्वेभ्यस्त्वा देवेभ्यऽएष ते योनिर्विश्वेभ्यस्त्वा देवेभ्यः ॥


    स्वर रहित पद पाठ

    ओमासः। चर्षणीधृतः। चर्षणिधृत इति चर्षणिऽधृतः। विश्वे। देवासः। आ। गत। दाश्वासः। दाशुषः। सुतम्। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। विश्वेभ्यः। त्वा। देवेभ्यः। एषः। ते। योनिः। विश्वेभ्यः। त्वा। देवेभ्यः॥३३॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 33
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    (या मंत्रात पिता व पालकाचे वचन अध्यापक व पुत्राप्रत) -^शब्दार्थ - (चर्षणीधृत:) (ज्ञानदानाद्वारे) मनुष्यांना बौद्धिकशक्ती, पुष्टी व संतुष्टि देणार्‍या आणि (आमास:) आपल्या उत्तम गुणांनी सर्वांचे रक्षण करणार्‍या हे (विश्वे) समस्त (देवास:) विद्वज्जनहो, तुम्ही (दाश्वांस:) उत्कृष्ट ज्ञान देणारे आहात (दाशुषे) दान करणार्‍या आणि (सुतम्) उत्तम व्यवहार करून ज्याने ऐश्वर्य प्राप्त केले आहे तुम्ही अशा दाता मनुष्याच्या (आ, गत) समोर या. (तुम्ही त्यास ज्ञान द्या) त्याने मिळविलेले धन वाईट मार्गाने मिळविलेले नाही.) वरील उदार दानी मनुष्याच्या हे बालका, तू अध्ययन करण्यासाठी अध्यापकाजवळ आला असून तू (उपयामगृहीत:) अध्ययनाच्या नियम व पद्धतीने बांधलेला (असि) आहेस. म्हणून मी (त्वा) तुला (विश्वेभ्य:) समस्त (देवेभ्य:) विद्वानांकडे सोपवीत आहे आणि तुला त्यांची सेवा करण्याची आज्ञा करीत आहे. (ते) तुझे (एप:) विद्या व उत्तम शिक्षाप्राप्तीचे उद्देश्य या सेवेचे (योनि:) कारण आहे (गुरुसेवेमुळे तुला उत्तम ज्ञान प्राप्त होईल) म्हणून मी तुझा पिता (त्वा) तुला (विश्वेभ्य:) कल (देषेभ्य:) विद्वानांकडे पाठवून तुला उत्तमोत्तम विद्या देववीत आहे ॥33॥

    भावार्थ - भावार्थ - सर्व विद्वान पुरुष आणि विदुषीस्त्रिया यांचे कर्त्तव्य आहे की सर्व बालक-बालिकांना निरंतर विद्यादान करीत असावे. व राजा आणि श्रीमंत आदि लोकांच्या धन आदी वस्तूंनी आपले चरितार्थ चालवावे. त्याचप्रमाणे राजा आणि श्रीमंत लोकांनी देखील स्वत: विद्या व उत्तम शिक्षाग्रहण करून त्यांना शिकविणार्‍या विद्वानांचा आणि विदुषीनी धानादी चांगले पदार्थ दान करून त्यांची सेवा करावी. सर्व माता-पिता यांना आपल्या आठ वर्षाच्या मुलास आणि आठवणीच्या मुलीस विद्याभ्यासाकरिता तसेच ब्रह्मचर्यसेवन व चांगले शिक्षण घेण्याकरिता विद्वान पुरुष व विदुषी स्त्रियांकडे सोपवो. त्या मुला-मुलीचे देखी कर्त्तव्य आहे की यांनी मन:पूर्वक विद्याग्रहण कार्यात नित्य मग्न रहावे आणि अध्यापकांनी देखील विद्या उत्तम ज्ञान देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे ॥33॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top