Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 29
    ऋषिः - देवश्रवा ऋषिः देवता - प्रजापतिर्देवता छन्दः - आर्ची पङ्क्ति,भूरिक् साम्नी पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    6

    को॑ऽसि कत॒मोऽसि॒ कस्या॑सि॒ को नामा॑सि। यस्य॑ ते॒ नामाम॑न्महि॒ यं त्वा॒ सोमे॒नाती॑तृपाम। भूर्भुवः॒ स्वः सुप्र॒जाः प्र॒जाभिः॑ स्या सु॒वीरो॑ वी॒रैः सु॒पोषः॒ पोषैः॑॥२९॥

    स्वर सहित पद पाठ

    कः। अ॒सि॒। क॒त॒मः। अ॒सि॒। कस्य॑। अ॒सि॒। कः। नाम॑। अ॒सि॒। यस्य॑। ते॒। नाम॑। अम॑न्महि। यम्। त्वा॒। सोमे॑न। अती॑तृपाम। भूरिति॒ भूः। भुव॒रिति॑ भु॒वः। स्व॒रिति॒ स्वः॑। सु॒प्र॒जा इति॑ सुऽप्र॒जाः। प्र॒जाभि॒रिति॑ प्र॒ऽजाभिः॑। स्या॒म्। सु॒वीर॒ इति॑ सु॒ऽवीरः॑। वी॒रैः। सु॒पोष॒ इति॑ सु॒ऽपोषः॑। पोषैः॑ ॥२९॥


    स्वर रहित मन्त्र

    को सि कतमोसि कस्यासि को नामासि । यस्य ते नामामन्महि यन्त्वा सोमेनातीतृपाम । भूर्भुवः स्वः सुप्रजाः प्रजाभिः स्याँ सुवीरो वीरैः सुपोषः पोषैः ॥


    स्वर रहित पद पाठ

    कः। असि। कतमः। असि। कस्य। असि। कः। नाम। असि। यस्य। ते। नाम। अमन्महि। यम्। त्वा। सोमेन। अतीतृपाम। भूरिति भूः। भुवरिति भुवः। स्वरिति स्वः। सुप्रजा इति सुऽप्रजाः। प्रजाभिरिति प्रऽजाभिः। स्याम्। सुवीर इति सुऽवीरः। वीरैः। सुपोष इति सुऽपोषः। पोषैः॥२९॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 29
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - सभाजन, सेना व प्रजाजन, असे आम्ही सर्वजण तुम्हांस विचारत आहोत-सांगा, तुम्ही (क:) कोण (असि) आहात? (कतम:) अनेकांपैकी आपण कोणते (म्हणजे तुमचे विशिष्ट स्थान वा पद) (असि) आहात? (कस्य) तुम्ही कुणाचे (असि) आहात? (क:) काय (नाभ) नांव (असि) आहे? को (यस्य) ज्या (नाम) नावाने (त्वा) तुम्हाला आम्ही (अमन्महि) जाणाने? तसेच तू कोण आहेस की (यम्) ज्या (त्या) तुला आम्ही (सोमेन) धन आदी पदार्थांनी (अतीतृयाम) तृप्त करावे? (तुम्हाला अन्य, कर आदी पदार्थ देऊन सहकार्य द्यावे?) असे विचारल्यानंतर सभापती म्हणतात - (भू:) भूमी (भुव:) अंतरिक्ष आणि (स्व:) आदित्यलोकातील सुखाप्रमाणे आत्मसुखाची कामना करणारा मी तुम्ही (प्रजाभि:) प्रजाजनांसह (सुप्रजा:) श्रेष्ठ प्रजा असणारा (सभापती होण्याची इच्छा बाळगणारा आहे) तसेच (वीरै:) तुमच्यासारखे वीर पुरूषांमुळे (सुवांर:) श्रेष्ठ वीरसैन्ययुक्त होण्याची कामना करणारा आणि (पोषै:) पुष्टिकारक अन्न, औषधी आदी पदार्थांपासून (सुपोष:) तुम्हा प्रजाजनांना व मी स्वत:ला पुष्ट (स्याम्) होईन, अशी इच्छा करणारा आहे. अर्थात तुम्हा सर्व लोकांपेक्षा वेगळे असे माझे अस्तित्व नाही, माझे वेगळे नांव नाही आणि विशेष नाते वा पददेखील नाही. (म्हणजे राष्ट्राध्यक्ष, प्रजाचा, प्रजेसाठी व प्रजाजनच आहे, तो वेगळा नाही) ॥29॥

    भावार्थ - भावार्थ - सभाध्यक्ष राजा यांसाठी हे उचित आहे की त्याने सत्य, न्याययुक्त आणि प्रिय व्यवहार करीत सभा, सभासद, सेना आणि प्रजाजन, या सर्वांचे रक्षण करावे आणि सर्वांची उन्नती घडवून आणावी. तसेच सभाध्यक्ष राजाने आपल्या सैन्यात अती पराक्रमी वीर ठेवावेत की ज्यायोगे राज्यात सुख-शांती नांदेल आणि संपूर्ण भूमीवर सुखाची वृष्टि होईल. ॥29॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top