Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 42
    ऋषिः - कुत्स ऋषिः देवता - सूर्य्यो देवता छन्दः - भूरिक् आर्षी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    3

    चि॒त्रं दे॒वाना॒मुद॑गा॒दनी॑कं॒ चक्षु॑र्मि॒त्रस्य॒ वरु॑णस्या॒ग्नेः। आप्रा॒ द्यावा॑पृथि॒वीऽअ॒न्तरि॑क्ष॒ꣳ सूर्य॑ऽआ॒त्मा जग॑तस्त॒स्थुष॑श्च॒ स्वाहा॑॥४२॥

    स्वर सहित पद पाठ

    चित्र॒म्। दे॒वाना॑म्। उत्। अ॒गा॒त्। अनी॑कम्। चक्षुः॑। मि॒त्रस्य॑। वरु॑णस्य। अ॒ग्नेः। आ। अ॒प्राः॒। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। अ॒न्तरि॑क्षम्। सूर्य्यः॑। आ॒त्मा। जग॑तः। त॒स्थुषः॑। च॒। स्वाहा॑ ॥४२॥


    स्वर रहित मन्त्र

    चित्रन्देवानामुदगादनीकञ्चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्नेः । आप्रा द्यावापृथिवी अन्तरिक्षँ सूर्य ऽआत्मा जगतस्तस्थुषश्च स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    चित्रम्। देवानाम्। उत्। अगात्। अनीकम्। चक्षुः। मित्रस्य। वरुणस्य। अग्नेः। आ। अप्राः। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। अन्तरिक्षम्। सूर्य्यः। आत्मा। जगतः। तस्थुषः। च। स्वाहा॥४२॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 42
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानों, तुम्हांसाठी हे उचित आणि हितकर कर्म आहे की तुम्ही (सूर्य्य:) सूर्य जो (स्वाहा) आपल्या सत्य क्रियां व प्रभावाद्वारे (देवानाम्) विद्वज्जनांच्या नेत्राप्रमाणे आहे (सूर्यामुळे विद्वज्जन अध्ययन दर्शनादी कार्य करू शकतात) तो सूर्य (मित्रस्य) सर्वांचा मित्र अथवा प्राण असून (वरूणस्य)) सर्वाहून श्रेष्ठ वा उदानाप्रमाणे आहे (अग्ने:) अग्नीप्रमाणे (चित्रम्) अद्भुत आहे (अनीकम्) बलवान सैन्याप्रमाणे (चक्षु:) आपले प्रभावशाली गुण दाखवितो आणि (उतत्त) (अगात्) सर्वांना चांगल्याप्रकारे प्राप्त होतो (सूर्य सर्वांना सारखेपणाने मित्रवत लाभ देतो). तो सूर्य (जगत:)च्या गतिमान, जंगम प्राण्याच्या आणि (तस्थुष:) स्थावर सांसारिक पदार्थांच्या (आत्मा) आत्म्याप्रमाणे आहे, तसेच (द्यावापृथिवी) आकाशाला आणि भूमीला व (अन्तरिक्षम्) अंतरिक्षाला (आ) सर्वत: (अपा:) व्याप्त करून असतो. हे मनुष्यांनो, सूर्याप्रमाणे परमात्यादेखील सर्वत: सर्वव्यापी असल्यामुळे त्या (सर्वांचा मित्र, अद्भुत अवर्णनीय, बलवान, जंगम-स्थावरामध्ये व्याप्त अशा) परमात्म्याची उपासना तुम्ही नित्य निरंतर करीत जा. ॥42॥

    भावार्थ - भावार्थ - परमेश्वर आकाशाप्रमाणे सर्वत्र व्याप्त आहे. सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशमान आहे आणि सूत्रात्मा वायूप्रमाणे सर्वांतरयामी आहे. त्यामुळे तोच सर्व प्राण्यांना सत्य आणि असत्याचे ज्ञान करून देणारा आहे. जो कोणी माणसाला परमेश्वराला जाणून घेण्याची इच्छा असेल, तो परमेश्वराला योभाभ्यासाद्वारे आपल्या आत्म्यातच पाहू शकतो, अन्यत्र नव्हे. ॥42॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top