Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 45
    ऋषिः - आङ्गिरस ऋषिः देवता - प्रजापतिर्देवता छन्दः - विराट जगती, स्वरः - निषादः
    3

    रू॒पेण॑ वो रू॒पम॒भ्यागां॑ तु॒थो वो वि॒श्ववे॑दा॒ विभ॑जतु। ऋ॒तस्य॑ प॒था प्रेत॑ च॒न्द्रद॑क्षिणा॒ वि स्वः॒ पश्य॒ व्यन्तरि॑क्षं॒ यत॑स्व सद॒स्यैः॥४५॥

    स्वर सहित पद पाठ

    रूपेण॑। वः॒। रू॒पम्। अ॒भि। आ। अ॒गा॒म्। तु॒थः। वः॒। वि॒श्ववे॑दा॒ इति॑ वि॒श्वऽवेदाः। वि। भ॒ज॒तु॒। ऋ॒तस्य॑। प॒था। प्र। इ॒त॒। च॒न्द्रद॑क्षिणा॒ इति॑ च॒न्द्रऽद॑क्षिणाः। वि। स्व॒रिति॒ स्वः᳖। पश्य॑। वि। अ॒न्तरि॑क्षम्। यत॑स्व। स॒द॒स्यैः᳖ ॥४५॥


    स्वर रहित मन्त्र

    रूपेण वो रूपमभ्यागान्तुथो वो विश्ववेदा वि भजतु । ऋतस्य पथा प्रेत चन्द्रदक्षिणाः वि स्वः पश्य व्यन्तरिक्षँयतस्व सदस्यैः ॥


    स्वर रहित पद पाठ

    रूपेण। वः। रूपम्। अभि। आ। अगाम्। तुथः। वः। विश्ववेदा इति विश्वऽवेदाः। वि। भजतु। ऋतस्य। पथा। प्र। इत। चन्द्रदक्षिणा इति चन्द्रऽदक्षिणाः। वि। स्वरिति स्वः। पश्य। वि। अन्तरिक्षम्। यतस्व। सदस्यैः॥४५॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 45
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (कोणी विद्यावन म्हणत आहे) हे सैनिक हो आणि प्रजाजन हो, मी (रुपेण) आपल्या दृष्टीने (व:) तुमच्या (रुपम्) स्वरूपात (अभि) (आ) अगाम्) प्राप्त होत आहे (माझ्याप्रमाणे तुम्हांला व तुमच्याप्रमाणे स्वत:ला पाहत आहे, सर्वांना आपला मानत आहे ) म्हणून (विश्ववेदा:) सर्वज्ञानी परमेश्वराप्रमाणे या सभाध्यक्षाने देखील (व:) तुम्हांला (सैनिकांना आपण प्रजाजनांना) (वि) (भजतु) आपापल्या तुमच्या वेगवेगळ्या अधिकारात नेमावे. हे सभापती, (तुथ:) तुम्ही सर्वांपेक्षा अधिक ज्ञानी आणि प्रतिष्ठित आहात (स्व:) प्रतापी सूर्याप्रमाणे (ऋतस्य) सत्याच्या (पथा) मार्गाने (अन्तरिक्षम्) विशाल राजनीतीला वा ब्रह्मज्ञानाला (वि) अनेकप्रकारे (पश्म) पहा. (तुमचे राजकारण व ज्ञान सूर्याप्रमाणे स्वच्छ, प्रतापी व सत्यमार्गावर चालणारे असावे.) तुम्ही सभेमध्ये (सदस्यै:) सभासदांसह सत्यमार्गाने (प्र) (यतस्व) चालण्याचे विशेष यत्न करा. (चन्द्रदक्षिणा:) युवर्णाचे दान करणार्‍या हे धनिक राज्यधिकारीगण, तुम्ही धर्माचा (वीत) विशेषरूपेण अवलंब करा ॥45॥

    भावार्थ - भावार्थ - सेनापतीचे कर्त्तव्य आहे की त्याने आपल्या सैनिकांना आणि प्रजाजनांना आपल्या पुत्राप्रमाणे मानावे आणि त्यांना प्रसन्न ठेवो. तसेच पक्षपात न करता परमेश्वराप्रमाणे त्या सर्वांशी न्याययुक्त आचरण करावे. (राज्यात सुशासन आणि सुप्रबन्ध होण्याकरिता आवश्यक आहे की) धार्मिक सभ्यजनांच्या तीन सभा असाव्यात. त्यापैकी पहिली सभा म्हणजे-राज्यसभा, या सभेच्या अधीन राज्याची सर्व कार्यें संचालित व्हावीत आणि सर्व उपद्रव वा विघ्न-बाधा दूर व्हाव्यात. दुसरी सभा म्हणजे विद्यासभा, या विद्यासभेद्वारे अनेकप्रकारे विद्येचा प्रसार व्हावा आणि अज्ञान अविद्येचा नाश व्हवा. तिसरी आहे धर्मसभा- या सभेद्वारे सदैव धर्माची उन्नती आणि अधर्माची हानी व्हावी. याशिवाय सर्व लोकांसाठी आवश्यक आहे की त्यानी आपल्या आत्म्याला साक्ष ठेवून व परमेश्वराला सर्वव्यापी जाणून अन्याय्य मार्गापासून दूर रहावे, धर्माचे पालन करावे आणि सभासदांशी समयानुकूल अनेक प्रकारे विचार-विनियम करून सत्य असत्याचा निर्णय करण्याच्या कामीं सदैव यत्नशील असावे. ॥45॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top