Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 21
    ऋषिः - वत्सार काश्यप ऋषिः देवता - सोमो देवता छन्दः - स्वराट् ब्राह्मी त्रिष्टुप्,याजुषी जगती स्वरः - धैवतः, निषादः
    7

    सोमः॑ पवते॒ सोमः॑ पवते॒ऽस्मै ब्रह्म॑णे॒ऽस्मै क्ष॒त्राया॒स्मै सु॑न्व॒ते यज॑मानाय पवतऽइ॒षऽऊ॒र्जे प॑वते॒ऽद्भ्यऽओष॑धीभ्यः पवते॒ द्यावा॑पृथि॒वाभ्यां॑ पवते सुभू॒ताय॑ पवते॒ विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्य॑ऽए॒ष ते॒ योनि॒र्विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्यः॑॥२१॥

    स्वर सहित पद पाठ

    सोमः॑। प॒व॒ते॒। सोमः॑। प॒व॒ते॒। अ॒स्मै। ब्रह्म॑णे। अ॒स्मै। क्ष॒त्राय॑। अ॒स्मै। सु॒न्व॒ते। यज॑मानाय। प॒व॒ते॒। इ॒षे। ऊ॒र्ज्जे। प॒व॒ते॒। अ॒द्भ्यऽइत्य॒त्ऽभ्यः। ओष॑धीभ्यः। प॒व॒ते॒। द्यावा॑पृथि॒वीभ्या॑म्। प॒व॒ते॒। सु॒भूतायेति॑ सुऽभू॒ताय॑। प॒व॒ते॒। विश्वे॑भ्यः। त्वा॒। दे॒वेभ्यः॑। ए॒षः। ते॒। योनिः॑। विश्वे॑भ्यः। त्वा॒। दे॒वेभ्यः॑ ॥२१॥


    स्वर रहित मन्त्र

    सोमः पवते सोमः पवतेस्मै ब्रह्मणेस्मै क्षत्रायास्मै सुन्वते यजमानाय पवतऽइष ऊर्जे पवतेद्भ्य ओषधीभ्यः पवते द्यावापृथिवीभ्याम्पवते सुभूताय पवते विश्वेभ्यस्त्वा देवेभ्यऽएष ते योनिर्विश्वेभ्यस्त्वा देवेभ्यः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सोमः। पवते। सोमः। पवते। अस्मै। ब्रह्मणे। अस्मै। क्षत्राय। अस्मै। सुन्वते। यजमानाय। पवते। इषे। ऊर्ज्जे। पवते। अद्भ्यऽइत्यत्ऽभ्यः। ओषधीभ्यः। पवते। द्यावापृथिवीभ्याम्। पवते। सुभूतायेति सुऽभूताय। पवते। विश्वेभ्यः। त्वा। देवेभ्यः। एषः। ते। योनिः। विश्वेभ्यः। त्वा। देवेभ्यः॥२१॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 21
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वज्जनहो, हा (सोम:) सौम्यगुणयुक्त राजा (अस्मै) या ब्रह्मणे) परमेश्वर वा वेदांच्या ज्ञानप्राप्तीसाठी यज्ञ करणार्‍या ज्ञानी मनुष्यासाठी (पवते) पवित्र होतो (विद्वानांसाठी अनुकुल होऊन त्यांच्या ज्ञानसंपादन कार्यात सहायकारी होतो.) हा राजा (अस्मै) या (क्षत्राय) क्षात्रधर्मासाठी (पवते) ज्ञानवान होतो (वा आहे) (अस्मै) या सुन्वते) विद्यासंपादन, आणि सिद्धांत-शोध करणार्‍या (यजमानाय) संगतीस योग्य अशा उत्तम विद्वानासाठी हा राजा (पवते) निर्मळ हृदय होतो वा आहे, (इषे) राज्यात अन्नाची वृद्धी आणि (ऊर्ज्जे) पराक्रमाच्या उन्नत्तीसाठी (पवते) पवित्रतेने कार्य करीत आहे. हा निपुण राजा (अद्भ्य:) जलाचा/प्राणाचा व (ओषधीभ्य:) सोम आदी औषधींचा (पवते) ज्ञाता आहे (जल व वनस्पतींच्या गुणांना ओळखून त्यांचा उपयोग करण्यात कुशल आहे) (द्यावापृथिवीभ्याम्) सूर्य आणि पृथ्वीसाठी हा (पवते) शुद्ध आहे (त्यांचा यथोचित उपयोग घेत आहे) (सुभूताय) उत्तम आचरणासाठी झटणारा आणि (पवते) दुष्कर्मापासून दूर राहणारा आहे. सर्व सभासद आणि प्रजाजन यांच्यासाठीही हेच उचित आहे की त्यांनीही (सोम:) राजाला यथोचितरुपाने जाणावे व उचित मान-आदर द्यावा. हे राजन्, सभाअन आणि प्रजाजन, (स्व:) हा राजधर्म (ते) आपल्या सर्वांचे (योनि:) घर (वा कार्यक्षेत्र) आहे. (त्वा) आपणा सर्वांना आम्ही (नागरिकजन) (विश्वेभ्य:) संपूर्ण दिव्यगुणांच्या प्राप्तीसाठी आपला स्वीकार करतो. (राजा, सभासद आणि विद्वान यांना सर्व नागरिकांनी आदर्श नेता मानून त्यांच्या मार्गाने चालावे.) ॥21॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे चंद्र सर्व जगाकरिता हितकारी आहे आणि राजा हा सभाजन व प्रजाजनांकरिता उपकारक, धर्मानुकुल आचरण करणारा असतो, त्याचप्रमाणे सभाजनांनी व प्रजाजनांनी राजाशी त्याचरितीने वागावे उत्तम आचरण करणारा, उत्तम गुण ग्रहण करणारा आणि उत्तम कर्म करणारा सभासद तसेच राजा न्यायकारी असू शकतो. त्याचप्रमाणे जे धर्मात्मा पुरूष आहे तोच प्रजाजनांमध्ये अग्रगण्य व अनुकरणीय मानला जातो. तात्पर्य हे की या तिघांनी जर एकमेकांशी प्रेमपूर्ण आचरण व प्रामाणिक पुरुषार्थभाव ठेवला, तरच ते सर्व विद्येपासून सर्व गुणाची तसेच पृथ्वी आदी पदार्थांची प्राप्ती करू शकतात आणि अखिल सुख उपभोगू शकतात ॥21॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top