Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 9
    ऋषिः - गृत्समद ऋषिः देवता - मित्रावरुणौ देवते छन्दः - आर्षी गायत्री,आसुरी गायत्री स्वरः - षड्जः
    5

    अ॒यं वां॑ मित्रावरुणा सु॒तः सोम॑ऽऋतावृधा। ममेदि॒ह श्रु॑त॒ꣳ हव॑म्। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि मि॒त्रावरु॑णाभ्यां त्वा॥९॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒यम्। वाम्। मि॒त्रा॒व॒रु॒णा॒। सु॒तः। सोमः॑। ऋ॒ता॒वृ॒धेत्यृ॑तऽवृधा। मम॑। इत्। इ॒ह। श्रु॒त॒म्। हव॑म्। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। मि॒त्रावरु॑णाभ्याम्। त्वा॒ ॥९॥


    स्वर रहित मन्त्र

    अयँवाम्मित्रावरुणा सुतः सोमऽऋतावृधा । ममेदिह श्रुतँ हवम् । उपयामगृहीतोसि मित्रावरुणाभ्यां त्वा ॥


    स्वर रहित पद पाठ

    अयम्। वाम्। मित्रावरुणा। सुतः। सोमः। ऋतावृधेत्यृतऽवृधा। मम। इत्। इह। श्रुतम्। हवम्। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। मित्रावरुणाभ्याम्। त्वा॥९॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 9
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (मित्रावरूणा) प्राण आणि उदान यांच्याप्रमाणे कार्यप्रवृत्त असणार्‍या योगाध्यापक व योगसाधकही, तुम्ही दोघे (ऋतावृधा) सत्यांची व विज्ञानाची वृद्धी करणारी योगविद्या शिकविता/शिकता. (वाय्) तुम्हा दोघांनी (अयम्) हे (सोम:) योगरुप ऐश्वर्य (सुत:) प्राप्त वा अर्जित केले आहे. त्या योगविद्येद्वारे तुम्ही (इह) इथे (या जगात) (मम) योगविद्येवर प्रीती करणार्‍या अशा मी करीत असलेल्या तुमच्या (हवम्) स्तुतीस माझ्याद्वारे केली जाणारी तुमची (हवम्) स्तुती (श्रुतम्) ऐका (प्रसन्न होऊन मला योगविद्येपासून प्राप्त होणार्‍या लाभांची प्राप्ती करून द्या) - (योगाध्यापक म्हणतात) हे यजमान, (उपयामगृहीत:) उत्तम नियमांनी बद्ल करून मी (इत्) निश्चयाने स्वीकार (असि) करीत आहे. मी (मित्रावरूणाभ्यासम्) प्राण आणि उदान जसे शरीरास धारण वा ग्रहण करतात, त्याप्रमाणे मी (त्वा) तुला ग्रहण करीत आहे ( योगविद्येचे लाभ सांगून वा शिकवून तुला उपकृत करीत आहे) ॥9॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांसाठी उचित आहे की त्यांनी योगविद्या शिकावी, श्रेष्ठ पुरुषांचा उपदेश ऐकावा आणि यम-नियम आदीद्वारे योगाभ्यासाचे आचरण करावे. ॥9॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top