Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 23/ मन्त्र 50
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - ईश्वरो देवता छन्दः - निचृत त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    6

    अपि॒ तेषु॑ त्रि॒षु प॒देष्व॑स्मि॒ येषु॒ विश्वं॒ भुव॑नमा वि॒वेश॑।स॒द्यः पर्ये॑मि पृथि॒वीमु॒त द्यामेके॒नाङ्गे॑न दि॒वोऽअ॒स्य पृ॒ष्ठम्॥५०॥

    स्वर सहित पद पाठ

    अपि॑। तेषु॑। त्रि॒षु। प॒देषु॑। अ॒स्मि॒। येषु॑। विश्व॑म्। भुव॑नम्। आ॒वि॒वेशेत्या॑ऽवि॒वेश॑। स॒द्यः। परि॑। ए॒मि॒। पृ॒थि॒वीम्। उ॒त। द्याम्। एके॑न। अङ्गे॑न। दि॒वः। अ॒स्य। पृ॒ष्ठम् ॥५० ॥


    स्वर रहित मन्त्र

    अपि तेषु त्रिषु पदेष्वस्मि येषु विश्वम्भुवनमाविवेश । सद्यः पर्येमि पृथिवीमुत द्यामेकेनाङ्गेन दिवोऽअस्य पृष्ठम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अपि। तेषु। त्रिषु। पदेषु। अस्मि। येषु। विश्वम्। भुवनम्। आविवेशेत्याऽविवेश। सद्यः। परि। एमि। पृथिवीम्। उत। द्याम्। एकेन। अङ्गेन। दिवः। अस्य। पृष्ठम्॥५०॥

    यजुर्वेद - अध्याय » 23; मन्त्र » 50
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (परमेश्‍वराने या मंत्रात वरील प्रश्‍नाचे उत्तर दिले आहे) हे मनुष्यांनो, समस्त सृष्टीचा रचयिता मी परमेश्‍वर (येषु) ज्या (सर्व पदार्थांच्या अथवा जीवांच्या) जन्म नाम आणि स्थान या (त्रिषु) तीन (पदेषु) स्थितीत आणि (विश्‍वम्) सार्‍या (भुवनम्) जगात (आमिनेश) सर्वत्र सर्व दिशांना प्राप्त झालेला म्हणजे सर्वव्यापी आहे. (तेषु) त्या जन्म, नाम आणि स्थान यामधे (अपि) देखील मी व्याप्त (अस्मि) आहे. तसेच मी (अस्य) या (दिनः) प्रकाशमान सूर्य आदी लोकांच्या (पृष्ठम्) वरच्या भागात तसेच (पृथिवीम्) भूमी वा अंतरिक्षात (उत) आणि (द्याम्) समस्त प्रकाशित स्थानात (एकेन) (अद्वेःन) एक अतिसुंदर कर्तव्य कर्मात वा स्थानात (सद्यः) शीघ्र (परि, एमि) सर्वथा सर्वदिंशानी व्याप्त आहे. अशा स्वरूपाच्या या माझी, ईश्‍वराची तुम्ही सर्वजण उपासना करा वा करीत जा ॥50॥

    भावार्थ - भावार्थ - ईश्‍वर सर्व जीवांना उपदेश करीत आहे की मी सर्व कार्य कारणात्म जगात व्याप्त आहे. एकदेखील परमाणू असा नाही मी ज्यात मी नाही. जेथे जग वा सृष्टी नाही. तिथेही मी आपल्या अनंत स्वरूपाने परिपूर्णतः व्याप्त आहे. तुम्ही लोक ज्या या विशाल जगाला पाहत आहात, ते सर्व जग, समस्त सृष्टी माझ्यासमोर अणुमात्रही नाही. सर्व विद्वानांनी माझे हे स्वरूप जाणून घ्यावे आणि इतर सर्वांनाही तसे सांगावे. ॥50॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top