Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 23/ मन्त्र 12
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - विद्युदादयो देवताः छन्दः - निचृदनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    द्यौरा॑सीत् पू॒र्वचि॑त्ति॒रश्व॑ऽआसीद् बृ॒हद्वयः॑। अवि॑रासीत् पिलिप्पि॒ला रात्रि॑रासीत् पिशङ्गि॒ला॥१२॥

    स्वर सहित पद पाठ

    द्यौः। आ॒सी॒त्। पू॒र्वचि॑त्ति॒रिति॑ पू॒र्वऽचि॑त्तिः। अश्वः॑। आ॒सी॒त्। बृ॒हत्। वयः॑। अविः॑। आ॒सी॒त्। पि॒लि॒प्पि॒ला। रात्रिः॑। आ॒सी॒त्। पि॒श॒ङ्गि॒ला ॥१२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    द्यौरासीत्पूर्वचित्तिः अश्वऽआसीद्बृहद्वयः । अविरासीत्पिलिप्पिला रात्रिरासीत्पिशङ्गिला ॥


    स्वर रहित पद पाठ

    द्यौः। आसीत्। पूर्वचित्तिरिति पूर्वऽचित्तिः। अश्वः। आसीत्। बृहत्। वयः। अविः। आसीत्। पिलिप्पिला। रात्रिः। आसीत्। पिशङ्गिला॥१२॥

    यजुर्वेद - अध्याय » 23; मन्त्र » 12
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे जिज्ञासूजनहो, (पूर्वचित्तिः) स्मृतीचा प्रथम विषय (घौः) दिव्यगुण देणारा पाऊस (आसीत्) आहे. (तीव्र दाहक उन्हाळ्यानंतर देणारी पावसाळ्यातील पहिली वृष्टी केवढी आनंददायी व उपकारक असते. ती कायम लक्षात राहते) (बृहत्) विशाल (वयः) उडरार्‍या (अश्‍वः) आकाश मार्गावर धावणार्‍या पक्ष्यांप्रमाणे (अग्निः) अग्नि (आसीत्) आहे. (तो सर्वत्र व्याप्त आहे) (पिलिप्पिला) पावसामुळे लिबलिबीत व चिक्कण झालेली वस्तू (अविः) अन्न आदी देऊन प्राण्यांचे जीवरक्षण करणारी पृथ्वी (आसीत्) आहे. आणि (पिशंगिली) प्रकाशाला गिळणारी वस्तू म्हणजे सर्वत्र अंधार फैलावणारी वस्तू (रात्रिः) रात्र (आसीत्) आहे. अशाप्रकारे मागील मंत्राच्या प्रश्‍नांची ही उत्तरे आहेत, हे समजून घ्या ॥12॥

    भावार्थ - भावार्थ - हवनातील अग्नी आणि सूर्यरूपातील अग्नी आपल्या उष्णतोची गुणांमुळे समृद्ध होणारा आणि अन्न आदीद्वारे जगाच्या स्थिरता वा जीवनाचे कारण आहे- पाऊस. पावसामुळे ही पृथ्वी औषधी आदी उत्तम पदार्थांने समृद्ध होते आणि सूर्यरूप अग्नीमुळेच सर्व सर्व प्राण्यांना विश्रांती देणारी रात्र येत असते. ॥12॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top