Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 29/ मन्त्र 16
    ऋषिः - भार्गवो जमदग्निर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृत त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    इ॒मा ते॑ वाजिन्नव॒मार्ज॑नानी॒मा श॒फाना॑ सनि॒तुर्नि॒धाना॑।अत्रा॑ ते भ॒द्रा र॑श॒नाऽअ॑पश्यमृ॒तस्य॒ याऽअ॑भि॒रक्ष॑न्ति गो॒पाः॥१६॥

    स्वर सहित पद पाठ

    इ॒मा। ते॒ वा॒जि॒न्। अ॒व॒मार्ज॑ना॒नीत्य॑व॒ऽमार्ज॑नानि। इ॒मा। श॒फाना॑म्। स॒नि॒तुः। नि॒धानेति॑ नि॒ऽधाना॑। अत्र॑। ते॒। भ॒द्राः। र॒श॒नाः। अ॒प॒श्य॒म्। ऋ॒तस्य॑। याः। अ॒भि॒रक्ष॒न्तीत्य॑भि॒ऽरक्ष॑न्ति। गो॒पाः ॥१६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    इमा ते वाजिन्नवमार्जनानीमा शफानाँ सनितुर्निधाना । अत्रा ते भद्रा रशनाऽअपश्यमृतस्य याऽअभिरक्षन्ति गोपाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    इमा। ते वाजिन्। अवमार्जनानीत्यवऽमार्जनानि। इमा। शफानाम्। सनितुः। निधानेति निऽधाना। अत्र। ते। भद्राः। रशनाः। अपश्यम्। ऋतस्य। याः। अभिरक्षन्तीत्यभिऽरक्षन्ति। गोपाः॥१६॥

    यजुर्वेद - अध्याय » 29; मन्त्र » 16
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (वाजिन्) घोड्याप्रमाणे (विद्यादीक्षेत्रात) वेग आदी गुणांनी सुशोभित हे सेनाधीश, मी (एक अश्‍वसेवक वा साईस) (ते) आपल्या (इमा) या तबेल्यातील घोड्यांची (अवमार्जनानी) (स्वच्छ करणे, खरारा करणे आदी) शुद्धी क्रिया करतो तसेच (इमा) या (शफानाम्) खुर आदी स्वच्छ ठेवणे आदी विषयक (सनितुः) नियमांचे पालन करीत अश्‍वाच्या अन्य (निधाना) अवयवांचेही निरीक्षण करतो (अवयवांच्या स्वच्छतेविषयी काळजी घेतो) (अत्र) या सैन्यात (ते) आपल्या घोड्याचा (या) हा जो (रशनाः) लगाम आहे, तो (भद्राः) सुंदर, शुभ व दृढ असून (गोपाः) कोणत्या ही उपद्रवापासून रक्षण करणारा आहे. तो लगाम (ऋतस्य) सत्याची (युद्धाच्या व अश्‍वारोहण कलेच्या नियमांची) (अभिरक्षन्ति) सर्वतः रक्षा करणारा आहे. मी (अश्‍वसेवक) हे सर्व पाहत आहे. (अश्‍वपालनाविषयी पूर्णतः जागरूक आहे) हे सेवाधीश, आपणही हे सर्व पाहून घ्या (मी जे म्हणत आहे, ते सत्य असल्याची खात्री करून घ्या) ॥16॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक घोड्याला स्नान, खरारा आदीद्वारे स्वच्छ ठेवतात, त्याच्या खुरांसाठी लोखंडी नाल वापरतात, तसेच लगाम आणि अश्‍वारोहणासाठी आवश्यक साहित्य तयार ठेवतात. आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण देतात, ते लोक युद्धादी कार्यात आपले लक्ष्य पूर्ण करू शकतात. ॥16॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top