Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 29/ मन्त्र 32
    ऋषिः - भार्गवो जमदग्निर्ऋषिः देवता - विद्वांसो देवता छन्दः - आर्षी स्वरः - धैवतः
    2

    दैव्या॒ होता॑रा प्रथ॒मा सु॒वाचा॒ मिमा॑ना य॒ज्ञं मनु॑षो॒ यज॑ध्यै।प्र॒चो॒दय॑न्ता वि॒दथे॑षु का॒रू प्रा॒चीनं॒ ज्योतिः॑ प्र॒दिशा॑ दि॒शन्ता॑॥३२॥

    स्वर सहित पद पाठ

    दैव्या॑। होता॑रा। प्र॒थ॒मा। सु॒वाचेति॑ सु॒ऽवाचा॑। मिमा॑ना। य॒ज्ञम्। मनु॑षः। यज॑ध्यै। प्र॒चो॒दय॒न्तेति॑ प्रऽचो॒दय॑न्ता। वि॒दथे॑षु। का॒रूऽइति॑ का॒रू। प्रा॒चीन॑म्। ज्योतिः॑। प्र॒दिशेति॑ प्र॒ऽदिशा॑। दि॒शन्ता॑ ॥३२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    दैव्या होतारा प्रथमा सुवाचा मिमाना यज्ञम्मनुषो यजध्यै । प्रचोदयन्ता विदथेषु कारू प्राचीनञ्ज्योतिः प्रदिशा दिशन्ता ॥


    स्वर रहित पद पाठ

    दैव्या। होतारा। प्रथमा। सुवाचेति सुऽवाचा। मिमाना। यज्ञम्। मनुषः। यजध्यै। प्रचोदयन्तेति प्रऽचोदयन्ता। विदथेषु। कारूऽइति कारू। प्राचीनम्। ज्योतिः। प्रदिशेति प्रऽदिशा। दिशन्ता॥३२॥

    यजुर्वेद - अध्याय » 29; मन्त्र » 32
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (दैव्या) सर्व विद्वानांत कुशल असलेले (होतारा) जे दोघे शिल्पी वा कारागीर आहेत) ते दानशील (इतरांना ते शिल्प शिकविणारे) आहेत (प्रथमा) ते प्रसिद्ध (सुवाचा) प्रशंसनीय वाणी बोलणारे असून (यज्ञम्) संगतीरूप यज्ञ (यजध्यै) करण्यासाठी (मनुषः) मनुष्यानां (इतरांना) (विदथेषु) विज्ञानक्षेत्रात (प्रचोदयन्ता) प्रेरणा देणारे आहेत. (त्यांनाही विज्ञान वा शिल्प शिकवतात) (प्रदिशा) वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे (प्राचीनम्) ते प्राचीन (तंत्र) अथवा (ज्योतिः) शिल्पविद्या इतरांसाठी प्रकाशित करतात. असे (दिशन्ता) सर्वांना (ज्ञान, विज्ञान, तंत्र) यांचा उपदेश सांगत (कारू) ते जे कुशलतम कारागीर वा शिल्पी आहेत, त्यांच्याकडून सर्वांनी शिल्पविज्ञान शास्त्र शिकले पाहिजे ॥32॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात (कारू) शब्दात द्विवचन आहे, त्यामुळे त्या शब्दातून अध्यापक आणि हस्तकला शिक्षक या दोन्ही शिल्पिजनांचा उल्लेख अभिप्रेत आहे. जे कारागीर वा शिल्पी आहेत, त्यांना जेवढी शिल्पविद्या अवगत असेल, तेवढी त्यानी दुसर्‍यांना शिकवावी की ज्यायोगे विद्येची उत्तरोत्तर उन्नती होत राहील. ॥32॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top