Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 29/ मन्त्र 27
    ऋषिः - भार्गवो जमदग्निर्ऋषिः देवता - विद्वान् देवता छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    नरा॒शꣳस॑स्य महि॒मान॑मेषा॒मुप॑ स्तोषाम यज॒तस्य॑ य॒ज्ञैः।ये सु॒क्रत॑वः॒ शुच॑यो धिय॒न्धाः स्वद॑न्ति दे॒वाऽउ॒भया॑नि ह॒व्या॥२७॥

    स्वर सहित पद पाठ

    नरा॒शꣳस॑स्य। म॒हि॒मान॑म्। ए॒षा॒म्। उप॑। स्तो॒षा॒म॒। य॒ज॒तस्य॑। य॒ज्ञैः। ये। सु॒क्रत॑व॒ इति॑ सु॒ऽक्रत॑वः। शुच॑यः। धि॒य॒न्धा इति॑ धिय॒म्ऽधाः। स्वद॑न्ति। दे॒वाः। उ॒भया॑नि। ह॒व्या ॥२७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नराशँसस्य महिमानमेषामुप स्तोषाम यजतस्य यज्ञैः । ये सुक्रतवः शुचयो धियन्धाः स्वदन्ति देवाऽउभयानि हव्या ॥


    स्वर रहित पद पाठ

    नराशꣳसस्य। महिमानम्। एषाम्। उप। स्तोषाम। यजतस्य। यज्ञैः। ये। सुक्रतव इति सुऽक्रतवः। शुचयः। धियन्धा इति धियम्ऽधाः। स्वदन्ति। देवाः। उभयानि। हव्या॥२७॥

    यजुर्वेद - अध्याय » 29; मन्त्र » 27
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे आम्ही विद्वान लोक (ये) जे (सुक्रतवः) बुद्धीयुक्त उत्तम कर्म करणारे असून (शुचयः) पवित्र राहून (धियन्धाः) श्रेष्ठ धारणवती बुद्धी आणि कर्म यांचे आचरण करतो आणि आम्ही (सेवाः) विद्वज्जन (उभयानि) शरीर व आत्मा दोन्हीला सुखविणार्‍या, आनंद देणार्‍या (हव्या) भोज्यपदार्थांचे (स्वदन्ति) स्वाद घेतो वा सेवन करतो. तसेच आम्ही (एषेम्) या आमच्यापेक्षा श्रेष्ठ विद्वानांच्या (यज्ञैः) सत्संगरूप यज्ञ करीत (नराशंसस्य) सर्व मनुष्यांद्वारे प्रशंसित (यजतस्य) संगतीकरण व्यवहाराच्या (महिमानम्) महत्त्व वा मोठेपणाची (उप, स्तोषेम) सर्वांजवळ प्रशंसा करतो (त्या विद्वानांचे कर्म श्रेष्ठ व यज्ञविधी सर्वात्तम आहे, आम्ही त्याची प्रशंसा करतो, त्याप्रमाणे हे मनुष्यांनो, तुम्हीही त्यांची यासाठी प्रशंसा करा. ॥27॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक स्वतः पवित्र, बुद्धिमान आणि वेदज्ञाता नसतात, ते इतरांना कदापी तसे करू शकत नाही. ज्या मनुष्यांचे गुण, कर्म चांगले व प्रशंसनीय असतात, धर्मात्माजनांनी त्यांची यथार्थ प्रशंसा केली पाहिजे. ॥27॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top