Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 27
    ऋषिः - कुत्स ऋषिः देवता - रुद्रा देवताः छन्दः - निचृच्छक्वरी स्वरः - धैवतः
    3

    नम॒स्तक्ष॑भ्यो रथका॒रेभ्य॑श्च वो॒ नमो॒ नमः॒ कुला॑लेभ्यः क॒र्मारेभ्यश्च वो॒ नमो॒ नमो॑ निषा॒देभ्यः॑ पु॒ञ्जिष्ठे॑भ्यश्च वो॒ नमो॒ नमः॑ श्व॒निभ्यो॑ मृग॒युभ्य॑श्च वो॒ नमः॑॥२७॥

    स्वर सहित पद पाठ

    नमः॑। तक्ष॑भ्य॒ इति॒ तक्ष॑ऽभ्यः। र॒थ॒का॒रेभ्य॒ इति॑ रथऽका॒रेभ्यः॑। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। कुला॑लेभ्यः। क॒र्मारे॑भ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। नि॒षा॒देभ्यः॑। नि॒सा॒देभ्य॑ इति निऽसा॒देभ्यः॑। पु॒ञ्जिष्ठे॑भ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। श्व॒निभ्य॒ इति॑ श्व॒निऽभ्यः॑। मृ॒ग॒युभ्य॒ इति॑ मृ॒ग॒युऽभ्यः॑। च॒। वः॒। नमः॑ ॥२७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कुर्मारेभ्यश्च वो नमो नमो निषादेभ्यः पुञ्जिष्टेभ्यश्च वो नमो नमः श्वनिभ्यो मृगयुभ्यश्च वो नमः श्वभ्यः ॥


    स्वर रहित पद पाठ

    नमः। तक्षभ्य इति तक्षऽभ्यः। रथकारेभ्य इति रथऽकारेभ्यः। च। वः। नमः। नमः। कुलालेभ्यः। कर्मारेभ्यः। च। वः। नमः। नमः। निषादेभ्यः। निसादेभ्य इति निऽसादेभ्यः। पुञ्जिष्ठेभ्यः। च। वः। नमः। नमः। श्वनिभ्य इति श्वनिऽभ्यः। मृगयुभ्य इति मृगयुऽभ्यः। च। वः। नमः॥२७॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 27
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो (प्रजाजनहा अथवा कारागीर, कर्मचारी लोकहो) ज्याप्रमाणे आम्ही राजा व राजपुरुष लोक (तक्षभ्य:) आवश्यक वस्तूंची निर्मिती मोठ्या कौशल्याने करणार्‍या (अथवा वस्तूंना कापून, लहान करून, घडवून यंत्रादी रुपात आणणार्‍या) कलाकारानां (नम:) अन्न देतो (च) आणि (रथकारेभ्य:) रथ, विमान आदी साधनांचे उत्पादन करणार्‍या (यांत्रिक तंत्रज्ञ, -------) (व:) तुम्हा लोकांचा (नम:) वेतन वा ------ देऊन यथोचित सन्मान करतो, (त्याप्रमाणे तुम्ही ---- -- इतर कर्मचार्‍यांचा सत्कार-सन्मान करावा) (आम्ही राज पुरुष) (कुलालेभ्य:) -------- सुंदर कलाकृती बनविणार्‍या कुंभार ---- आदी लोकांचा ----------------------- आदी पदार्थ देतो (च) आणि (कर्मारभ्य:) तलवार, बंदूक, तोफ आदी अस्त्रशस्त्र बनविणार्‍या (व:) तुम्हां अभियंत्रिक कर्मचार्‍यांना (नम:) सत्कार करतो (योग्यवेळी परितोषिक, पदक, प्रशस्तिपत्र आदीद्वारे सन्मानित करून तुम्हाला अधिक उत्तम कर्म करण्याकडे प्रवृत्त करतो) आम्ही (निषादेभ्य:) वन, दर्‍या-खोर्‍या, पर्वत आदी दुर्गम प्रदेशात राहून दृष्ट वा हिंसक प्राण्यांना ताडित करणार्‍या तुम्हा (वनरक्षकजनांचा) (नम:) सत्कार करतो (च) आणि (पुञ्जिष्ठेभ्य:) रंग कर्म (चित्रकारी) आदी कलांमधे तसेच अनेक भाषांमधे गती असणार्‍या (व:) तुम्हा रंगकर्मी व भाषाविद् जनांचा (नम:) सत्कार करतो (याप्रमाणे तुम्हीही इतरांचा आदर-मान करून त्यांना प्रोत्साहित करा) आम्ही राजपुरुष (श्वनिभ्य:) कुत्र्यांना प्रशिक्षित करणार्‍या तुम्हा श्वान प्रशिक्षकांना (नम:) अन्न, वेतन आदी देतो (च) आणि (मृगयुभ्य:) मनापासून वनातील हरिण आदी पशूंवर प्रेम करणार्‍या तुम्हा (वनरक्षक वा पशु-पालक) लोकांचा (नम:) सन्मान-सत्कार करतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील इतरांना मान देत जा (त्यानां अधिक उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करा)

    भावार्थ - भावार्थ - जे लोक भौतिकशास्त्र (अथवा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान) शिकून अद्भुत उत्कृष्ट वैज्ञानिक साधने बनवतात, विद्वज्जनांनी त्यांना पारितोषिक, पुरस्कार आदीद्वारे आनंदित केले पाहिजे. तसेच जे कुत्रे आदी प्राण्यांचे पालन करून त्याद्वारे रक्षण कार्यात प्रविण बनवितात, आणि त्यांचा (गुन्हा-अन्वेषण आदी ) कामी उपयोग करतात, त्या (सैनिक, पोलीस) लोकांना सदा सुखी व प्रसन्न ठेवावे. ॥27॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top