Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 4
    ऋषिः - परमेष्ठी ऋषिः देवता - रुद्रो देवता छन्दः - निचृदार्ष्यनुस्टुप् स्वरः - गान्धारः
    7

    शि॒वेन॒ वच॑सा॒ त्वा॒ गिरि॒शाच्छा॑ वदामसि। यथा॑ नः॒ सर्व॒मिज्जग॑दय॒क्ष्म सु॒मना॒ऽअस॑त्॥४॥

    स्वर सहित पद पाठ

    शि॒वेन॑। वच॑सा। त्वा॒। गिरि॒शेति॒ गिरि॑ऽश। अच्छ॑। व॒दा॒म॒सि॒। यथा॑। नः॒। सर्व॑म्। इत्। जग॑त्। अ॒य॒क्ष्मम्। सु॒मना॒ इति॑ सु॒ऽमनाः॑। अस॑त् ॥४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि । यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मँ सुमना असत् ॥


    स्वर रहित पद पाठ

    शिवेन। वचसा। त्वा। गिरिशेति गिरिऽश। अच्छ। वदामसि। यथा। नः। सर्वम्। इत्। जगत्। अयक्ष्मम्। सुमना इति सुऽमनाः। असत्॥४॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 4
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे गिरिश) पर्वतीय प्रदेशात राहणार्‍या अथवा मेघात राहणार्‍या (मेघवृष्टीमुळे उत्पन्न विविध रोगनाशक औषधींचे ज्ञान असणार्‍या) हे वैद्यराज, आपण (सुमना:) प्रसन्नचित्त राहून (यथा) ज्यायोगे (व:) आमचे राज्य (सर्वम्) सर्वदृष्टीने (जगत्) मनुष्य आदी प्राणी व जंगम आणि (नदी, पर्वत, भूमी, घरे) आदी स्थावर पदार्थांनी युक्त राहून (अयक्ष्मम्) क्षय आदी राजरोगापासून (असत्) युक्त राहील, असे करा. (इत्) तसेच आपल्या (शिवेन) कल्याणकारी मधुर (वचसा) वाणी मुळे (त्वा) आची आपल्याला (अचल वदामसि) उत्तम स्तुती करू व करीत आहोत. (आपण उत्तम रोगनाशक औषधींच ज्ञाता आहात आणि रोग्यांशी आपले वागणे बोलणे मधुर आहे, त्यामुळे आम्ही आपली प्रशंसा करतो) ॥4॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. जो माणूस वैद्यकशास्त्राचा गाढा पंडित आहे, ज्याने पर्वत आदी स्थानांत उगवणार्‍या औषधींची आणि तेथील जलाची व्यवस्थित माहिती घेतली आहे, आणि निष्कपट नि:स्वार्थीवृत्तीने सर्वांच्या कल्याणासाठी वैद्यक सेवा करीत असून ज्याची वाणी मधुर आहे, अशा प्रशंसनीय वैद्याचा सर्व लोकांनी अवश्य सत्कार करावा ॥4॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top