Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 35
    ऋषिः - कुत्स ऋषिः देवता - रुद्रा देवताः छन्दः - स्वराडार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    नमो॑ बि॒ल्मिने॑ च॒ कव॒चिने॑ च॒ नमो॑ व॒र्मिणे॑ च वरू॒थिने॑ च॒ नमः॑ श्रु॒ताय॑ च श्रुतसे॒नाय॑ च॒ नमो॑ दुन्दु॒भ्याय चाहन॒न्याय च॥३५॥

    स्वर सहित पद पाठ

    नमः॑। बि॒ल्मिने॑। च॒। क॒व॒चिने॑। च॒। नमः॑। व॒र्मिणे॑। च॒। व॒रू॒थिने॑। च॒। नमः॑। श्रु॒ताय॑। च॒। श्रु॒त॒से॒नायेति॑ श्रुतऽसे॒नाय॑। च॒। नमः॑। दु॒न्दु॒भ्या᳖य। च॒। आ॒ह॒न॒न्या᳖येत्याऽहन॒न्या᳖य। च॒ ॥३५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नमो बिल्मिने च कवचिने च नमो वर्मिणे च वरूथिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय चाहनन्याय च नमो धृष्णवे ॥


    स्वर रहित पद पाठ

    नमः। बिल्मिने। च। कवचिने। च। नमः। वर्मिणे। च। वरूथिने। च। नमः। श्रुताय। च। श्रुतसेनायेति श्रुतऽसेनाय। च। नमः। दुन्दुभ्याय। च। आहनन्यायेत्याऽहनन्याय। च॥३५॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 35
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे राजा आणि हे प्रजेतील प्रमुख जनहो, तुम्ही आपल्या सैन्यातील (बिमिल्ते) धैर्य धारण करणार्‍या अथवा शक्तिशाली (च) आणि (कवचिने) कवच धारण करणार्‍या सैनिकांचा (च) तसेच त्यांच्या सहायक सैनिकांचा (नम:) सत्कार करा. (सैनिकांना व सहाय्यक अधिकार्‍यांना पुरस्कार, पारितोषिक आदी देऊन सन्मानित करीत जा) तसचे (वर्मिणे) शरीर-रक्षणाकरिता उपयुक्त अशा अनेक साधनांनी संपन्न (च) आणि (वरूथिने) उत्तमगृह, (क्वार्टर्स वा छावण्या) यामधे राहणार्‍या सैनिकांना (च) आणि त्या घरांचे रक्षण करणार्‍या रक्षकांना (रम:) अन्न आदी देत जा. (सैनिकांच्या भोजन, निवास आदींची उत्तम सोय असावी.) तसेच (श्रुताय) गुणांमुळे प्रख्यात असलेल्या (च) आणि (श्रुतसेनाय) विख्यात वीर सैन्य जवळ बाळगणार्‍या सेनाधिकार्‍याचा (च) तसेच सेनेतील अन्य लोकांचा (नम:) योग्यवेळी सत्कार करीत जा. (च) तसेच (दुन्दुभ्याय) युद्धभूमीत आवश्यक वाद्यांची व्यवस्था करणार्‍या सेवकांचा (च) आणि (आहनन्याय) युद्धामधे वाद्यादी वाजवून सैनिकांचा उत्साह वाढविणार्‍या कुशल वादकांचा (नम:) सत्कार करीत जा. (या सर्व कार्यामुळे) तुमचा कधीही पराजय होणार नाही. ॥35॥

    भावार्थ - भावार्थ - राजा तसेच प्रजाजनांचेही कर्तव्य आहे की आपल्या सैनिकांचे सर्वदृष्ट्या रक्षण करावे, त्यांच्यासाठी सुखसोयी असलेली घरे असावीत, भोजन-पानाचे योग्य पदार्थ असावेत. तसेच त्यांना सत्पुरुषांचा संग मिळावा आणि त्यांच्या मनोरंजन व उत्साहासाठी उत्तम मधुरध्वनी वाद्ये असावेत. यामुळेच ते सैनिक इच्छित कार्य पूर्ण करू शकतील. ॥35॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top