यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 6
ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः
देवता - रुद्रो देवता
छन्दः - निचृदार्षी पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
6
अ॒सौ यस्ता॒म्रोऽअ॑रु॒णऽउ॒त ब॒भ्रुः सु॑म॒ङ्गलः॑। ये चै॑नꣳ रु॒द्राऽअ॒भितो॑ दि॒क्षु श्रि॒ताः स॑हस्र॒शोऽवै॑षा हेड॑ऽईमहे॥६॥
स्वर सहित पद पाठअ॒सौ। यः। ता॒म्रः। अ॒रु॒णः। उ॒त। ब॒भ्रुः। सु॒म॒ङ्गल॒ इति॑ सुऽम॒ङ्गलः॑। ये। च॒। ए॒न॒म्। रु॒द्राः। अ॒भितः॑। दि॒क्षु। श्रि॒ताः। स॒ह॒स्र॒श इति॑ सहस्र॒ऽशः। अव॑। ए॒षा॒म्। हेडः॑। ई॒म॒हे॒ ॥६ ॥
स्वर रहित मन्त्र
असौ यस्ताम्रोऽअरुणऽउत बभ्रुः सुमङ्गलः । ये चौनँ रुद्राऽअभितो दिक्षु श्रिताः सहस्रशो वैषाँ हेड ईमहे ॥
स्वर रहित पद पाठ
असौ। यः। ताम्रः। अरुणः। उत। बभ्रुः। सुमङ्गल इति सुऽमङ्गलः। ये। च। एनम्। रुद्राः। अभितः। दिक्षु। श्रिताः। सहस्रश इति सहस्रऽशः। अव। एषाम्। हेडः। ईमहे॥६॥
विषय - पुढील मंत्रात त्याचविषयी (राजधर्म) कथन केले आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - (प्रजाजन म्हणत आहे) हे प्रजेतील माझ्या सर्व मित्रांनो (य:) जो (असौ) हा (ताम्र:) तांबा धातूसारखा दृढ अवयव असलेला (हेड:) (तुमच्या-आमच्या) शत्रूला अपमानित करणारा वा एकविणाश (अरूण:) सुंदर गौरवर्ण असलेला तसेच (बभ्रु:) किंचित पीत वर्ण असलेला (गव्हाळ रंगाचा) (उत) आणि (सुमड्गल:) सुंदर कल्याणकारी आपला राजा आहे, (च) या शिवाय त्याचे (ये) जे (सहस्रश:) हजारो (रूद्रा:) दुष्टांना रडविणारे असे (सैनिक वा राजपुरुष) (अभित:) चारही (दिक्षु) पूर्व आदी दिशांमध्ये पसरलेले आहेत आणि जे (एनम्) या राजाच्या (प्रित:) आश्रयास राहतात (आदेशाप्रमाणे वागतात) (एषार्म्) त्या राजाच्या आणि वीर सैनिकांच्या आश्रयात (निर्भय राहून) आम्ही प्रजाजन (अवेमहे) कोणतेही दुष्कर्म वा विरूद्ध आचरण करीत नाहीत. (राजा व सैनिकांच्या योग्य दडपणामुळे प्रजा शिस्तीत वागते) ॥6॥
भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यांनो, जो राजा दुष्टांना अग्नीप्रमाणे भस्म करतो, जो चंद्राप्रमाणे सज्जनांना सुखी करतो, जो न्यायकारी, व शुभलक्षणी आहे, त्याच्यासारख्याच सद्गुणांनी युक्त त्याचे राजकर्मचारी राज्यात सर्वत्र असले वा वसविले पाहिजेत किंवा ते तुमच्या रक्षणासाठी सदैव तुमच्या समीप असले पाहिजेत. जे असे असतील, तुम्ही प्रजाजनांनी अशा वीर व नीतीमान राजकर्मचार्यांचा सत्कार, आदर-सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या साहाय्याने तुम्ही समाजातील दृष्टजनांना अपमानित करून दूर हाकलून दिले पाहिजे ॥6॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal