Loading...
ऋग्वेद मण्डल - 7 के सूक्त 104 के मन्त्र
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
  • ऋग्वेद का मुख्य पृष्ठ
  • ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 104/ मन्त्र 25
    ऋषिः - वसिष्ठः देवता - इन्द्रासोमौ रक्षोहणी छन्दः - पादनिचृदनुष्टुप् स्वरः - गान्धारः

    प्रति॑ चक्ष्व॒ वि च॒क्ष्वेन्द्र॑श्च सोम जागृतम् । रक्षो॑भ्यो व॒धम॑स्यतम॒शनिं॑ यातु॒मद्भ्य॑: ॥

    स्वर सहित पद पाठ

    प्रति॑ । च॒क्ष्व॒ । वि । च॒क्ष्व॒ । इन्द्रः॑ । च॒ । सो॒म॒ । जा॒गृ॒त॒म् । रक्षः॑ऽभ्यः । व॒धम् । अ॒स्य॒त॒म् । अ॒शनि॑म् । या॒तु॒मत्ऽभ्यः॑ ॥


    स्वर रहित मन्त्र

    प्रति चक्ष्व वि चक्ष्वेन्द्रश्च सोम जागृतम् । रक्षोभ्यो वधमस्यतमशनिं यातुमद्भ्य: ॥

    स्वर रहित पद पाठ

    प्रति । चक्ष्व । वि । चक्ष्व । इन्द्रः । च । सोम । जागृतम् । रक्षःऽभ्यः । वधम् । अस्यतम् । अशनिम् । यातुमत्ऽभ्यः ॥ ७.१०४.२५

    ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 104; मन्त्र » 25
    अष्टक » 5; अध्याय » 7; वर्ग » 9; मन्त्र » 5
    Acknowledgment

    संस्कृत (1)

    पदार्थः

    (इन्द्रः, च, सोम, च) हे विद्युदैश्वर्य्योभयशक्तिप्रधान परमात्मन् ! (प्रतिचक्ष्व, विचक्ष्व) भवान् मह्यमुपदिशतु विशेषेण च बोधयतु यतोऽहं (जागृतम्) भवज्जागृत्या प्रबुद्धः सन् (रक्षोभ्यः, वधम्) राक्षसान् हिनसानि (अस्यतम्, अशनिम्, यातुमद्भ्यः) दण्डनीयराक्षसेभ्यश्च वज्रं प्रहरेयम् ॥२५॥ इति चतुरुत्तरशततमं सूक्तं षष्ठोऽनुवाको नवमो वर्गश्च समाप्तः ॥ इति श्रीमदार्य्यमुनिनोपनिबद्धे ऋक्संहिताभाष्ये पञ्चमेऽष्टके सप्तमं मण्डलं सप्तमोऽध्यायश्च समाप्तः ॥

    इस भाष्य को एडिट करें

    हिन्दी (3)

    पदार्थ

    (इन्द्रः, च, सोम, च) हे विद्युच्छक्तिप्रधान तथा ऐश्वर्यप्रधान परमात्मन् ! (प्रतिचक्ष्व, विचक्ष्व) आप उपदेश करें तथा विविधरूप से उपदेश करें, ताकि हम (जागृतम्) आपकी जागृति से उद्बुद्ध होकर (रक्षोभ्यः, वधम्) राक्षसों को मारें और (अस्यतम्, अशनिम्, यातुमद्भ्यः) दण्डनीय राक्षसों के लिये वज्रप्रहार करें ॥२५॥

    भावार्थ

    यह रक्षोघ्न सूक्त है, जिसके अर्थ ये हैं कि जिसमें राक्षसों का हनन हो, उसका नाम ‘रक्षोघ्न’ है। वास्तव में इस सूक्त में अन्यायकारी राक्षसों के हनन के लिए अनन्त प्रकार कथन किये गये हैं और वेदानुयायी आस्तिकों के वैदिक यज्ञ की निर्विघ्न समाप्ति के लिए रक्षा के अनेकशः उपाय वर्णन किये हैं, जिनको पढ़कर और जिनके अनुष्ठान से पुरुष वास्तव में आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक इन तीनों तापों से रहित हो सकता है। सच तो यह है कि आजकल वेदाभिमानिनी आर्यजाति अपने संकटों की निवृत्ति के लिए अनेक प्रकार के संकटमोचनों का पाठ करती है। यदि वह रक्षोघ्नादि सच्चे संकटमोचन सूक्तों का पाठ और अनुष्ठान करे, तो इसके संकट निवृत्त होने में तनिक भी सन्देह नहीं ॥ जो कई एक लोग यह शङ्का करते हैं कि वेदों का उच्चोद्येश्य तो यह है कि “मित्रस्य मा चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षन्ताम्” ॥ यजु. ३६।१८ ॥ प्राणिमात्र को मित्रता की दृष्टि से देखो, तो फिर ऐसे शान्तिधर्मप्रधान वेदों में राक्षसों के हनन करनेवाले सूक्तों का क्या प्रसङ्ग ? इसका उत्तर यह है कि वेद सब धर्मों का निरूपण करता है। वस्तुतः वेद की शिक्षा का फल संसार में शान्ति का प्रचार करना है, परन्तु जब कोई इस शान्तिरूपी यज्ञ में आकर विघ्न डाले, तो उसकी निवृत्ति के लिए वेद में वीरधर्म का भी उपदेश है, परन्तु यह धर्म वैदिक लोगों के मत में मुख्यस्थानी नहीं, किन्तु शरीर में बाहु के समान रक्षास्थानी है। इसी अभिप्राय से वेद में कहा है कि “ब्राह्मणोऽस्य मुखमासीत्” ॥ यजु. ३१।११॥ ब्राह्मण ब्रह्मवेत्ता विद्वान् इस विराट् में मुख के समान है। इस प्रकार शान्तिप्रधान ब्रह्मविद्या ही वेदों का मुख्योद्देश्य है ॥२५॥ यह १०४वाँ सूक्त, छठा अनुवाक और नववाँ वर्ग समाप्त हुआ ॥

    इस भाष्य को एडिट करें

    विषय

    इन्द्र सोम, राजा और न्यायपति के कर्त्तव्य ।

    भावार्थ

    हे ( सोम ) ऐश्वर्यवन् ! हे शासनकर्त्ता ! तुम और (इन्द्रः च) शत्रुहन्ता सेनापति दोनों ही ( प्रति चक्ष्व ) प्रत्येक व्यक्ति के प्रत्येक व्यवहार को देखो और ( वि-चक्ष्व ) विविध प्रकार से देखो (जागृतम्) तुम दोनों सदा जागते रहो, सावधान रहो । ( रक्षोभ्यः वधम् अस्यत ) दुष्टों के नाश करने के लिये उन पर शस्त्र का प्रहार करो । और (यातुमद्भ्यः अशनिम् अस्यत ) अन्यों को पीड़ा देने वा हमारे नगरादि पर चढ़ाई, युद्ध प्रयाण करने वाली सेना के स्वामियों पर विद्युत् के तुल्य आघातकारी अस्त्र का प्रयोग करो । इति नवमो वर्गः । इति षष्ठोऽनुवाकः ।

    टिप्पणी

    ॥ इति सप्तमं मण्डलं समाप्तम् ॥

    ऋषि | देवता | छन्द | स्वर

    वसिष्ठ ऋषिः ॥ देवताः – १ –७, १५, २५ इन्द्रासोमो रक्षोहणौ ८, । ८, १६, १९-२२, २४ इन्द्रः । ९, १२, १३ सोमः । १०, १४ अग्निः । ११ देवाः । १७ ग्रावाणः । १८ मरुतः । २३ वसिष्ठः । २३ पृथिव्यन्तरिक्षे ॥ छन्द:१, ६, ७ विराड् जगती । २ आर्षी जगती । ३, ५, १८, २१ निचृज्जगती । ८, १०, ११, १३, १४, १५, १७ निचृत् त्रिष्टुप् । ६ आर्षी त्रिष्टुप् । १२, १६ विराट् त्रिष्टुप् । १६, २०, २२ त्रिष्टुप् । २३ आर्ची भुरिग्जगती । २४ याजुषी विराट् त्रिष्टुप् । २५ पादनिचृदनुष्टुप् ॥ पञ्चविंशत्यृचं सूक्तम् ॥

    इस भाष्य को एडिट करें

    विषय

    पदार्थ- हे (सोम) = ऐश्वर्यवन्! हे शासक ! तुम और (इन्द्रः च) = शत्रुहन्ता सेनापति दोनों ही (प्रति चक्ष्व) = प्रत्येक व्यक्ति के व्यवहार को देखो और (वि-चक्ष्व) = विविध प्रकार से देखो (जागृतम्) = तुम दोनों सावधान रहो। (रक्षोभ्यः वधम् अस्यत) = दुष्टों के नाश के लिये शस्त्र प्रहार करो और (यातुमद्भ्यः अशनिम् अस्यत) = पीड़ा देनेवाले पर विद्युत् के तुल्य अस्त्र का प्रयोग करो।

    पदार्थ

    भावार्थ- राजा और सेनापति दोनों राष्ट्र में होनेवाली प्रत्येक गतिविधि पर सूक्ष्म दृष्टि रखें। राष्ट्र में दुष्टों, राजद्रोहियों तथा देशद्रोहियों को यथोचित कठोरतम दण्ड देवें ।

    इस भाष्य को एडिट करें

    इंग्लिश (1)

    Meaning

    Indra and Soma, lord of power and peace, justice and governance, love and majesty, watch everything that happens and enlighten us too. Shine, reveal and proclaim what is happening and warn us too. Keep awake and let us rise too into awakenment. Shoot the arrow upon the demon destroyers, strike the thunderbolt upon the covert saboteurs.

    इस भाष्य को एडिट करें

    मराठी (1)

    भावार्थ

    हे रक्षोघ्न सूक्त आहे. राक्षसाचे हनन व्हावे यासाठी हा मंत्र आहे. वास्तविक या सूक्तात अन्यायकारी राक्षसांच्या हननासाठी अनेक प्रकार सांगितलेले आहेत. वेदानुयायी आस्तिकांचा वैदिक यज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी रक्षणाचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. ते जाणून त्यांच्या अनुष्ठानाने मनुष्य वास्तविक आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक या तिन्ही तापांपासून मुक्त होऊ शकतो. आजकाल वेदाभिमानी आर्यजाती आपल्या संकटाच्या निवृत्तीसाठी अनेक प्रकारच्या संकटमोचनाचा पाठ करतील, तर त्यांचे संकट नाहीसे होईल यात संशय नाही.

    टिप्पणी

    कित्येक लोक ही शंका घेतात, की वेदाचा उच्च उद्देश हा आहे की ‘‘मित्रस्य मा चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षन्ताम्’’ यजु. ॥३६।१८॥ प्राणिमात्राला मित्रतेच्या दृष्टीने पाहिल्यास अशा शांतिधर्मप्रधान वेदात राक्षसांचे हनन करणाऱ्या सूक्ताच्या प्रसंगाचे काय काम? याचे उत्तर असे, की वेद सर्व धर्मांचे निरूपण करतो. वास्तविक वेदाच्या शिक्षणाचे फल संसारात शांतीचा प्रचार करणे आहे; परंतु जर कोणी या शांतिरूपी यज्ञात येऊन विघ्न उत्पन्न करील, तर ते निवृत्त करण्यासाठी वेदात वीरधर्माचाही उपदेश आहे; परंतु हा धर्म वैदिक मतात मुख्यस्थानी नाही तर शरीरात बाहुप्रमाणे रक्षणस्थानी आहे. याच अभिप्रायाने वेदात म्हटले आहे, की ‘‘ब्राह्मणोऽस्य मुख्यमासीत्’’ ॥ यजु. ३१।११॥ ब्राह्मण ब्रह्मवेत्ता विद्वान या विराटाच्या मुखाप्रमाणे आहेत. या प्रकारे शांतिप्रधान ब्रह्मविद्याच वेदांचा मुख्य उद्देश आहे. ॥२५॥ $ उपसंहार $ वेदात जेथे ‘‘अश्विनौ’’ शब्द येतो, तेथे सायण इत्यादी भाष्यकार अश्विनी कुमारांचे दोन देव, असे ग्रहण करतात. त्वष्टा एक देव सरण्यू व त्रिशिरा ही दोन अपत्ये होती. सरण्यू पुत्री असून, तिचा विवाह विवस्वानाबरोबर झाला. सरण्यूला एक यम व दुसरी यमी, अशी संताने (बंधू व भगिनी) उत्पन्न झाली. $ सरण्यू एकदा या दोन्ही संतानांना एका देवांगनेजवळ घेऊन गेली व त्यांना तिच्याजवळ सोडून स्वत: उत्तर कुरू देशात घोडी बनली. विवस्वान त्या देवी स्त्रीला सरण्यू समजत होता; परंतु एक दिवस त्याला कळले ही स्त्री सरण्यू नाही. सरण्यू अश्विनीचे रूप धारण करून उत्तर कुरू देशात निघून गेली. विवस्वानही तिच्या वियोगाने तेथे गेला. तेव्हा सरण्यूने त्या अश्विनी अर्थात घोडीच्या रूपात अश्वरूप विवस्वानाच्या वीर्याचा नाकाने वास घेतला. त्यामुळे अश्विनीकुमारांचे ‘‘नासत्या’’ नाव पडले. अर्थात, त्या घोडीरूप स्त्रीपासून उत्पन्न झाल्यामुळे त्यांचे नाव ‘‘अश्विनौ’’ पडले. वास्तविक स्त्रौ, अश्विनौ, नासत्यौ ही तिन्ही नावे एका अर्थाची वाचक आहेत. सत्यवादी विद्वानांचे नाव ‘नाऽसत्यौ’, दुष्टांच्या नाशक विद्वानांचे नाव ‘दस्त्रौ’ आहे, सर्व विद्येत व्याप्त असणाऱ्या विद्वानांचे नाव ‘अश्विनौ’ आहे. या प्रकारे तिन्ही नावे विद्वानांची होती जी अज्ञानामुळे घोडे व घोडीची संताने बनली. $ याचे कारण हे की जेव्हा लोकांनी वेदाच्या निरुक्त इत्यादी अंगांचा अभ्यास करणे सोडून दिले तेव्हा अशा कथा प्रचलित झाल्या, की अश्विनीकुमार घोडीपासून उत्पन्न झाले. हा विचार केवळ सायण इत्यादी भाष्यकारांचा नाही, तर युरोपियन ग्रीफ्थ, विल्सन, म्ॉक्समूलरचाही आहे. ग्रीफ्थसाहेब म्हणता, की अश्विनौ वास्तविक घोडीचे संतान असल्यामुळे हे नाव पडले. केवळ म्ॉक्समूलर साहेब कुठे कुठे अश्विनौचा अर्थ दिवस-रात्रीचा जोडा, असे म्हणतात. त्याचे तात्पर्य असे की वरील लोकांनी हा विचार सायण इत्यादी भाष्यकारांपासूनच घेतला, त्यांचे स्वतंत्र विचार नाहीत. जेथे ते स्वतंत्रपणे विचार करतात तेव्हा त्यांच्या मते आदि सृष्टीत सरण्यू नावाची स्त्री नव्हती किंवा विवस्वान नावाचा पुरुष नव्हता विवस्वान काळ व काळाच्या घटनांचे नाव यम-यमी होते. त्यांचे अलंकारिक वर्णन करून हे सिद्ध केले, की आदि सृष्टीत आर्यांमध्ये सपिंड विवाहाचा निषेध होता. याचा उल्लेख ग्रीफ्थ साहेबांनी केलेला आहे. भारतीय पौराणिक लोकांनी त्यांना वास्तविक देवता म्हटलेले आहे. त्यांनी असे वर्णन केलेले आहे, की सूर्य भगवानाच्या तेजाने जेव्हा त्यांची स्त्री सहन करू शकली नाही तेव्हा तिने घोडीचे रूप घेतले व तिच्यापासून उत्पन्न झालेले वेदातील देवता अश्विनीकुमार आहेत. या कथेचे मूळ वेदात नव्हे, तर त्याचा उल्लेख कोणत्याच ग्रंथात आढळत नाही. अश्विनी किंवा अश्विनौ या शब्दांना समजण्यात फार मोठा प्रमाद झालेला आहे. अश्विनीचा अर्थ अश्वाला स्त्री अश्विनी समजले गेले. वास्तविक अशू=व्याप्तो धातूने अश्विनी शब्द बनला. ज्याचा अर्थ शीघ्र व्याप्त होणाऱ्या शक्तीचा आहे. विद्याशक्ती, राजशक्ती, कलाकौशल्याची शक्ती, सूर्य-चंद्राची शक्ती या सर्व शक्ती लवकरच पसरतात. त्यासाठी त्यांना अश्विनौ म्हटले आहे. याच अभिप्रायाने निरुक्तकाराने अश्विनौचा अर्थ राजशक्ती, विद्युतशक्ती, सूर्य-चंद्ररूपी शक्ती आहे. एखाद्या देवाविषयी नाही, असे स्पष्ट केलेले आहे. $ ‘नासत्यौ’चा अर्थ सत्यवादी विद्वान असा आहे न असत्य: नासत्य: ज्यात असत्य नसेल त्यांना ‘नासत्यौ’ म्हणतात. वेदात नासत्या यासाठी येतो, की औ चा आ होतो. नासत्यौच्या स्थानी नासत्या होतो. हा व्याकरणाचा नियम आहे. अश्विनीच्या स्थानी ‘अश्विना’ होतो. हाच नियम ‘दस्त्रो’ला ‘दस्त्रा’ बनवितो. ही तिन्ही नावे विद्वानांची होती. जी सत्त्वगुण इत्यादी भेदाने तीन प्रकारची बनली. ज्यांच्या सत्त्वगुण प्रधानता आढळते त्यांचे नाव नासत्या व ज्यांच्यात राजोगुण प्रमुख असेल तर त्यांचे नाव अश्विनौ व ज्यांच्यात तमोगुण प्रमुख असतो त्यांचे नाव दस्त्रा होते. प्रकृतीमध्येही हा नियम आढळतो. प्रथम प्रकृती सात्त्विक भावात असते. मध्ये राजस भावात व शेवटी तामस भावात येते व प्रलय होतो. वेदात याच प्रकारे तिन्ही गुणप्रधान नावे आहेत. माणसाची ही प्रकृतिनियमानुसार हीच अवस्था आहे. अर्थात्, बालपणी सत्त्व प्रधानतेमुळे रागद्वेषाचा अभाव असतो. युवा अवस्थेत शत्रू मित्राबरोबर रागद्वेषाचे भाव उत्पन्न होतात. शेवटी मोह वाढून वृद्धावस्थेत तमोगुण वाढतो. त्यासाठी शास्त्रामध्ये संयमी बनावे, असा यमनियमांद्वारे उपदेश केलेला आहे. $ अश्विनौ इत्यादी नाव गुणप्रधान आहेत. ज्या गुणांना संपादित करून प्रत्येक मनुष्य अश्विनीकुमार बनू शकतो; परंतु हे सर्व घोडा-घोडीची संताने समजली गेली. त्यांचे रूप धारण करणे माणसाच्या शक्तीच्या पलीकडेच कार्य झाले. $ या गोष्टीचे संशोधन केले पाहिजे, की अश्विनौ बनविण्याचा अर्थात् घोडीचे संतान बनविण्याची सुरुवात कोणत्या महापुरुषाने केली. जेव्हा पौराणिक कथा रचल्या गेल्या तेव्हा अश्विनीकुमार, आश्विनेय अर्थात् अश्विनी घोडीचे पुत्र आहेत तेव्हा अमरकोष इत्यादी अवैदिक कोषांनी हा विचार अधिक दृढ केला व ‘‘नासत्यौ, अश्विनौ, दस्त्रौ’’ हे तीन जोडे अर्थात सहा देवता घोडे-घोडीची संताने आहेत. वास्तविकताही आहे, की युग्मशक्तीच्यात अभिप्रायाने दोन-दोन शक्तींची नावे वेदात वर्णिलेली आहेत. सहा दर्शनांचाही क्रम ठेवला गेला. न्याय-वैशेषिक एक युग्म, सांख्य योग दुसरा जोडा, तिसरा पूर्वमीमांसा - उत्तरमीमांसा, एका एका विषयात मिळणाऱ्या परस्पर संगती आहेत, तसेच अध्यापकोपदेश या दोन शक्तिसंपन्न पुरुषांचे नाव अश्विनौ, न्यायकारी व नियन्ता यांचे नाव नासत्यौ, सेनापती व सेवाधीश अर्थात सम्राटाचे नाव दस्त्रौ या प्रकारे शक्तिसंपन्न पुरुषांचे नाव वरीलप्रमाणे होते. अश्विनौ दिवस-रात्र किंवा स्त्री-पुरुष वाचक मानले जातात. दोन-दोन शक्तींच्या अभिप्रायाने भिन्न-भिन्न नावे आहेत. कुठे-कुठे दोन प्रकारच्या वायूंचे नाव अश्विनौ आहे. $ अश्विनौ=घोडीच्या पुत्रांचे नाव अश्विनीकुमार आहे ही संपूर्ण वेदबाह्य लोकांची कल्पना आहे. $ विश्वामित्र व वसिष्ठाची रागद्वेषाने युक्त कथा बनवून वेदात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. $ ऋ. मं. ३।५३।२३ $ या मंत्रात सायणाचार्यने हा अर्थ केलेला आहे की एकदा विश्वामित्राला वसिष्ठाच्या चेल्यांनी बांधून टाकले त्यावेळी विश्वामित्राने म्हटले तुम्ही मला जाणत नाही, मी कोण आहे? मी मंत्रवेत्ता असून त्याचा प्रभाव तुम्ही जाणत नाही (लोधं) मला (पशु मन्यमाना:) पशुक्त समजून घेऊन जात आहात. या कथेचे येथे बीजही नाही. वास्तविक ही बाब आहे, की ज्यावेळी लोक पौराणिक कथांनी मनोलालना व तनुपालना करीत होते. त्यावेळी वेदांचे सायणाचार्य इत्यादींनी भाष्य केले होते. त्यावेळी वेदात कथा मानल्या जात नव्हत्या. वेदात केवळ स्वत: सिद्ध आचार, व्यवहाराचे सुधारक ईश्वरदत्त उपदेश होते. त्यांना कोणत्याही टीका टिप्पणीची आवश्यकता नसते. यामुळेच वैदिक काळी वेदांवर कोणतेही भाष्य बनविले गेले नाही. $ असे म्हटले जाते, की पौराणिक कथा, कथानक वेदांच्या आधारावर बनविलेले आहेत. ही गोष्ट पूर्णपणे निर्मूल आहे. कारण जर असे असते, तर राम, कृष्ण, अर्जुन, भीम, युधिष्ठिर यांच्या कथांचे बीजही वेदात मिळाले पाहिजेत; परंतु त्यांचे नावही वेदात आढळत नाहीत. $ विश्वामित्र इत्यादी नाव वेदात यौगिक आहेत. जे सर्वांचे देव आहेत, त्यांना विश्वदेवा म्हणतात. सर्व मित्राचे नाव विश्वामित्र आहे. ‘‘मित्रे चषौ’’ या सूत्राने येथे पूर्व पद दीर्घ होते. या प्रकारे विश्वामित्र शब्दाची सिद्धी आहे. वास्तव हे आहे, की ‘‘लोधं नयन्ति पशु मन्यमाना’’ या वाक्याचा हा अर्थ नाही, की कुणी विश्वामित्राला बांधून नेत आहे, तर हा अर्थ असा आहे की (लोधं) क्षुद्र पशूला नयन्ति घेऊन जातात. मंत्राचे तात्पर्य हे की मन्दमती पुरुष ही घोड्याच्या बदल्यात क्षुद्र पशू किंवा गर्दभाला घेत नाही. जे पुरुष आत्मशक्ती देऊन उत्तम नसलेली वस्तू घेतात ते मन्दमती असतात. येथे घोडा व लोध हे दोन दृष्टान्त आहेत व ज्यांच्यासाठी हे दृष्टान्त दिलेले आहेत ती वस्तू आत्मतत्त्व आहे. या प्रकारे वरील सूक्ताचे तात्पर्य आहे. एखाद्या कथा, कहाणीत नव्हे, तर अन्यत्र विश्वामित्राचे नाव आलेले आहे. तेही विश्वदेवाप्रमाणे गुणप्रधान आहे. अर्थात, जो कोणी प्राणिमात्राचे हित इच्छितो त्यालाच विश्वामित्र म्हणतात. सर्वाप्रिय माणसाची विश्वामित्रही एक प्रकारची पदवी आहे. वेदात वसिष्ठ नावही अनेक ठिकाणी येते. याचा अर्थ उत्तमगुणविशिष्ट विद्वान आहे. याची जन्मदात्री विद्यामातेला मानलेले आहे. विद्याद्वारे याचा जन्म होतो. विद्या ही सर्वप्रिय असल्यामुळे अथवा सर्वविद्याप्रिय पुरुषांच्या हृदयात राहणारी असल्यामुळे तिचे नाव ‘उर्वशी’ आहे. $ या गुणप्रधान नावाचे वर्णन ऋग्वेदाच्या ७ मण्डल सूक्त ३१ मं. ११ मध्ये आहे. $ ‘‘उरुषु व्यवहारेषु अश्नुते व्याप्नोति या सोर्वशी विद्या ।’’ $ प्रत्येक व्यवहारात जो व्याप्त असेल अथवा ज्याच्याद्वारे प्रत्येक व्यवहाराची सिद्धी होईल तिला ‘उर्वशी’ म्हणतात. या प्रकारे येथे विद्येचे नाव उर्वशी आहे. हे आमच्या कल्पनेनुसार विद्येचे नाव नाही, तर निघण्टु ४,२ मध्ये वाणीच्या संदर्भात सरस्वती शब्द आहे. वाणी, विद्या, सरस्वती, उर्वशी हे सर्व शब्द एकार्थवाची आहेत. या प्रकारे विद्यारूपी मातेच्या कुशीत वाढलेल्या पुरुषाचे नाव वसिष्ठ होय. तो अवैदिक काळी उर्वशी वेश्येचा पुत्र समजला गेला. $ ‘‘अतिशयेन वसतीति वसिष्ठ’’ हे कथन यापूर्वी केलेले आहे. जो विद्येत अत्यंत रत असतो किंवा ज्याला विद्यामातेने दीक्षा दिलेली असते त्याचे नाव वसिष्ठ आहे. हे नाव वेदात अनेक ठिकाणी आलेले आहे. आधुनिक टीकाकार वसिष्ठाला विश्वामित्राबरोबर कलह करणारा असे मानतात. त्या वसिष्ठाचे नाव वेदात कुठेही नाही. त्याचे प्रमाण ‘‘लोधं नयन्ति पशु मन्यमाना’’ ॥ऋ. मं. ३,५६,२३ ॥ मध्ये विश्वामित्राचा कलह वसिष्ठाबरोबर होता, हे सिद्ध केले जाते; परंतु या प्रकरणात वशिष्ठाचे नावही नाही. $ वेदात विश्वामित्र शब्दही आहे. त्याचा अर्थ असा, की जो संपूर्ण जगाचा मित्र असेल त्याला विश्वामित्र म्हणतात. मित्र शब्द पूर्ण असल्याने पूर्वपद दीर्घ होते. $ केवळ नाव असण्याने वेदाद्वारे कथा व कहाण्या सिद्ध केल्या जातात. वास्तविकता ही आहे, की वेदात कथा व कहाण्या नाहीत. $ ज्या प्रकारे रामाचे गुरू वसिष्ठ व ऋषी विश्वामित्र यांच्या कथेचा वेदात मागमूसही नाही व मनुची उत्पत्ती यम-यमीची सावत्र आई देवांगनेपासून झालेली आहे, असे दर्शविले जाते, ते संपूर्णपणे आधारहीन आहे. $ ‘‘त्वष्ठा दुहित्रे वहतुं कृणोतीतीदं विश्वं भुवनं समेति । $ यमस्य माता पर्युह्ममाना महो जाया विवस्वतो ननाश॥’’ $ जेव्हा त्वष्टा देवतेने आपली कन्या सरण्यूचा विवाह केला तेव्हा सर्व जगातील लोक एकत्र झाले. तिला दोन संताने झाली ते यम व यमी होत. ती ननाश=निघून गेली. या मंत्रात ही कथा आहे की, सरण्यू नावाच्या स्त्रीचा विवस्वान= सूर्य नावाच्या पुरुषाशी झाला. त्यापासून यम -यमी उत्पन्न झाले, ते बहीण-भाऊ होते. ज्यांचे विशेष वर्णन मं. १० सू. १० मध्ये आहे. याचा अर्थ आधुनिक टीकाकार भाऊ-बहीणीच्या विवाहासंबंधात लावतात व युरोपियन प्रो. म्ॉक्समूलर, विल्सन, ग्रिफ्थ, सर रमेशचंद्र दत्त इत्यादींनी वेदविषयक आधुनिक लोकांनी ही कथा लिहिलेली आहे. $ प्रो. म्ॉक्समूलरच्या मते यम, यमी कोणी मानवी सृष्टीचे पुरुष नव्हते, तर दिवसाचे नाव यम व रात्रीचे नाव यमी होते. त्या दोघांच्या विवाहाचा यात वार्तालाप आहे. या कल्पनेत हा दोष आहे, की जर यम-यमी दिवस-रात्र होते तर सरण्यू नावाची माता कोण होती? या प्रश्नाचे उत्तर या कल्पनेत नाही. $ कित्येक भारतीय लेखकांनी या कथेला अलंकार बनवून यम-यमीला दिवस-रात्र सिद्ध केलेले आहे. त्यांच्या मते ही कथा सर्वस्वी निरर्थक वाटते. कारण कधी दिवस व रात्रीला विवाहाची इच्छा झाली नाही व त्यांच्या विवाहाच्या निषेधाने अपूर्वभाव उत्पन्न होतो. $ कित्येक लोक म्हणतात, की यमी ब्रह्मवादिनी होती. यमीने ब्रह्मविषयक कथन केलेले नाही किंवा त्याचा अर्थही हा होतो, की जो ब्रह्माचे कथन करतो तो यमी म्हणविला जातो. कारण यमीचा अर्थ यमाशी संबंध ठेवणारी असा आहे. $ यात ‘‘पुं योगादाख्यायाम्’’ या सूत्राने ङीष् झाले तो संबंध भ्रातृ-भगिनीरूपी असेल किंवा समानकाळात उत्पन्न होणारा कालिकसंबंध असेल. सरण्यू काय आहे याचा विचार करणे सर्वांत मुख्य आहे. ‘‘सरण्यू: सरणाते’’ ॥नि. १२,१०॥ जो गतिशील असेल त्याला ‘सरण्यू’ म्हणतात. या प्रकारे सरण्यूचा अर्थ येथे प्रकृती असा आहे. $ वेदात इतिहास मानणाऱ्यांनी हे मानले, की यम-यमीची माता निघून गेली होती. त्यामुळे तिचे नाव सरण्यू झाले; परंतु हा संशय आहे, की तिच्या जाण्यापूर्वीही तिचे नाव सरण्यूच होते, असे कशामुळे? निघून गेल्यावर त्याबाबत बोधन करणारा योग्य शब्द आढळत नाही; परंतु मंत्रात केवळ ‘ननाश’ शब्द जो ‘‘णश’’ अदर्शने धातूने बनलेला आहे. ज्याचा अर्थ अदर्शन आहे. वास्तविक हे आहे, की यम, यमीला स्त्री-पुरुष सिद्ध करणारेही स्पष्टपणे मानतात, की जेव्हा सरण्यू उत्तर कुरू देशांकडे निघून गेली तेव्हा विवस्वानापासून त्या स्त्रीला यम-यमीची माता बनविले व तिला मनु नावाचा पुत्र उत्पन्न झाला. जर असे होते तर सरण्यूच्या विवाहात माणसे कुठून आलेली होती. कारण हे सर्व मनुपासून उत्पन्न झाले. $ या प्रकारे सूक्ष्म विचार करण्याने हे ज्ञान होते, की निरुक्तच्या निरुक्तीप्रमाणे गतिशील प्रकृती आहे. तिच्या कुशीत यम=व्रत व यमी=वृद्धी दोन्हींचे पालन होते. ज्याप्रमाणे सुषुप्ती अवस्थेत संयम व वृद्धी दोन्हीही एका अधिकरणात निवास करतात किंवा एका प्रकृतीच्या गर्भरूपी-शय्येवर शयन करतात. त्यासाठी यम-यमीला भाऊ-बहीण म्हटलेले आहे. वास्तविक यम-यमी कोणी माणसे नव्हती. $ याविषयी पुष्ट प्रमाण हे की ‘‘प्रजापतिर्वै मनु:’’ ॥शतपथ. कां. ६।६।१॥ मनु नाव प्रजापतीचे आहे. अर्थात, प्रजेला प्रथम उत्पन्न करतो त्याला मनु म्हणतात. या कथनानुसार मानव जीव मनु नंतरचे मानले जाऊ शकतात. प्रथम कधीच नाही. नंतर यम-यमी मानव सृष्टीचे बहीण-भाऊ कसे? $ ज्या लोकांनी ‘यम-यमी’ला मानवी सृष्टीचा प्रथम जोडा मानून सिद्ध केलेले आहे, की ज्या प्रकारे आदम हव्वाचा विचार इसाई व मुसलमानात आहे, की प्रथम एकच जोडी होती त्यापासून सृष्टी उत्पन्न झाली. तोच विचार वैदिक आर्यजातीमध्ये होता ही कल्पना पूर्वोक्त शतपथच्या प्रमाणाने संपूर्णपणे आधारहीन ठरते. कारण यम-यमीचा जोडा ही मानला तरीही मानवी सृष्टीच्या अगोदर होता. $ दुसरी प्रबल युक्ती ही आहे, की आजपर्यंत सृष्टीच्या उत्पत्तीविषयी वैदिक काळापासून आजपर्यंत कुठेही यम-यमीच्या जोडीपासून सृष्टी उत्पन्न होण्याचे कथन नाही. $ ज्या प्रकारे घोडा-घोडीची संताने ‘‘अश्विनौ’’ व भाऊ-बहीणीच्या जोडीचे नाव यम-यमी हे दोन्ही कलंक मिथ्या असून, वेदांवर लावले गेले. निराशावादाचा कलंक वेदावर लावला गेला. $ कित्येक लोक म्हणतात वेदात भूत व प्रेतांना घाबरणे व शारीरिक व्याधींना घाबरणे, प्रत्येक जलातील जंतूला आपल्या कल्याणाची प्रार्थना करणे इत्यादी अनेक वाद लिहिलेले आहेत. $ त्यांचे कथन अत्यंत निर्मूल आहे - $ ‘‘मित्रस्य मा चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षन्ताम् ’’ $ यजु. अ. ३६। मं. ८ ॥ $ इत्यादी मंत्रांत सर्वभूतप्रियता वेदात दिसून आली नसती जर वेदात प्रत्येकाला घाबरणे आढळून आले असते, तर भिणारा पुरुष सर्वांबरोबर मैत्रीच्या दृष्टीने बघणारच नाही. $ दुसरी युक्ती अशी, की घाबरणे अनैश्वर्याचे लक्षण आहे व वैदिक काळात आर्यांचा पूर्ण अभ्युदय झालेला होता. मग भित्रेपणा व निराशावादाची काय आवश्यकता? $ असे म्हटले जाते, की वैदिक काळात केवळ गाय, घोडे, अन्न, अज इत्यादी संपन्न आर्य लोक होते. त्यांच्याजवळ दुसरे काहीच नव्हते. त्याचे उत्तर असे, की जे लोक असे मानतात त्यांनी कदाचित वेदाचे अध्ययन समजून उमजून केलेले नाही किंवा त्यांना वेदार्थाचे सम्यक ज्ञानच नाही. कारण वेदात तर ऐश्वर्य व रत्नांची इतकी भरमार आहे, की जगातील दुसऱ्या एखाद्या ग्रंथात क्वचितच आढळेल. ऋग्वेदाच्या प्रथम मंत्रात ‘‘रत्नधातमम्’’ हे कथन करून आर्यजातीला रत्नाकर अर्थात रत्नांची खाण असणे सिद्ध केलेले आहे. एवढेच नव्हे तर $ ‘‘मो षु वरुण मृन्मयं गृहं राजन्नहं गमम् ’॥ मं. ७। सूक्त ८१। मं. १॥ $ हे परमेश्वरा, मी मातीच्या घरात राहता कामा नये यावरून ही गोष्ट सिद्ध होते, की मातीच्या घरापासून भिन्न-भिन्न प्रकारचे घर जिज्ञासूच्या बुद्धीत होते. ईश्वराने स्वत:ही प्रार्थना सांगितलेली आहे, की तुम्ही मातीची घरे सोडून इतर प्रकारची घरे मागा. यावरून हे स्पष्ट होते, की वैदिक काळी मातीची घरे निवासासाठी पर्याप्त समजली जात नव्हती, तर सुवर्ण व रत्नजडित गृहांना त्यावेळी भाव होता. मग वैदिक काळात दारिद्र्य कसे? $ जे लोक हे म्हणतात मातीच्या घरापासून वेगळी विटांची घरेही होऊ शकतात. मग मंत्रात सुवणाची घरे कशी म्हटलेली आहेत. त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की विटा ही एक प्रकारची माती आहे. अर्थात, माती मृद पाषाण सर्व त्यात सम्मिलित आहेत. वरील मंत्राचा अर्थ मातीपेक्षा वेगळ्या धातूचा आहे. याच अभिप्रायाने सर्व टीकाकारांनी याचे अर्थ केलेले आहे, हे परमेश्वरा, आम्हाला सुवर्णमय गृह दे. $ सुवर्णमय गृह होणे असंभव आहे, असे म्हटले, तर उत्तर हे आहे, की सुवर्णमयचा अर्थ अधिक सुवर्ण असलेल्या घरासंबंधी आहे. कारण येथे ‘‘मयट प्रत्यय’’ लावून जो सुवर्णमय शब्द बनलेला आहे, तो मयट प्रत्यय प्रचुरतेसाठी अर्थात अधिकतेसाठी आलेला आहे. केवळ सुवर्णरचितसाठी नव्हे! ज्या देशाच्या ऐश्वर्याविषयी आम्ही येथे विचार करीत आहोत त्या देशात आजही सुवर्णमंदिर आहेत. अमृतसर येथील दरबार साहेबाचे मंदिर सुवर्णमय आहे. काशी, वृंदावन व गिरिनार, गिरी इत्यादी हजारो स्थान भारतात आजही विद्यमान आहेत. जी (हिरण्य) सुवर्णच्या ज्योतीने देदीप्यमान करीत आहेत. मग वैदिक काळात दारिद्र्य कसे? $ वेदात केवळ एकाच मंत्राचे प्रमाण नाही, तर हजारो मंत्र असे आहेत ज्यात सुवर्णाचे वर्णन आहे व रत्नाचे नाव, तर ऋग्वेदात सहस्रो मंत्रात स्पष्ट रीतीने आलेले आहे. $ जर आम्ही थोडा काळ वैदिक काळाच्या ऐश्वर्याची चर्चा सोडून महाभारताच्या वेळी भारतवर्षाच्या ऐश्वर्याचा विचार केल्यास या भारतसागराला ऐश्वर्याच्या लहरींनी परिपूर्ण केलेले होते. महाभारताचे जाणाकर हे विसरू शकत नाहीत जेव्हा महाराज युधिष्ठिर, साक्षात धर्मराजाच्या राज्यशासन काळात द्रौपदी हजारो साधू व ब्राह्मणांना सुवर्णपात्रात भोजन खाऊ घालीत होती. ते पाहून दुर्योधनामध्ये ईर्षा उत्पन्न झाली व त्याने दावानल बनवून या विशाल आर्यजातीरूपी वनाला जाळून टाकले. या अप्राकृतिक शोकानलज्वाला जाळून काय लाभ? $ मुख्य गोष्ट ही आहे, की वैदिक काळी आर्यांजवळ केवळ गायी, अश्व, महिषीरूपीच धन नव्हते; परंतु सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्यावेळी होते. प्रमाणासाठी पाहा - $ ईशानासो ये दधते स्वर्णो गोभिरश्वेभिर्हिरण्यै: ॥ $ ऋ. मं. ७ सू. ९० मं. ६॥ $ जे लोक सुवर्ण व त्यापेक्षा भिन्न अनेक प्रकारचे अन्न, धन व बहुमूल्य रत्ने व गायी, अश्व इत्यादी इतर पशुधनाचेही स्वामी असतात ते ऐश्वर्यसंपन्न समजले जातात. येथे सर्व प्रकारच्या धनाचे वर्णन केलेले आहे. याचदृष्टीने कित्येक भारतीय लेखकांनी हे लिहिलेले आहे की - $ वैदिक काळी भारतवर्षात शालानिर्माण अर्थात घरे बांधण्याची विद्या आढळते व गृहाची निर्मिती मोठमोठ्या ऐश्वर्यशाली पदार्थांनी केली जात होती. $ या प्रमाणांनी हे स्पष्ट होते, की वैदिक काळी निराशावाद व दरिद्रता नव्हती. $ या प्रकारे अस्त्र-शस्त्र विषयात ही वैदिकविद्या प्रसिद्ध होती. अर्थात्, ज्यांच्याकडून आपले रक्षण व परपक्षाचे भेदन केले जात होते त्यांचे नाव ‘अस्त्र’ होते. अर्थात अस्त्र नाव फेकणाऱ्या शस्त्राचे होते. ते कित्येक प्रकारचे होते ज्यांचे नाव अग्निबाण, ध्रूमबाण, वज्र व अस्माही होते. त्याचा उपदेश परमेश्वराने वेदात चांगल्या प्रकारे केलेला आहे. $ ‘‘प्रवर्तय दिवोऽश्मानामिन्द्र’’ $ ॥ऋ. ७ सू. १०४ मं. १९॥ $ हे परमात्मा! तू (असुर) अन्यायकारी दुष्टांसाठी आकाशातून वज्रपात कर. याच प्रकारे दुष्ट दमन दण्डाचे नाव अस्त्र होते. $ यापेक्षा वेगळे समोर येणाऱ्या शत्रूंचे हनन करण्याचे साधन धनुर्विद्यावेत्ते लोक उपयोगात आणत होते. त्यांना धनुष किंवा बाणही म्हणत असत. ज्यांचा अर्थ भयंकर शब्द करणारा असा होता. या शस्त्रांच्या वेत्त्यांना ‘धन्वी’ म्हटले जात होते. $ त्याचे वर्णन वैदिक काळापासून सतत केलेले आहे. या शस्त्र अस्त्रांचा प्रयोग करणारे आपल्या रक्षणाचे साधन आहे, हे जाणत होते. कायकवच व वर्म (कवच) ही त्यावेळी उपयोगात आणले जात होते. प्रमाणासाठी पाहा - $ ‘‘कवचिने च नमो वर्म्भिणे च’’॥ यजु. अ. १६। मं. ३५॥ $ इत्यादी अनेक प्रमाण आढळतात. ज्यात कवच, वर्माचे नाव स्पष्ट आहे. $ क्षत्रियाला वर्मा या अभिप्रायाने म्हटले जात होते, की तो वर्म धारण करून आपले व प्रजेचे रक्षण करीत होता. याप्रमाणे वेदात सर्व विद्यांचे बीज आहे. इतकेच नव्हे, तर अनेक प्रकारची बहुमूल्य रत्ने वेदात आहेत. ज्यांना श्री १० स्वामी दयानंदांनी खाणीतून मणी काढणाऱ्या जौहरीप्रमाणे चमत्कृत करून बहुमूल्य बनविले. $ जे लोक म्हणतात, की स्वामी दयानंदांनी ओढूनताणून भाष्य केलेले आहे व ते प्राचीन ग्रंथांच्या विरुद्ध आहे. त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे - $ १) वेदार्थाचा निर्णय घेणारे सर्वांत प्राचीन ग्रंथ निघण्टु व विरुक्त आहेत. या दोन्ही ग्रंथांचे प्रमाण स्वामी दयानंदांच्या भाष्यात जितके आढळतात तितके दुसऱ्या कोणत्याही भाष्यकाराने उद्धृत केलेले नाहीत. $ २) याच प्रकारे वेदार्थाला व्याकरणाने जितके स्वामी दयानंदांनी पुष्ट केलेले आहे, तितके दुसऱ्या कोणीही केलेले नाही. वेदाविषयी योगिकार्थाची शैली अर्थात व्युत्पत्ती करून अर्थ करण्याचा प्रकार जितका महर्षी दयानंदांच्या भाष्यात आहे, तितका दुसऱ्या कोणत्या भाष्यात नाही. $ ३) शतपथ इत्यादी प्राचीन वेद व्याख्यानांतून जितके काम महर्षी दयानंदांनी स्वीकारले आहे, तितके दुसऱ्या कोणत्याही भाष्यात नाही. $ ४) ईश्वरीय ग्रंथात ईश्वरीज्ञानानुसार जितके चांगले अर्थ ऋषी दयानंदांच्या शैलीत आहे. इतका चांगला अर्थ दुसऱ्या कोणी भाष्यकाराने केलेला नाही. मग लोक त्यांना का दोष देतात? $ असे म्हटले जाते, की स्वामी दयानंदांनी नम: चा अर्थ अन्न व द्विवचनाचे एकवचन व एकवचनाचे द्विवचन व षष्ठीच्या स्थानी पंचमी व पंचमीच्या स्थानी षष्ठी केलेले आहे. याचे उत्तर हे की ‘‘नमस्वान’’ हे पद पुष्कळ मंत्रात येते, येथे नमस्वानचा अर्थ अन्नयुक्त आहे. अर्थात, नम: व वान् मिळून नमखान बनले व $ ‘‘यूयं पात स्वस्तिभि: सदा न:’’ ॥ऋ. ७.९६.६॥ $ सायणाचार्यांनी एकवचनाच्या स्थानी बहुवचन व ‘‘गुणीषे’’ येथे मध्यम पुरुषाच्या स्थानी उत्तम पुरुष मानलेला आहे व ७ सू. ६६ मध्ये गृणीषेचा अर्थ स्तुवे केलेला आहे. येथेही मध्यम पुरुषाचा अर्थ उत्तम पुरुष केलेला आहे तू चा अर्थ मी व मी चा अर्थ तू या प्रकारे सर्वत्र ‘‘व्यत्ययौ बहुलम्’’ ॥३।१।८५॥ ने काम घेतलेले आहे. अर्थात, वेदात लौकिक संस्कृत व्याकरणाचे नियम बहुतेक बदलतात. मग जर महर्षी स्वामी दयानंदांनी असे केले, तर काय अनुचित केले? $ वेदाचा लौकिक व्याकरणानुसार अर्थ ठीक होऊ शकत नाही. वेद लाखो वर्षांपूर्वीचे आहेत, आदि सृष्टीपासून आहेत. त्यामुळे जेथे अस्तिचा प्रयोग होतो तेथे वेदात असतिही असते. प्रमाणासाठी वाचा - ऋग्वेद १० मं. चा शेवटचा मंत्र - $ ‘‘तेन पुरुषो असत्’’ ॥यजु. २।३३॥ $ येथे भवेत्चा अर्थात लेट चा प्रयोग केलेला आहे. वेदात लेट् लकारच अधिक मानला गेला आहे. ज्याचा प्रयोग आता उपयोगात येत नाही. $ जे लोक हे म्हणतात, की वेदात स्वराचे काही काम नाही. नंतर ते लावले गेले, ते लोक वेदाच्या ज्ञानापासून सर्वस्वी वंचित आहेत. कारण स्वराच्या भेदाने मंत्राच्या अर्थातही भेद होतो. जसे ‘‘सहस्रशीर्षा’’ या मंत्राच्या स्वराने चारही वेदांत अर्थाचा भेद स्पष्ट आहे. अर्थात, सामवेदाच्या स्वराचा प्रकार व ऋग्वेदाच्या स्वराचा प्रकार वेगवेगळा आहे. याप्रमाणे स्वरभेद अर्थभेदाचे कारण आहे. $ याच अभिप्रायाने महाभाष्यकार पतञ्जलि मुनीने म्हटले आहे की - $ ‘‘मन्त्रो हीन: स्वरतो वर्णतो वा मिथ्याप्रयुक्तो न तमर्थगाह । $ सवाग्वज्रो यजमानं हितस्ति यथेन्द्रशत्रु: स्वरतोऽपराधात्’’ $ जो मंत्र स्वर किंवा वर्णाने हीन आहे त्याचा प्रयोग मिथ्या आहे. कारण जो आपला अर्थ सांगू शकत नाही तो वज्ररूप बनून यजमानाला मारतो. अर्थात, असे पापजनक काम यजमानाने कधीच करता कामा नये. जसे मूर्ख राक्षसांनी आपल्या यज्ञात ‘‘इन्द्र शत्रुर्वर्धस्व’’ येथे त्यांना अन्तोदात्त करावयास हवे तेथे पूर्व-पद-प्रकृती स्वर केला. ज्यामुळे अर्थ पूर्णपणे उलटा झाला. $ ही तर वैदिक प्रक्रिया आहे; परंतु लौकिक जगात थोड्याशा स्वर भेदाने अर्थाचा अनर्थ होतो. जसा एकावेळी एक भिक्षुक हे म्हणत होता की, ‘‘बाब् अन्धा आहे.’’ येथे बाबूमध्ये अनुदात्त श्रुति ऐकून बाबूने म्हटले की अरे काय म्हणतोस? बाबू आंधळा आहे का? आंधळा तर तू आहेस? मग त्या आंधळ्या भिक्षुकाने हे उत्तर दिले की, महाराज मी तर हे म्हणतो की बाबू३ आंधळा आहे. अर्थात, बू मध्ये उदात्तचे पूर्ण उच्चारण केल्यावर अर्थ निघाला, की हे बाबू मी आंधळा आहे, काही द्या. $ जेव्हा लोकांतही स्वराच्या थोड्याशा भेदाने इतका भेद होतो, की देदीप्यमान डोळ्याचा बाबू पूर्ण आंधळा समजला जातो. यापेक्षा दुसरा अनर्थ कोणता होऊ शकतो? $ या प्रकारे ज्या लोकांनी वेदातून स्वर काढून टाकले त्यांनी वेदात आंधळे करण्याचे सामान उत्पन्न केले. $ ‘‘अन्धेषु काणो राजा’’ या नियमानुसार हे समजले, की आजकाल वेदविषयात सर्व लोक आंधळ्याप्रमाणे आहेत व त्यात काहीना काही जाणणारा, तर अवश्य वेदज्ञ असतो. असे समजून संपूर्ण सामवेदाचे स्वर काढून त्याला उघडे केले, असे करण्यात वेदानुयायिंनी कां कू केले नाही. $ ते करतील तर कसे कारण कुणालाही हे ज्ञात नाही, की वेदात १ एकाचा अंक लिहून त्याच्या वर खाली स्वर दिला जातो तो का? व २ दोन लिहून त्याच्या वर-खाली दिला जातो. याच प्रकारे ३ तीनचा अंक लिहून त्याच्या वर-खाली स्वर दिला जातो. या भेदालाही स्वरविद्यावेत्त विद्वानच जाणतात. ज्यांनी नवीन वेदज्ञ बनण्याचा दावा केलेला आहे, त्यांना स्वरांचे महत्त्व काय? $ वेदार्थ जिज्ञासूंनी हे जाणले पाहिजे, का जेथे मूलमंत्रात ऱ्हस्व असते तेथे पदपाठात दीर्घही होते व जेथे मूलमंत्रात दीर्घ होते तेथे पदपाठात ऱ्हस्वही होते. जसे ‘‘इयं देव पुरोहिति:’’ येथे मूलमंत्रात ऱ्हस्व आहे व पदपाठात या प्रकारे आहे ‘‘इयं देवा पुर:हिति:’’ यामुळे अर्थाचाही भेद होतो. अर्थात, देव पुरोहिति शब्दात समास असल्यामुळे वेगळा अर्थ होतो व समास नसल्यावर वेगळा अर्थ निघतो. हे म्हटले की, वेदात समास असल्यामुळे अन्तोदात्त नसले पाहिजे. उत्तर हे आहे ‘‘व्यत्ययो बहुलम्’’ याद्वारे स्वराचा व्यत्यय आहे व स्वराचा व्यत्यय भाष्यकारी लोकांनी मानलेला आहे. $ काही अल्पश्रुत लोक हे मानतात, की या मंत्रात महर्षी दयानंदाने समास मानलेला नाही. याचे उत्तर हे आहे, की ज्या मंत्राची व्याख्या स्वामीजीने केलेली आहे. ती अन्य आहे. अर्थात, तो मं. ७ व सूक्त ६० चा आहे. हा सूक्त ६१ चा आहे. त्यामुळे भिन्न अर्थ करण्यात कोणता दोष नाही. $ जे लोक कुतर्काने व कुबुद्धीने लोकांना संशयामध्ये अडकवतात, की या भाष्यात एकवचनाचा अर्थ बहुवचनात व बहुवचनाचा अर्थ एकवचनात केलेला आहे व षष्ठीचा अर्थ पंचमी व पंचमीचा अर्थ षष्ठी या प्रकारे मनमानी अर्थ केलेले आहेत. याचे उत्तर असे, की द्विवचनचा अर्थ एकवचनही होतो व एकवचनचा अर्थ द्विवचनही होतो. एकवचनाचा अर्थ बहुवचनही. वैदिक व्याकरणाची शैली आहे. प्रमाणासाठी पाहा मं. ७ सू. ९० मं. १ सायणाचार्यांनी वां चा अर्थ तुभ्यं एकवचनासाठी आहे व मं. ७ सू. ७२ मं. १ युवां याला संबोधन बनविलेले आहे. जो लोकांत युवां कुठेही संबोधन नसते. याच प्रकारे मं. ७ सू. ६६ मं. ७ मध्ये ‘‘गुणीषे’’ या मध्यम पुरुषाचा अर्थ स्तुवे केलेला आहे. हे सर्व ‘‘व्यत्ययो बहुलम्’’ या वैदिक सूत्राने सिद्ध होते. याच प्रकारे वैदिक व्याकरणानुसार सर्व अर्थ केलेले आहेत. एवढा भेद मात्र अवश्य आहे. सायणाचार्य इत्यादींनी अश्लील अर्थ केलेले आहेत, जे बुद्धीला पटत नाहीत. ज्या अर्थात् तर्क ऋषी साक्ष देत नाही. वेदातूनच वेदाचे प्रमाण देऊन अर्थात् वेदार्थाने वेदाचे मंडन करून अद्भुत अर्थ केलेले आहेत. जसे ‘‘अप गूह एतद् यदन्यरूप: समिथे बभूथ’’ ॥ऋ. मं. ७ सू. १०० मं. ६ ॥ याचा अर्थ सायणाचार्याने असे विचित्र अर्थ केलेले आहेत. ज्यांचे खंडन वेद बलपूर्वक अन्यत्र करतो - $ ‘‘मा शिश्नदेवा अपि गुऋर्तं न:’’ ॥ऋ. मं. ७ सू. २१ मं. ५ ॥ $ इंद्रियारामी किंवा इंद्रियांचे पुजारी अर्थात् लिंग इत्यादी अंगांची पूजा करणारे माझा खरेपणा जाणू शकत नाहीत. याच्या विरुद्ध ‘‘शिपिविष्टा’’चा अर्थ घृणित अर्थात लज्जाजनक इंद्रियाप्रमाणे मुखयुक्त विष्णू असा अर्थ कसा होऊ शकतो. जो सायणाचार्याने वरील मंत्रात केलेला आहे. $ या स्थानी विष्णूला ‘‘अर्थ’’ही म्हटलेले आहे. ज्यामुळे विष्णू न्यायकारी परमात्मा सिद्ध झालेला आहे. मग निंदित मुखाची काय कथा? याबाबतीत हे लिहिणे अत्यंत उपयुक्त वाटते, की ज्या लोकांनी वेद व वेदांगाचे स्वप्नातही दर्शन केलेले नाही ते लोक आजकाल वेदाच्या साहित्यावर लेखणी चालवीत आहेत व दूषित करीत आहेत. $ कोणी म्हणतो की, वेदात बेडकाचे उपाख्यान आहे. कोणी म्हणतो, की मांसभक्षण करण्याचे वेदात अपूर्व विधान आहे. एवढेच नव्हे तर ज्यांनी कधी दर्शनाचे दर्शनही केलेले नाही ते लोकही हे लिहितात की, ‘‘नासदासिन्नोसदासीत्तदानीम्’’ ऋ. मं. १० सू. ११ मं. १॥ यात असत् कार्यवादाचे कथन आहे ते लोक हेही समजत नाही, की असत् कार्यवाद कशाला म्हणतात? या मंत्राचा सायणचा अर्थ वाचल्याने काही ज्ञान होते. वास्तविक ही गोष्ट आहे, की यात सद्रुप प्रकृतीचे वर्णन केलेले आहे व असत् त्याला केवळ सूक्ष्मरूपाच्या अभिप्रायाने म्हटलेले आहे. त्याची पूर्ण व्याख्या ‘‘असदितिचेन्नप्रतिषेधमात्रत्त्वात्’’ व्या. सू. २-१-७ मध्ये आहे. असत् कथन करण्याचे तात्पर्य असत्कार्यवादाचे नव्हे, तर स्थूलरूपाने निषेधाचा आहे. $ या सूक्ष्म विचाराने ग्रंथ सूक्ष्म होत जातो. त्यासाठी जर या सूक्ष्म विचाराला सोडून दर्शनशास्त्राचे साधारण ज्ञानही मुख्य लक्ष्य ठेवले तर सांख्य, योग, वेदान्त हे तीन दर्शन सत्कार्यवादी समजले जातात, मग वेदात असत्कार्यवादाची काय कथा? वेद व वेदार्थाला दूषित करणारे आजकालचे नाममात्र पंडित आहेत. अन्यथा ईश्वरीय ज्ञान कोण दूषित करू शकतो? $ वास्तविकता ही आहे, की वेदाचे भाव समजण्यासाठी प्राचीन ऋषी मुनींच्या प्रज्ञेचे साहाय्य अवश्य घेतले पाहिजे. अन्यथा आजकालचे परतंत्र प्रज्ञ पुरुष त्यांना कधीही समजू शकत नाहीत. त्यामुळे वेदांचे परिष्कार व अलंकार केवळ अक्षरार्थ रीतीने कुणाला समजणार नाही. प्रमाणासाठी पाहा - $ ‘‘पीपिवांसं सरस्वत: स्तनं यो विश्वदर्शत: । भक्षोमहि प्रजामिषम्’’ $ ऋ. मं. ७ सू. ९६ मं. ६॥ $ मी सरस्वतच्या स्तनाचे पान करतो, जो विश्वाला दाखविणारा आहे. कोणी म्हणू शकता,े की तो कोण सारस्वत आहे? कोणी याला मेघ म्हणतात, कोणी सरस्वतीला नदी मानून तिचे स्तनपान करविणे म्हणतो. जर अशी पृच्छा केली, की नदी व मेघाचेही स्तन असतात का? तर उत्तर मिळेल हा केवळ अलंकार आहे; परंतु परीक्षक जेव्हा याचा सूक्ष्म विचार करतील, तर लक्षात येईल अलंकार त्यालाच म्हटले जाते ज्यात विचित्र किंवा वेगळा भाव असेल व काही अंशी रूपक इत्यादी भावही असले पाहिजेत. जसे ‘‘ब्राह्मणोऽस्य मुखमासीत्’’ इत्यादी वेद वाक्यात विराट शरीर मानून त्यात मुख इत्यादी अवयवांचे रूपक आहे. $ या प्रकारे रूपकालंकार तेव्हाच बनू शकतो जेव्हा ‘‘सरतीति सरो ज्ञानं तद्विद्यतेऽस्येति सरस्वान् तस्य सरस्वत:’’ सर नाव ज्ञानाचे आहे. ते ज्याच्यामध्ये विद्यमान असेल त्याचे नाव शक्तिरूपाने सरस्वती विद्या व शक्तिमद्रूपाने ज्ञानाधिकरण परमात्मा हे दोनच अर्थ अलंकाराने बनतात, इतर नाही; परंतु या सूक्तात प्रकरण सरस्वतीचे आहे. अर्थात्, हे सरस्वती सूक्त आहे. यासाठी येथे अर्थ सरस्वतीचा आहे ‘‘व्यत्ययोबहुलम्’’ या सूक्ताने येथे पुल्लिंग निर्देश आहे. आता मंत्राचा अर्थ हा झाला, की जो पुरुष सरस्वती ब्रह्मविद्येचे ज्ञानरूप स्तन पितो तो विश्वद्रष्टा अर्थात्, संपूर्ण ज्ञानी होतो. मग तो विश्वाचे संपूर्ण ऐश्वर्य भोगतो. $ ‘‘एवं मण्डयन्तिति मण्डूका:’’ वेदाचे मंडन करणाऱ्या विद्वानांचे नाव मण्डूक होते व मण्डूकस्य भाव: कर्म वा माण्ड्यूक्यम्’’ या प्रकारे वरील विद्वानांच्या अनुसंधानाचे नाव माण्डूक्य होते व त्या अनुसंधानासाठी जे ब्रह्मज्ञानाचे साधन होते त्याचे नाव माण्डूक्योपनिषद् झाले. या प्रकारे ब्रह्म वेदाचे अनुसंधान करून ऋषींनी माडूक्योपनिषद् निर्माण केले. अर्थात्, वेदाचे प्रणव इत्यादी भावांचे या उपनिषदात चांगल्या प्रकारे मंडन केले. तो या प्रकारे ओ३म् हे अक्षर आपल्या ध्वनीने वेदाचे मंडन करीत आपल्या विश्वव्यापिनी ब्रह्मविद्येद्वारे तीनही लोकांना स्वांतर्गत करतो. अर्थात विश्व, प्राज्ञ इत्यादी ही ब्रह्माची सर्व नावे या ओंकार नावामध्ये असतात. तीन पाद अमृतरूप ब्रह्म आहे व त्याच्या एका स्थानी (देशी) प्रकृती एक अंश आहे. संहितेमध्ये याला चतुष्पाद ब्रह्म म्हटलेले आहे. या भावाचे वर्णन करणारा मंत्र हा आहे - $ ‘‘एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पूरुष: $ पा दोऽस्य विश्व भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि’’ $ ऋ. मं. १० सू. ९० मं. ३ $ त्याच्या एक देशात संपूर्ण लोक-लोकांतर आहेत व तो अमृत पुरुष सर्वत्रैव परिपूर्ण होत आहे. याच मंत्राचे भाव वेदाचे मण्डन करणाऱ्या मण्डूक ऋषीने माण्डूक्योपनिषद्मध्ये वर्णन केलेले आहे, की सर्वाधिकरण प्रणव शब्दवाच्य परमात्माच तीन पादरूप अमृत आहे. प्रकृतीरूपी मात्रा दुसरी आहे. अर्थात्, ईश्वरविषयक व्यवहाराच्या योग्य नाही. ईश्वररूपी उपासनेत तिचा कोणताच उपयोग नाही. $ वास्तविकता ही आहे, की माण्डूक्योपनिषदामध्ये ऋषीचे तात्पर्य या चराचर जगाला ब्रह्माश्रित निरूपण करण्यात होते. जे कालांतराने मिथ्यावादाच्या निरूपणात उपयुक्त झाले. अर्थात्, याच उपनिषदाच्या साह्याने माण्डूक्यकारिका बनल्या. त्यात लिहिले आहे - $ ‘‘घटादिषु प्रलीनेषु घटाकाशादयो यथा । $ आकाशे संप्रलीयन्ते तद्वज्जीवा इहात्मनि ॥’’ $ मांड्यूक्यकारिका । अद्वैत प्र.४॥ $ जसे घट इत्यादी पदार्थ तुटूनफुटून गेल्यावर घटाकाश महाकाश होतो. याच प्रकारे मायारूप उपाधी नाहीशी झाल्यावर जीवही ब्रह्मरूप होतो. हा भाव घेतला गेला व हा भाव या उपनिषद् वचनातून निघाला ‘‘अयमात्मा ब्रह्म’’ हा जीवरूपी आत्मा ब्रह्म आहे; परंतु येथे हे लक्षात ठेवले पाहिजे, की जीवाला ब्रह्म बनविण्याचा हा भाव या वाक्यातून कधीही निघू शकत नाही. कारण हा पूर्ण श्लोक असा आहे - $ ‘‘सर्व ह्मेतद्ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोऽयमात्मा चतुष्पत्’’ मा. २॥ $ वरील ओंकार ब्रह्म आहे व सर्वत्र व्यापक असल्यामुळे ब्रह्मरूप आत्मा आहे. तो हा आत्मा चतुष्पात् अर्थात एक प्रकृतिरूपी मात्रा व तीन ओ३म् । या प्रकारे चतुष्पात् त्या ओंकाराचे वर्णन आहे. काही जीवरूप आत्म्याचे पहिले प्रकरण आले असते तर निस्संदेह अयमात्म ब्रह्माचा हा अर्थ झाला असता, की हा जीव ब्रह्म आहे; पण पूर्व वास्तविक ओंकार आहे जीव नाही. ज्या प्रकारे (१) अयमात्मा ब्रह्म॥ मा.२॥ याचा दुसरा अर्थ करून जीवाला ब्रह्म सिद्ध गेले. या प्रकारे (२) ‘‘तत्त्वमसि’’ ॥ छां. ६।८।७॥ चा तो ब्रह्म तू आहेस हा अर्थ केला गेला. याच प्रकारे (३) ‘‘अहं ब्रह्माऽस्मि’’॥ चा मी ब्रह्म आहे. (४) ‘‘प्रज्ञानं ब्रह्म’’॥ ऐतरेय ५।३॥ अर्थात ब्रह्म ज्ञानरूप आहे. याचाही जीवाला ब्रह्म बनविण्याचा अर्थ केला गेला. $ ही चारही वाक्ये उपनिषदातील आहेत; परंतु जीवाला ब्रह्म मानणारे नवीन वेदान्ती त्यांना वेदवाक्य किंवा महावाक्यही म्हणतात. त्यांचे ठीक ठीक पद पदार्थ आम्ही वेदान्त आर्यभाष्य व उपनिषदार्य्य भाष्यात केलेले आहे. $ येथे विशेष दर्शविले जात आहे की ‘‘तत्त्वमसि’’ ॥छा.। ६-८-७॥ याचा अर्थ जो येथे केला जात आहे, की हे जीव तू साक्षात ब्रह्म आहेस, हा अर्थ अनुभव व शास्त्राच्या विरुद्ध आहे. कारण ज्या ब्रह्माने संपूर्ण विश्व रचले आहे तो क्षुद्र जीव कसा होऊ शकतो. ‘‘शब्दविशेषात्’’ ॥ब्र. सू. १।२।५॥ ‘‘सम्भोगप्राप्तिरितिचेन्न वैशयात्’’॥ ब्र. सू. १।२।८॥ इत्यादी वेदान्तसूत्रात सांगितलेले आहे, की ब्रह्मासाठी वेदात शब्दही विशेष आहेत. अर्थात्, ईश, अर्य्य, विष्णू, ब्रह्म इत्यादी शब्द जगत्कर्त्यासाठी येतात व जीव, प्राणी, भूत इत्यादी शब्द या प्राणधारी क्षुद्र जीवासाठी येतात. यावरून जीव व ब्रह्माचा भेद स्पष्ट आहे. $ दुसऱ्या सूत्राचा हा अर्थ आहे, की ईश्वर सर्वव्यापक असल्यामुळे जीवाच्या शरीराच्या सुख-दु:खाचा भोक्ता नाही व जीव स्वकर्माच्या फलांचा भोक्ता आहे. या प्रकारे दोन्हींचा भेद स्पष्ट आहे. मग जीव ब्रह्म कसा? $ ही गोष्ट आम्ही प्रस्तावनेत विस्तारपूर्वक लिहिलेली आहे. येथे या गोष्टीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘‘तत्त्वमसि’’ याचा अर्थ ब्रह्म बनणे कसा होतो. स्वामी शंकराचार्यांच्या मतानुसार (तत्) पूर्वोक्त ब्रह्म (त्वं) तू आहेस हा अर्थ होतो व स्वामी रामानुजांच्या मते (तत्) शब्दवाच्य ब्रह्माची विभूती असल्यामुळे जीवालाही (तत् त्वं) अर्थात् ब्रह्म म्हटले जाऊ शकते. याचे नाव विशिष्टाऽद्वैत आहे. अर्थात्, जीव ही एक प्रकारे ब्रह्माची विभूती असल्यामुळे त्याचा अंशही आहे, भिन्न नाही. $ तिसरे द्वैतवादी लोकांच्या मते (तत्) जीवाचे ग्रहण केलेले आहे. ज्याचे पूर्वी निरूपण केलेले आहे. ज्याला व्रत ठेवून अणुमात्र सत्ता दर्शविलेली आहे व म्हटले आहे ‘‘ऐतदात्म्यमिदं सर्व’’ हा सर्व अणुप्रमाण आत्म्याचा प्रभाव आहे. या आत्मसत्तेचे बोधन करण्यासाठी नऊ वेळा ‘‘तत्त्वमसि’’ हे वाक्य आलेले आहे याचे नाव अभ्यास आहे. ते बलपूर्वक बोधन करून दर्शविलेले आहे. ही व्यवस्था ‘‘तत्त्वमसि’’च्या अर्थाची आजपर्यंत चालू आहे. $ काही लोक ‘‘मुरारेस्तृतीय: पन्था:’’ याप्रमाणे म्हणतात की, ‘‘तत्त्वमसि’’ लट् लकारच्या मध्यम पुरुषाचे एकवचन नाही, तर लेट् लकारचे रूप आहे. ज्याचा अर्थ करतात, की तू ब्रह्मनिष्ठ हो. प्रथम तर ही गोष्ट संपूर्ण मिथ्या आहे. हे लट् लकारचे रूपच नाही. असे असते तर ‘‘त्वं वाऽहमस्मि भगवो देवते अहं वा त्वमसि’’ व ‘‘पितृहा वै त्वमसि’’ ‘‘मातृहा वै त्वमसि’’ ‘‘भ्रातृहा वै त्वमसि’’ ‘‘स्वसृहा वै त्वमसि’’ ‘‘आचार्य्यहा वै त्वमसि’’ ‘‘ब्रह्महा वै त्वमसि’’ ॥छा.७ ।१५।२ येथेही लेट्चे रूप असले पाहिजे; पण कुणीही याला लेट्चे रूप म्हणू शकत नाही. कारण याच्याबरोबर अह्मस्मि हा वर्तमान कालाचा प्रयोग आहे हे सिद्धवाक्य आहे, प्रेरणा किंवा विधिवचन नाही व ‘‘पितृहावै त्वमसि’’ इत्यादींमध्ये लेट् लकार मानला तर अर्थ हा होईल, की

    इस भाष्य को एडिट करें
    Top