Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 17
    ऋषिः - त्रिशिरा ऋषिः देवता - प्रजापतिर्देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    5

    प्र॒जाप॑तिष्ट्वा सादयत्व॒पां पृ॒ष्ठे स॑मु॒द्रस्येम॑न्। व्यच॑स्वतीं॒ प्रथ॑स्वतीं॒ प्रथ॑स्व पृथि॒व्यसि॥१७॥

    स्वर सहित पद पाठ

    प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। त्वा॒। सा॒द॒य॒तु॒। अ॒पाम्। पृ॒ष्ठे। स॒मु॒द्रस्य॑। एम॑न्। व्यच॑स्वतीम्। प्रथ॑स्वतीम्। प्रथ॑स्व पृ॒थि॒वी। अ॒सि॒ ॥१७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    प्रजापतिष्ट्वा सादयत्वपापृष्ठे समुद्रस्येमन् । व्यचस्वतीम्प्रथस्वतीम्प्रथस्व पृथिव्यसि ॥


    स्वर रहित पद पाठ

    प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। त्वा। सादयतु। अपाम्। पृष्ठे। समुद्रस्य। एमन्। व्यचस्वतीम्। प्रथस्वतीम्। प्रथस्व पृथिवी। असि॥१७॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 17
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (प्रजाजनातील स्त्रिया अथवा एक प्रमुख स्त्री म्हणत आहे) हे विदुषी महिला, (राजपत्नी) (प्रजापति:) प्रजेचा स्वामी (तुला भरपूर यश देवो) ज्याप्रमाणे (समुद्रस्य) समुद्राच्या (अपाम्‌) पाण्यावर (एमन्‌) योग्य स्थानी (पाण्याच्या पृष्ठभागावर वा वर) (पृष्ठे) म्हणजे पाण्यावर एक नौका तरंगते, त्याप्रमाणे तूच (व्यचस्वतीम्‌) प्रभूतविद्या आणि सन्मानाची अधिकारिणी आणि (प्रथस्वतीम्‌) उत्तम कीर्तिमान अशा (त्वा) तुला (प्रजापति परमात्मा) (सादयुत) उच्च स्थानावर स्थापित करो. तू (पृथिवी) भूमीप्रमाणे सर्वांना सुख देणारी (असि) आहेस, त्यामुळे (राज्यातील) स्त्रियांना योग्य तो न्याय देण्याविषयी तू (प्रथस्व) प्रसिद्ध हो. (तुझ्याप्रमाणे) तुझ्या पत्नीने देखील पुरूषांच्या प्रकरणात न्याय द्यावा. ॥17॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सर्व राजपुरुषांकरिता हे उचित कर्म आहे की ते ज्या ज्या कार्यात (न्यायदान, शासन आदी राज्यकर्यात) प्रवृत्त होतात, त्या त्या राज्यकार्यात आपापल्या पत्नीलाही सहभागी करून घ्यावे. पुरुषांनी प्रजेतील जनांच्या प्रकरणात आणि स्त्री-अधिकाऱ्यांनी स्त्रियांच्या प्रकरणात (प्रश्‍न, अडचणी, समस्या आदीबाबत) न्यायदान करीत असावे. ॥17॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top