Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 36
    ऋषिः - भरद्वाज ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृद्गायत्री स्वरः - षड्जः
    2

    अग्ने॑ यु॒क्ष्वा हि ये तवाश्वा॑सो देव सा॒धवः॑। अरं॒ वह॑न्ति म॒न्यवे॑॥३६॥

    स्वर सहित पद पाठ

    अग्ने॑। यु॒क्ष्व। हि। ये। तव॑। अश्वा॑सः। दे॒व॒। सा॒धवः॑। अर॑म्। वह॑न्ति। म॒न्यवे॑ ॥३६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्ने युक्ष्वा हि ये तवाश्वासो देव साधवः । अरँ वहन्ति मन्यवे ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्ने। युक्ष्व। हि। ये । तव। अश्वासः। देव। साधवः। अरम्। वहन्ति। मन्यवे॥३६॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 36
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (देव) उत्तम विद्यावान (अग्ने) तेजस्वी विद्वान (हे युद्धकलानिपुण पराक्रमी सेनापती वा सैनिक) (तव) तुमचे (ये) जे (साधव:) युद्धकार्यात; उपयोगी आणि इप्सीत उद्दिष्टाला प्राप्त करून देणारे (आश्‍वास:) युद्धकार्यात उपयोगी आणि इप्सीत उद्दिष्टाला प्राप्त करून देणारे (अश्‍वास:) प्रशिक्षत घोडे आहेत, ते (मन्यत्रे) शत्रूंवर क्रोध करण्यासाठी (पराभूत करण्यासाठी) (अरम्‌) पूर्ण सामर्थ्यानिशी (वृहन्ति) रथ आदी यान (युद्धक्षेत्रापर्यंत) ओढून नेतात, त्या घोड्यांना तुम्ही (हि) अवश्‍य (युक्ष्व) रथ वा वाहनांमध्ये जुंपा (शत्रू समोर उभा ठाकला आहे अथवा तो आक्रमणाची तयारी करीत आहे, याकरिता तुम्ही देखील लवकर रथ तयार करून विजयासाठी सिद्ध व्हा) ॥36॥

    भावार्थ - भावार्थ - राजा, सेनापती अश्‍वारोही सैनिक आदींनी वसंत ऋतूमध्ये प्रथम हे केले पाहिजे की घोडदळाला प्रशिक्षित करून तयार ठेवावे, रथांच्या संचालनासाठी सारथी, रथी आदींची नियुक्ती करावी आणि नंतर शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी, विजय-यात्रेसाठी निघावे. ॥36॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top