Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 31
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - वरुणो देवता छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    त्रीन्त्स॑मु॒द्रान्त्सम॑सृपत् स्व॒र्गान॒पां पति॑र्वृष॒भऽ इष्ट॑कानाम्। पुरी॑षं॒ वसा॑नः सुकृ॒तस्य॑ लो॒के तत्र॑ गच्छ॒ यत्र॒ पूर्वे॒ परे॑ताः॥३१॥

    स्वर सहित पद पाठ

    त्रीन्। स॒मु॒द्रान्। सम्। अ॒सृ॒प॒त्। स्व॒र्गानिति॑ स्वः॒ऽगान्। अ॒पाम्। पतिः॑। वृ॒ष॒भः। इष्ट॑कानाम्। पुरी॑षम्। वसा॑नः। सु॒कृ॒तस्येति॑ सुऽकृ॒तस्य॑। लो॒के। तत्र॑। ग॒च्छ॒। यत्र॑। पूर्वे॒। परे॑ता॒ इति परा॑ऽइताः ॥३१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    त्रीन्त्समुद्रान्त्समसृपत्स्वर्गानपाम्पतिर्वृषभऽइष्टकानाम् । पुरीषँवसानः सुकृतस्य लोके तत्र गच्छ यत्र पूर्वे परेताः ॥


    स्वर रहित पद पाठ

    त्रीन्। समुद्रान्। सम्। असृपत्। स्वर्गानिति स्वःऽगान्। अपाम्। पतिः। वृषभः। इष्टकानाम्। पुरीषम्। वसानः। सुकृतस्येति सुऽकृतस्य। लोके। तत्र। गच्छ। यत्र। पूर्वे। परेता इति पराऽइताः॥३१॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 31
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वान महोदय, (सूर्य) (अपाम्‌) प्राणांचा, जीवनाचा (पति:) रक्षक आहे (सूर्यामुळे पृथ्वीवर जीवन आहे), (वृषभ:) सूर्य वृष्टीचे कारण आहे, (पुरीषम्‌) सुखदायक जलाचा (वसान:) आधार आहे, तो सूर्य (इष्टकामाम्‌) कामनाप्राप्तीसाठी काम्य अथवा वांछित पदार्थांचा आधार आहे. तो सूर्यच (त्रीन्‌) वर, खाली आणि मध्य या तीन्ही स्थानांत असणारा आहे (आकाश, पृथ्वी आणि भूगर्भ यातील सर्व पदार्थांचे सुख मिळून देणारा आहे) आणि (समुद्रात) भूत, भविष्यात आणि वर्तमान या तीन्ही काळात पदार्थांतील (स्वर्गान्‌) सुख (वा लाभ) मिळवून देणारा असून तो तीन्ही काळात व तीन्ही स्थानात (समसृपत्‌) विचरणारा आहे. (ज्याप्रमाणे हा सूर्य अत्यंत उपकारक आहे) तसे हे विद्वान, महोदय, आपणही आम्हा (सर्वजनांसाठी उपकारक) व्हा. (यंत्र ज्या वसंतऋतूमध्ये (सुकृतस्य) उत्तमकर्म करणाऱ्या लोकांच्या (लोक) अनुकरणीय मार्गाने अथवा (पूर्वे) पूर्वकाळी प्राचीन लोकांनी (परेता:) दाखविलेल्या सुखकर मार्गाने जाऊन अनेक लोक लोकांनी सुख प्राप्ती केली आहे, (तत्र) त्या वसंत ऋतूतील लाभांचे सेवन करून तुम्ही देखील करा (आणि आम्हालाही सुख मिळवून द्या) ॥31॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे सर्व मनुष्यांसाठी हे उचित आहे की, तू धर्मात्मा लोकांच्या मार्गाचे अनुसरण करीत शारीरिक, वाचिक आणि मानसिक या तीन प्रकारचे सुख प्राप्त करावेत. ज्याप्रमाणे वसंत आदी ऋतू आपल्या नियतक्रमाने येत आपापली ऋतुगत वैशिष्ट्यें प्रगट करतात, मनुष्यांनीदेखील त्या त्या ऋतूच्या अनुकूल असे व्यवहार करून (ऋतुनुसार जीवन यापन व दिनचर्या ठेऊन आनंद प्राप्त करावा ॥31॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top