Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 16
    ऋषिः - त्रिशिरा ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - स्वराडार्ष्यनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    ध्रु॒वासि॑ ध॒रुणास्तृ॑ता वि॒श्वक॑र्मणा। मा त्वा॑ समु॒द्रऽ उद्व॑धी॒न्मा सु॑प॒र्णोऽअव्य॑थमाना पृथि॒वीं दृ॑ꣳह॥१६॥

    स्वर सहित पद पाठ

    ध्रु॒वा। अ॒सि॒। ध॒रुणा॑। आस्तृ॒तेत्याऽस्तृ॑ता। वि॒श्वक॑र्म॒णेति॑ वि॒श्वऽक॑र्मणा। मा। त्वा॒। स॒मु॒द्रः। उत्। व॒धी॒त्। मा। सु॒प॒र्ण इति॑ सुऽप॒र्णः। अव्य॑थमाना। पृ॒थि॒वीम्। दृ॒ꣳह॒ ॥१६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    धु्रवासि धरुणास्तृता विश्वकर्मणा । मा त्वा समुद्र उद्बधीन्मा सुपर्णा व्यथमाना पृथिवीन्दृँह ॥


    स्वर रहित पद पाठ

    ध्रुवा। असि। धरुणा। आस्तृतेत्याऽस्तृता। विश्वकर्मणेति विश्वऽकर्मणा। मा। त्वा। समुद्रः। उत्। वधीत्। मा। सुपर्ण इति सुऽपर्णः। अव्यथमाना। पृथिवीम्। दृꣳह॥१६॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 16
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे राजपत्नी, (विश्‍वकर्मणा) सर्व धर्मयुक्त कार्य करणाऱ्या आपल्या पतीसह तू आनंदाने राहत आहेस. (आस्तृता) सुंदर वस्त्र-आभूषणादींनी आणि उत्तम गुणांनी तू समृद्ध आहेस (धरूणा) विद्या आणि धर्म या दोन्ही पालन करणारी (धर्माप्रमाणे वागणारी) आणि (ध्रुवा) धैर्यशीला अथवा (पतिगृही स्थिरपणे सदैव राहणारी) (असि) आहेस. (आम्ही प्रजेतील सर्व स्त्रिया अशी कामना करीत आहोत की) तू सदैव (अव्ययमाना) पीडा व दु:खापासून दूर असावी (तुला दु:ख कष्ट होऊ नये आणि अशाप्रकारे तू (पृथिवीम्‌) आपल्या या राज्याचा सदा (उदंड) उत्कर्ष करीत रहा. (समुद्र:) (त्वा) (समुद्र:) तू कधीही दुराचारी जार लोकांप्रमाणे (मा) (वधीत) वागू नकोस (वा त्यांच्याशी संबंध येऊ नये.) तसेच (सुपर्ण:) बलवान शरीराचा आणि सुंदर अंग असलेला तुझा पती (मा) कधीही तुझा घातक होऊ नये. (पतिकडून तुला कोणताही त्रास होऊ नये) ॥16॥

    भावार्थ - भावार्थ - राजा जसा राजनीतीविद्येत कुशल असावा, त्याची पत्नीदेखील तशीच सुविद्य आणि राजकारणप्रवीण असावी. दोघांनी नेहमी एकमेकाशी प्रामाणिक आणि विश्‍वासार्ह असावे. पत्नीने पतिव्रता आणि पतीने पत्नीव्रत असावे. आणि न्याय्यरीतीने प्रजेचे पालन करावे. दोघांनी नेहमी व्यभिचार आणि कामवासनेपासून दूर राहून धर्मानुसार संतोत उत्पन्न करावीत. राणीने स्त्रियांच्या प्रश्‍नांबाबत आणि राजाने पुरुषांच्या प्रकरणात न्याय करावा. ॥16॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top