Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 4
    ऋषिः - हिरण्यगर्भ ऋषिः देवता - प्रजापतिर्देवता छन्दः - आर्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    5

    हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ऽ आसीत्। स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम॥४॥

    स्वर सहित पद पाठ

    हि॒र॒ण्य॒ग॒र्भ इति॑ हिरण्यऽग॒र्भः। सम्। अ॒व॒र्त्त॒त॒। अग्रे॑। भू॒तस्य॑। जा॒तः। पतिः॑। एकः॑। आ॒सी॒त्। सः। दा॒धा॒र॒। पृ॒थि॒वीम्। द्याम्। उ॒त। इ॒माम्। कस्मै॑। दे॒वाय॑। ह॒विषा॑। वि॒धे॒म॒ ॥४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् । स दाधार पृथिवीन्द्यामुतेमाङ्कस्मै देवाय हविषा विधेम ॥


    स्वर रहित पद पाठ

    हिरण्यगर्भ इति हिरण्यऽगर्भः। सम्। अवर्त्तत। अग्रे। भूतस्य। जातः। पतिः। एकः। आसीत्। सः। दाधार। पृथिवीम्। द्याम्। उत। इमाम्। कस्मै। देवाय। हविषा। विधेम॥४॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 4
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (उपासनेचा विधी जाणणारे अनुभवप्राप्त उपासकगण सर्व मनुष्यांना सांगत आहेत) हे मनुष्यांनो, जो परमेश्‍वर या (भूतस्य) उत्पन्न झालेल्या जगाचा (जात) उत्पत्तिकर्ता आहे, जो या जगाचा (पति:) पालक असून तो त्याचासारखा (एक:) तो केवळ एकच आहे व त्यास कोणाच्या साहाय्याची आवश्‍यकता नाही. तो (हिरण्यगर्भ:) सूर्य आदी सर्व ते जो सर्व पदार्थांचा आधार आहे आणि तोच (अग्ने) सृष्टिरचनेपूर्वी (समनर्तत) विद्यमान (आसीत) होता. (स:) तोच (इमाम्‌) या संसाराची रचना करून (उत) आणि (पृथिवीम्‌) प्रकाशरहित लोकांना (म्हणजे जे स्वत: प्रकारामुक्त नसून परत: प्रकाशमान आहेत) अशा आणि (द्याम्‌) प्रकाशयुक्त म्हणजे स्वत: प्रकाशमान सूर्य आदी लोकांना (दाधार) धारण करीत होता (आणि आहे) त्या (करमै) सुखस्वरूप प्रजापालक (देवाय) सर्व प्रकाशांचा जो प्रकाश त्या परमेश्‍वराची आम्ही उपासक गण) ज्याप्रमाणे (हविषा) आत्म्यादीद्वारा (विधेम) सेवा करतो (उपासना करतो) तद्वत तुम्ही सर्व मनुष्य देखील त्याची उपासना करा. ॥4॥

    भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यांनो, तुम्हांस हे जाणून घेणे उचित आहे की सृष्टीरचनेपूर्वी परमेश्‍वर विद्यमान होता. तो जीवमात्राचे, तसेच प्रगत निद्रेतील सुषुप्ती अवस्थेत लीन जगाचे (प्रकृतीचे) कारण होता. तसेच तो अत्यंत सुक्ष्मावस्थेत असून आकाशवत स्थिर होता. ज्या अशा परमात्म्याने जगाची उत्पत्ती करून तिचे धारण केले (करीत आहे) आणि जो सृष्टीच्या अंतकाळी प्रलय करतो, तुम्ही त्या परमात्म्यालाच उपासनीय माना (अन्य कोणासही नको) ॥4॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top