यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 40
अ॒ग्निर्ज्योति॑षा॒ ज्योति॑ष्मान् रु॒क्मो वर्च॑सा॒ वर्च॑स्वान्। स॒ह॒स्र॒दाऽ अ॑सि स॒हस्रा॑य त्वा॥४०॥
स्वर सहित पद पाठअ॒ग्निः। ज्योति॑षा। ज्योति॑ष्मान्। रु॒क्मः। वर्च॑सा। वर्च॑स्वान्। स॒ह॒स्र॒दा इति॑ सहस्र॒ऽदाः। अ॒सि॒। स॒हस्रा॑य। त्वा॒ ॥४० ॥
स्वर रहित मन्त्र
अग्निर्ज्यातिषा ज्योतिष्मान्रुक्मो वर्चसा वर्चस्वान् । सहस्रदाऽअसि सहस्राय त्वा॥
स्वर रहित पद पाठ
अग्निः। ज्योतिषा। ज्योतिष्मान्। रुक्मः। वर्चसा। वर्चस्वान्। सहस्रदा इति सहस्रऽदाः। असि। सहस्राय। त्वा॥४०॥
विषय - पुढील मंत्रात देखील तोच विषय प्रतिपादित आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे विद्वान महोदय, आपण (ज्योतिषा) विद्येच्या प्रकाशामुळे ज्योतिष्मान आहात (अग्नि:) अग्नीच्या प्रकाशाप्रमाणे स्तुतियोग्य, (वर्चसा) आपल्या तेजामुळे तेजस्वी आणि (वर्चस्वान्) ज्ञानाचे दान करणारे आहात. जसे (रुक्म:) सुवर्ण सुखदायक असते, तसे (आपल्या ज्ञान-विज्ञानाच्या समृद्धीमुळे) आपण वां--- (असि) आहात. (या गुणांमुळे) आम्ही (सहस्राय) अतुलनीय, बहुमुल्य विज्ञानाच्या प्राप्तीसाठी (त्वा) आपला सत्कार करतो. (आपली स्तुती करून आम्हाला ज्ञानदान व मार्गदर्शन करण्याची विनंती करतो) ॥40॥
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांसाठी हे उचित व हितकर आहे की त्यांनी अग्नी आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी विद्वान मनुष्यांकडे जावे आणि त्याच्याकडून विद्या, (ज्ञान, कला आदी) शिकून पूर्ण विद्यावान व्हावे. ॥40॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal