Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 21/ मन्त्र 15
    ऋषिः - स्वस्त्यात्रेय ऋषिः देवता - विद्वांसो देवता छन्दः - निचृदनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    सु॒ब॒र्हिर॒ग्निः पू॑षण्वान्त्स्ती॒र्णब॑र्हि॒रम॑र्त्यः।बृ॒ह॒ती छन्द॑ऽइन्द्रि॒यं त्रि॑व॒त्सो गौर्वयो॑ दधुः॥१५॥

    स्वर सहित पद पाठ

    सु॒ब॒र्हिरिति॑ सु॒ऽब॒र्हिः। अ॒ग्निः। पू॒ष॒ण्वानिति॑ पूष॒ण्ऽवान्। स्ती॒र्णब॑र्हिरिति॑ स्ती॒र्णऽब॑र्हिः। अम॑र्त्यः। बृ॒ह॒ती। छन्दः॑। इ॒न्द्रि॒यम्। त्रि॒व॒त्स इति॑ त्रिऽव॒त्सः। गौः। वयः॑। द॒धुः॒ ॥१५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सुबर्हिरग्निः पूषण्वान्त्स्तीर्णबर्हिरमर्त्यः । बृहती छन्दऽइन्द्रियन्त्रिवत्सो गौर्वयो दधुः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सुबर्हिरिति सुऽबर्हिः। अग्निः। पूषण्वानिति पूषण्ऽवान्। स्तीर्णबर्हिरिति स्तीर्णऽबर्हिः। अमर्त्यः। बृहती। छन्दः। इन्द्रियम्। त्रिवत्स इति त्रिऽवत्सः। गौः। वयः। दधुः॥१५॥

    यजुर्वेद - अध्याय » 21; मन्त्र » 15
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पूषण्वान्‌) पोषकगुणांनी युक्त (स्तीर्णबर्हिः) आकाशात व्याप्त असणाऱ्या आणि (सुबर्हिः) आकाश शुद्ध करणाऱ्या (अग्निः) अग्नी प्रमाणे (तेजस्वी) असलेल्या (अमर्त्यः) स्वरूपेण अविनाशी असलेला एक महान मनुष्य ज्याप्रमाणे (बृहती) बृहती (छन्दः) (छंदातील मंत्रातील विचारांद्वारे) (इन्द्रियम्‌) जीवनाची लक्षणें धारण करतो आणि (त्रिवत्सः) गायीच्या मागे जसे तिचे वासरू, त्याप्रमाणे तीन पदार्थ म्हणजे शरीर, इंद्रिये आणि मन हे तीन पदार्थ ज्याचे अनुगामी आहेत (हे तीन ज्याला वशीभूत आहेत) तो (गौः) गायी प्रमाणे (शांत व सुस्वभावी) मनुष्य (वयः) तृप्ती व संतोष भाव प्राप्त करतो, सर्व लोकांनी त्याच्याप्रमाणे तृप्ती व संतोषभाव धारण केला पाहिजे ॥15॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा आहे. जसा अग्नी अंतरिक्षात सर्वत्र गती करतो, तसे विद्वज्जनांची सूक्ष्म आणि निराकार पदार्थांच्या विद्येत (भौतिकशास्त्र अथवा अध्यात्मशास्त्र) गती असते. ज्याप्रमाणे वासरू गायीच्या मागे मागे जातो, तद्वत अविद्वान लोकांनी विद्वानांचे अनुगमन केले पाहिजे ॥15॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top