यजुर्वेद - अध्याय 21/ मन्त्र 61
ऋषिः - स्वस्त्यात्रेय ऋषिः
देवता - लिङ्गोक्ता देवताः
छन्दः - भुरिग् विकृतिः
स्वरः - मध्यमः
4
त्वाम॒द्यऽऋ॑षऽआर्षेयऽऋषीणां नपादवृणीता॒यं यज॑मानो ब॒हुभ्य॒ऽआ सङ्ग॑तेभ्यऽए॒ष मे॑ दे॒वेषु॒ वसु॒ वार्याय॑क्ष्यत॒ऽइति॒ ता या दे॒वा दे॑व॒ दाना॒न्यदु॒स्तान्य॑स्मा॒ऽआ च॒ शास्स्वा च॑ गुरस्वेषि॒तश्च॑ होत॒रसि॑ भद्र॒वाच्या॑य॒ प्रेषि॑तो॒ मानु॑षः सू॒क्तवा॒काय॑ सू॒क्ता ब्रू॑हि॥६१॥
स्वर सहित पद पाठत्वाम्। अ॒द्य। ऋ॒षे॒। आ॒र्षे॒य॒। ऋ॒षी॒णा॒म्। न॒पा॒त्। अ॒वृ॒णी॒त॒। अ॒य॒म्। यज॑मानः। ब॒हुभ्य॒ इति॑ ब॒हुऽभ्यः॑। आ। सङ्ग॑तेभ्यः॒ इति स्ऽग॑तेभ्यः। ए॒षः। मे॒। दे॒वेषु॑। वसु॑। वारि॑। आ। य॒क्ष्य॒ते॑। इति॑। ता। या। दे॒वाः। दे॒व॒। दाना॑नि। अदुः॑। तानि॑। अ॒स्मै॒। आ। च॒। शास्व॑। आ। च॒। गु॒र॒स्व॒। इ॒षि॒तः। च॒। होतः॑ असि॑। भ॒द्र॒वाच्यायेति॑ भद्र॒ऽवाच्या॑य। प्रेषि॑त॒ इति॒ प्रऽइ॑षितः। मानु॑षः। सू॒क्त॒वा॒का॒येति॑ सूक्तऽवा॒काय॑। सू॒क्तेति॑ सुऽउ॒क्ता। ब्रू॒हि॒ ॥६१ ॥
स्वर रहित मन्त्र
त्वामद्यऽऋषऽआर्षेयऽऋषीणान्नपादवृणीतायँयजमानो बहुभ्यऽआ सङ्गतेभ्यऽएष मे देवेषु वसु वार्यायक्ष्यतऽइति ता या देवा देव दानान्यदुस्तान्यस्माऽआ च शास्स्वा च गुरस्वेषितश्च होतरसि भद्रवाच्याय प्रेषितो मानुषः सूक्तवाकाय सूक्ता ब्रूहि ॥
स्वर रहित पद पाठ
त्वाम्। अद्य। ऋषे। आर्षेय। ऋषीणाम्। नपात्। अवृणीत। अयम्। यजमानः। बहुभ्य इति बहुऽभ्यः। आ। सङ्गतेभ्यः इति स्ऽगतेभ्यः। एषः। मे। देवेषु। वसु। वारि। आ। यक्ष्यते। इति। ता। या। देवाः। देव। दानानि। अदुः। तानि। अस्मै। आ। च। शास्व। आ। च। गुरस्व। इषितः। च। होतः असि। भद्रवाच्यायेति भद्रऽवाच्याय। प्रेषित इति प्रऽइषितः। मानुषः। सूक्तवाकायेति सूक्तऽवाकाय। सूक्तेति सुऽउक्ता। ब्रूहि॥६१॥
विषय - मनुष्यांनी आपले वर्तन कसे ठेवावे, याविषयी -
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे (ऋषे) मंत्राचा अर्थ जाणणाऱ्या विद्वान अथवा हे (आर्षेय) मंत्रज्ञाता विद्वानांत श्रेष्ठ असलेल्या मनुष्या, (ऋषीणाम्) मंत्रार्थ माता विद्वानांची (नपात्) संतान असलेला हा (यजमानः) यज्ञकर्ता (युवक वा युवती) (अद्य) आज (बहुभ्यः) अनेकांच्या (संगतेभ्यः) (वा त्यांच्यासह) (त्वाम्) तुला (आ वृणीत) स्वीकार करो (मंत्रार्थ जाणण्याची इच्छा असलेल्या अनेकांनी मंत्रार्थज्ञाता ऋषीजवळ वा श्रेष्ठ ऋषीकडे जावे) तसेच (एषः) हे (देवेषु) विद्वानांसाठी (मे) मी देत असलेले (वसु) धन आणि (वारि) जल (त्या विद्वानांनी) ग्रहण करावे. हे (देव) विद्वान, जो दातव्य वा देण्यास व योग्य पदार्थ (आयक्ष्यते) सर्व दिशांतून संग्रहीत केला जातो (च) आणि (देवाः) विद्वज्जन (या) जे (दानानि) दातव्य पदार्थ (याचक वा गरजवंतांना) देतात (तावि) ते ते सर्व पदार्थ (अस्मै) या यज्ञ करणाऱ्याला (आ, शास्व) देण्याविषयी सांगा. याशिवाय (प्रेषितः) (ऋषीकडून मंत्रार्थ प्राप्त ) केलेल्या हे जिज्ञासू विद्यार्थी, तू (आ, गुरस्व) चांगल्याप्रकारे उद्यम-व्यवसाय कर (मंत्रार्थाप्रमाणे आचरण करून उत्तम धन अर्जित कर) (च) या शिवाय, हे (होतः) दानी (इषितः) सर्वंप्रिय वा सर्ववांछित (मानुषः) मनुष्या, तू (भद्रवाच्याय) ज्याच्यावषियी चांगले बोलावे आणि (सूक्तवाकाय) ज्याच्या कथनात उत्तमोत्तम वचनें असतात, अशा भद्रपुरुषासाठी (सूक्त) चांगली वचनें (मधुर भाषा) (ब्रहि) बोल (दात्याने प्रशंसनीय भद्र पुरुषाला दान द्यावे व देतांना भद्र वचनें बोलावीत गर्व करू नये) (इति) हे असे सांगणे यासाठी की तुम्ही (ता) ते उत्तम पदार्थ प्राप्त केले (असि) आहात. (त्यामुळे इतरांना तुमच्याप्रमाणे ज्ञान आणि धन मिळू द्या) ॥61॥
भावार्थ - भावार्थ - जे लोक अनेक विद्वानांपैकी महाविद्वान असलेल्या विद्वानांकडे जाऊन वेदादी शास्त्रांच्या विद्येचे अध्ययन करून महर्षी होतात (त्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी) इतरांना शिकवावे. तसेच जे उद्यमशील (व्यावसायिक) असतील, त्यांनी आपल्या उद्योग-व्यवसायाचे गहन ज्ञान अविद्वान (वा त्या उद्यमात नवखे असलेल्या) लोकांना सांगावे. तसेच विद्वानांनी अज्ञानीजनांवर दया करण्यासाठी त्यांना विद्याग्रहणासाठी प्रवृत्त करावे, प्रसंगी रागावून वा दंडित करून देखील त्यांना विद्यावान अवश्य करावे, त्यांना सभ्य बनवावे. असे करणारी माणसें या जगात सत्काराला पात्र ठरतात. ॥61॥
टिप्पणी -
या अध्यायात वरूण, अग्नी, विद्वान, राजा, प्रजा, शिल्प म्हणजे कला वा कलाकौशल्य, वाणी, गृह, अश्विन् या शब्दांचे अर्थ, तसेच ऋतु आणि होता आदी पदार्तांचे गुणवर्णन आहे, त्यामुळे या अध्यायात सांगितलेल्या विषयांची व अर्थाची संगती मागील अध्यायात सांगितलेल्या अर्थाशी सुसंगत आहे, असे जाणावे.^यजुर्वेदाचा 21 वा अध्याय समाप्त
Acknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal