Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 21/ मन्त्र 53
    ऋषिः - स्वस्त्यात्रेय ऋषिः देवता - अश्व्यादयो देवताः छन्दः - भुरिगतिजगती स्वरः - निषादः
    2

    दे॒वा दे॒वानां॑ भि॒षजा॒ होता॑रा॒विन्द्र॑म॒श्विना॑। व॒ष॒ट्का॒रैः सर॑स्वती॒ त्विषिं न हृद॑ये म॒तिꣳ होतृ॑भ्यां दधुरिन्द्रि॒यं व॒सु॒वने॑ वसु॒धेय॑स्य व्यन्तु॒ यज॑॥५३॥

    स्वर सहित पद पाठ

    दे॒वा। दे॒वाना॑म्। भि॒षजा॑। होता॑रौ। इन्द्र॑म्। अ॒श्विना॑। व॒ष॒ट्का॒रैरिति॑ वषट्ऽका॒रैः। सर॑स्वती। त्विषि॑म्। न। हृद॑ये। म॒तिम्। होतृ॑भ्या॒मिति॒ होतृ॑ऽभ्याम्। द॒धुः॒। इ॒न्द्रि॒यम्। व॒सु॒वन॒ इति॑ वसु॒ऽवने॑। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। व्य॒न्तु॒। यज॑ ॥५३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    देवा देवानाम्भिषजा होताराविन्द्रमश्विना । वषट्कारैः सरस्वती त्विषिन्न हृदये मतिँ होतृभ्यान्दधुरिन्द्रियँवसुवने वसुधेयस्य व्यन्तु यज ॥


    स्वर रहित पद पाठ

    देवा। देवानाम्। भिषजा। होतारौ। इन्द्रम्। अश्विना। वषट्कारैरिति वषट्ऽकारैः। सरस्वती। त्विषिम्। न। हृदये। मतिम्। होतृभ्यामिति होतृऽभ्याम्। दधुः। इन्द्रियम्। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। व्यन्तु। यज॥५३॥

    यजुर्वेद - अध्याय » 21; मन्त्र » 53
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वज्जनहो, ज्याप्रमाणे (देवानाम्‌) सुखदायक विद्वानांमध्ये आपण (होतारौ) अधिक सुख देणारे आहात आणि (देवा) वैद्यकविद्येमधे कुशल (भिषजा) वैद्यजन (अश्विना) आपल्या विद्येत रममाण होत (वषट्कारैः) आपल्या उत्तम (उपचारादी) कामांमुळे (इन्द्रम्‌) ऐश्वर्य धारण करतात (तसे हे विद्वान, तूही धारण कर) तसेच (सरस्वती) प्रशंसनीय विद्यावती आणि सुसंस्कृत वाणी बोलणारी स्त्री (त्विषिम्‌) प्रकाशा (न) प्रमाणे (हृदय) आपल्या अंतःकरणात (मतिम्‌) बुद्धी धारण करते (वाणी, भावना आणि विचार यांची सुयोग्य संगती ठेवते) (तसे तुम्हीही करा) तसेच (होतृभ्याम्‌) देणाऱ्यांनी सहद्य आणि मधुरभाषिणी स्त्रीला (वसुधेयस्य) कोशातील (वसुवने) धन वाटण्यासाठी (इन्द्रियम्‌) आपले मन शुद्ध (दधुः) न मुक्त ठेवावे. (दानी लोकांनी वैद्यांना आणि विदुषीनां आपल्या कोषातील धन दान द्यावे) ते धन त्यांना (व्यन्तु) प्राप्त व्हावे. हे विद्वान्‌, तूही (यज) (आपल्या व्यवहारात सद्गुण ग्रहण आणि दान ???) संगती करीत जा ॥53॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. ज्याप्रमाणे विद्वानांतील अधिक विद्वान आणि वैद्यातील सद्वैद्य आपल्या श्रेष्ठ कार्याद्वारे सर्वांना नीरोग व कीर्तीमान करतात, त्याच प्रमाणे विद्वानांची वाणी विद्यार्थ्यांच्या मनात श्रेष्ठ ज्ञान अधिकाधिक वाढविते. त्यांच्याप्रमाणेच सामान्यजनांनी देखील विद्या आणि धन संग्रहीत केले पाहिजे ॥53॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top