यजुर्वेद - अध्याय 21/ मन्त्र 20
ऋषिः - स्वस्त्यात्रेय ऋषिः
देवता - विश्वेदेवा देवताः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
4
त्वष्टा॑ तु॒रीपो॒ऽअद्भु॑तऽइन्द्रा॒ग्नी पु॑ष्टि॒वर्ध॑ना।द्विप॑दा॒ छन्द॑ऽइन्द्रि॒यमु॒क्षा गौर्न वयो॑ दधुः॥२०॥
स्वर सहित पद पाठत्वष्टा॑। तु॒रीपः॑। अद्भु॑तः। इ॒न्द्रा॒ग्नीऽइति इन्द्रा॒ग्नी। पु॒ष्टि॒वर्ध॒नेति॑ पुष्टि॒ऽवर्ध॑ना। द्विप॑देति॒ द्विऽप॑दा। छन्दः॑। इ॒न्द्रि॒यम्। उ॒क्षा। गौः। न। वयः॑। द॒धुः॒ ॥२० ॥
स्वर रहित मन्त्र
त्वष्टा तुरीपोऽअद्भुतऽइन्द्राग्नी पुष्टिवर्धना । द्विपदा छन्द इन्द्रियमुक्षा गौर्न वयो दधुः ॥
स्वर रहित पद पाठ
त्वष्टा। तुरीपः। अद्भुतः। इन्द्राग्नीऽइति इन्द्राग्नी। पुष्टिवर्धनेति पुष्टिऽवर्धना। द्विपदेति द्विऽपदा। छन्दः। इन्द्रियम्। उक्षा। गौः। न। वयः। दधुः॥२०॥
विषय - पुढील मंत्रात त्याच विषयी -
शब्दार्थ -
हे मनुष्यांनो, (अद्भुतः) आश्चर्य युक्त गुण, कर्म आणि स्वभाव असलेले (तुरीपः) शीघ्र प्राप्त होणारे (वा त्वरित लाभ देणारे) तसेच (त्वष्टा) (वस्तूंना) सूक्ष्म रूप देणारे व (पुष्टिवर्द्धना) पुष्टिकारक (इन्द्राग्नी) पवन आणि अग्नी, हे दोन पदार्थ (जीवन धारण करतात, जीवनाचे कारण असतात. वायू आणि अग्नीचे गुण, कार्य व लाभ वेगळे अद्भूत आहेत. ते वस्तूना सूक्ष्म करतात आणि शक्ती-पोषण देतात, तसे हे मनुष्यानो, तुम्हीही काही अद्भुत करा) याशिवाय पवन व अग्नी (द्विपदा) (दोन पाद वा चरण असलेल्या) (छन्दः) छंदाला, (इन्द्रियम्) कर्ण आदी इंद्रियांना व (उक्षा) (गौः) (न) सेचन (वा गर्भाधानकरण्यास समर्थ) बैलाप्रमाणे (वयः) जीवन (दधुः) धारण करतात (पवन व अग्नी इंद्रियांना जीवन देतात आणि द्विपाद छंदातील मंत्राद्वारे जीवन शक्ती देतात) त्याप्रमाणे हे मनुष्यांनो, तुम्हीही प्राणशक्ती (वा जीवनाविषयी उत्साह जागृत) करा ॥20॥
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. (गौः, न) ज्याप्रमाणे भौतिक अग्नी (आग) विद्युत, जाठराग्नी आणि वडवानल (समुद्रातील आग) हे चार अग्नी आणि प्राण, इंद्रिये, व गौ आदी पशू सर्व जगाला पुष्टी वा जीवनशक्ती देतात, त्याप्रमाणे सर्व लोकांनी ब्रह्मचर्यादीद्वारे आपली आणि इतरांची शक्ती वाढविली पाहिजे ॥20॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal