Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 25/ मन्त्र 11
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - ईश्वरो देवता छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    8

    यः प्रा॑ण॒तो नि॑मिष॒तो म॑हि॒त्वैक॒ऽइद्राजा॒ जग॑तो ब॒भूव॑।य ईशे॑ऽअ॒स्य द्वि॒पद॒श्चत॒ु॑ष्पदः॒ कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम॥११॥

    स्वर सहित पद पाठ

    यः। प्रा॒ण॒तः। नि॒मि॒ष॒त इति॑ निऽमिष॒तः। म॒हि॒त्वेति॑ महि॒ऽत्वा। एकः॑। इत्। राजा॑। जग॑तः। ब॒भूव॑। यः। ईशे॑। अ॒स्य। द्वि॒पद॒ इति॑ द्वि॒ऽपदः॑। चतु॑ष्पदः। चतुः॑पद॒ इति॑ चतुः॑ऽपदः। कस्मै॑। दे॒वाय॑। ह॒विषा॑। वि॒धे॒म॒ ॥११ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यः प्राणतो निमिषतो महित्वैक इद्राजा जगतो बभूव । य ईशे अस्य द्विपदश्चतुष्पदः कस्मै देवाय हविषा विधेम ॥


    स्वर रहित पद पाठ

    यः। प्राणतः। निमिषत इति निऽमिषतः। महित्वेति महिऽत्वा। एकः। इत्। राजा। जगतः। बभूव। यः। ईशे। अस्य। द्विपद इति द्विऽपदः। चतुष्पदः। चतुःपद इति चतुःऽपदः। कस्मै। देवाय। हविषा। विधेम॥११॥

    यजुर्वेद - अध्याय » 25; मन्त्र » 11
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, (यः) जो सूर्य (प्राणतः) श्‍वास-प्रश्‍वास करणार्‍या प्राण्यांचा आणि (निमिषतः) व्यवहार करणार्‍या चेतन पदार्थांनी भरलेल्या (जगतः) सृष्टीचा आपल्या (महित्वा) सामर्थ्य आणि महतीद्वारे (एकः) एकमेव (इत्) अवश्यमेव (राजा) प्रकाश म्हणजे (उत्पत्ती व धारण) करणारा (बभूव) होता व आहे आणि सदैव असतो, तसेच (यः) जो (अस्य) या (द्विपदः) दोन पायांच्या-मनुष्यादी प्राण्यांचा आणि (चतुष्पदः) चार पाय असणार्‍या गौ आदी पशूंचा म्हणजे पशुरूप सृष्टिची (ईश) प्रकाश करतो (म्हणजे या सर्वाची उत्पत्ती पालन व धारण करतो) त्या (कस्मै) सुखकारक (देवाय) प्रकाशमान जगदीश्‍वराचे आम्ही ज्याप्रमाणे (हविषा) ग्रहण करण्यास योग्य पदार्थाद्वारे अथवा क्रिया-व्यवहारादीद्वारे (विधेम) सेवन करतो, (त्याची स्तुती, उपासना, प्रार्थना करतो). त्याप्रमाणे, तुम्हीही करीत जा ॥11॥

    भावार्थ - भावार्थ – या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जर या जगात सूर्य नसेल तर स्थावर वृक्ष आदी पदार्थ आणि जंगम म्हणजे मनुष्यादी पदार्थ, हे जग आपली कार्यें कदापि पूर्ण करू शकणार नाहीत. जो परमेश्‍वर सर्वश्रेष्ठ, सर्वोत्पादक आणि सफल ऐश्‍वर्य हेतू आहे, तोच सर्वांकरिता युक्तिपूर्वक शास्त्रसंमत रीतीने उपासनीय आहे. ॥11॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top