Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 15
    ऋषिः - वामदेव ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - भूरिक् त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    2

    अ॒यमि॒ह प्र॑थ॒मो धा॑यि धा॒तृभि॒र्होता॒ यजि॑ष्ठोऽअध्व॒रेष्वीड्यः॑। यमप्न॑वानो॒ भृग॑वो विरुरु॒चुर्वने॑षु चि॒त्रं वि॒भ्वं वि॒शेवि॑शे॥१५॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒यम्। इ॒ह। प्र॒थ॒मः। धा॒यि॒। धा॒तृभि॒रिति॑ धा॒तृऽभिः॑। होता॑। यजि॑ष्ठः। अ॒ध्व॒रेषु॑। ईड्यः॑। यम्। अप्न॑वानः। भृग॑वः। वि॒रु॒रु॒चुरिति॑ विऽरुरु॒चुः। वने॑षु। चि॒त्रम्। विभ्व᳕मिति॑ वि॒ऽभ्व॒म्। वि॒शेवि॑श॒ इति॑ वि॒शेऽवि॑शे ॥१५॥


    स्वर रहित मन्त्र

    अयमिह प्रथमो धायि धातृभिर्हाता यजिष्ठो अध्वरेष्वीड्यः । यमप्नवानो भृगवो विरुरुचुर्वनेषु चित्रँविभ्वँविशेविशे ॥


    स्वर रहित पद पाठ

    अयम्। इह। प्रथमः। धायि। धातृभिरिति धातृऽभिः। होता। यजिष्ठः। अध्वरेषु। ईड्यः। यम्। अप्नवानः। भृगवः। विरुरुचुरिति विऽरुरुचुः। वनेषु। चित्रम्। विभ्वमिति विऽभ्वम्। विशेविश इति विशेऽविशे॥१५॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 15
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (अप्नवान:) विद्येचा प्रसार आणि अध्यापन करून इतरांना विद्यावान करणारे विद्वज्जन (भृगव:) यज्ञविद्येचे ज्ञाता याज्ञिकजन (इह) या संसारात (वनेषु) वरणीय व सेवनीय ईश्‍वराची (अध्वरेषु) उपासना करतात आणि अग्नीहोत्रापासून अश्‍वमेधयज्ञापर्यंत आणि शिल्पविद्येने संपन्न होणार्‍या यज्ञात (विशे विशे) प्रजा अर्थात मनुष्यांकरिता (विश्‍वम्) व्यापक व (चित्रम्) आश्‍चर्यकारक, अद्भुत आणि अगम्य (यम्) ईश्‍वराची विशेष उपासना (विरूरूचु:) करतात आणि व्यापक तसेच अद्भुत गुणसंपन्न अग्नीचा यज्ञात उपयोग करतात, (अयम्) तो ईश्‍वर (धातृभि:) यज्ञ करणा्रया विद्वज्जनांसाठी (ईटव:) स्तवनीय आहे आणि गुणांचे आविष्कारण करून उपयोग घेण्यास योग्य आहे, अग्नी (प्रथम्) यज्ञकर्माचे आदिसाधर आहे (होता) यज्ञात अहुत पदार्थाचा स्वीकार करणारा आहे (यजिष्ठ) उपासनेचे ध्येय आणि शिल्पविद्येचे कारण आहे. त्यालाच (इह) या संसारात सर्व जण (धायि) धारण करतात म्हणजे त्यापासून लाभ घेतात. ॥15॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. विद्वानांसाठी हेच उचित कर्म आहे की त्यांनी यज्ञाचे मुख्य साधन असलेल्या आणि उपासनीय असलेल्या भौतिक अग्नीचा स्वीकार करावा व त्याद्वारे लोकांचे कल्याण करावे व त्यांना नित्य सुख द्यावे. ॥15॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top