यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 12
ऋषिः - विरूप ऋषिः
देवता - अग्निर्देवता
छन्दः - निचृत् गायत्री,
स्वरः - षड्जः
3
अ॒ग्निर्मू॒र्द्धा दि॒वः क॒कुत्पतिः॑ पृथि॒व्याऽअ॒यम्। अ॒पा रेता॑सि जिन्वति॥१२॥
स्वर सहित पद पाठअ॒ग्निः। मू॒र्द्धा। दि॒वः। क॒कुत्। पतिः॑। पृ॒थि॒व्याः। अ॒यम्। अ॒पाम्। रेता॑सि। जि॒न्व॒ति॒ ॥१२॥
स्वर रहित मन्त्र
अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम् । अपाँ रेताँसि जिन्वति ॥
स्वर रहित पद पाठ
अग्निः। मूर्द्धा। दिवः। ककुत्। पतिः। पृथिव्याः। अयम्। अपाम्। रेतासि। जिन्वति॥१२॥
विषय - पुढील मंत्रात अग्नी शब्दाने ईश्वर आणि भौतिक अग्नी, यांविषयी कथन केले आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - (अयम्) या मंत्राचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ- हा परमेश्वर त्याच्या कार्याद्वारे म्हणजे सृष्टीद्वारे प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष सृष्टीचे कारण आहे. तो (ककुट) सर्वांपेक्षा महान आहे. (मूर्द्धा) आपल्या महिमेने तो सर्वांपेक्षा उच्चतेत विराजमान आहे. (अग्नी:) असा तो जगदीश्वर सूर्यादी लोकांचे व (पृथिव्या:) पृथ्वी आदी लोकांचे (पति:) पालन करीत (अपाम्) प्राणांच्या (रेतांसि) सामर्थ्यास (जिन्वति) उत्पन्न करतो. प्राणशक्ती वाढवतो. तुम्ही त्या ईश्वरासच पूज्य माना. ॥1॥ दुसरा अर्थ (अग्निपरक) (अयम्) हा अग्नी (ककुत्) सर्व पदार्थांपेक्षा महान (दिव:) प्रकाशमान आणि (मूर्द्धा) सर्वांवर सत्ता चालविणारा असून (पृथिव्या:) प्रकाशरहित पृथ्वी आदी लोकांचे (पहि:) पालन करतो (त्यांच्या पालन-पोषण-रक्षणादीचा हेतू आहे) तोच (अमाप्) जलाचा (रेतांसि) शक्तीला (जिन्वति) प्राप्त होतो (आपल्या शक्तीने जलात शक्ती निर्माण करतो) (यंत्राद्वारे अग्नीच जलात वाष्परूपाने शक्ती निर्माण करतो) ॥12॥
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्लेषालंकार आहे परमेश्वराने प्रकाशमय आणि अप्रकाशमय जगाची म्हणजे प्रकाशमान सुर्यलोकाची व प्रकाशरहित पृथिवी आदी लोकांची रचना केली आहे. त्याद्वारे तोच सर्वांचे पालन करून प्राणांना शक्ती देतो. याच प्रकारे भौतिक अग्नी देखील पृथ्वी आदी सृष्टीचा पालक हेतू आहे. तोच विद्युत रूपाने व जाठराग्नी आदी रूपाने प्राण्यांत व पाण्यात सामर्थ्य उत्पन्न करतो (प्राणमय जीवांना कार्यशक्ती देतो व निर्जिव जलामधे शक्ती निर्माण करतो) ॥12॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal