Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 28
    ऋषिः - प्रबन्धु ऋषिः देवता - बृहस्पतिर्देवता छन्दः - विराट् गायत्री, स्वरः - षड्जः
    4

    सो॒मान॒ꣳ स्वर॑णं कृणु॒हि ब्र॑ह्मणस्पते। क॒क्षीव॑न्तं॒ यऽऔ॑शि॒जः॥२८॥

    स्वर सहित पद पाठ

    सो॒मान॑म्। स्व॑रणम्। कृ॒णु॒हि॒। ब्र॒ह्म॒णः॒। प॒ते॒। क॒क्षीव॑न्तम्। यः। औ॒शि॒जः ॥२८॥


    स्वर रहित मन्त्र

    सोमानँ स्वरणङ्कृणुहि ब्रह्मणस्पते । कक्षीवन्तँ यऽऔशिजः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सोमानम्। स्वरणम्। कृणुहि। ब्रह्मणः। पते। कक्षीवन्तम्। यः। औशिजः॥२८॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 28
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (ब्रह्मणस्पते) सनातन वेदशास्त्रदाता, पालनकर्ता परमेश्‍वरा, (य:) हा मी (औशिज:) सर्व विद्यांचे ज्ञान देणार्‍या विद्वान मनुष्याच्या पुत्राप्रमाणे आहे. अशामूळे तू (कक्षीवतम्) विद्या शिकण्यात तत्पर व उत्तम आचार युक्त कर (स्वरणम्) सर्व विद्यांचा उपदेश देणारा आणि (सोमानम्) औषधीचे रस काढणारा आणि त्याद्वारे विद्या (शरीर-उपचारादी) प्राप्त करणारा कर. या मंत्राची अशीच व्याख्या निरूक्तकार यास्कमुनीनी केली आहे. व्याख्या पाहण्याची इच्छा असल्यास मी केलेले संस्कृत-भाष्य पहावे. ॥28॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात लुप्तोपमालंकार आहे. पुत्र दोन प्रकारचे असतात, एक पुत्र तो जो पित्याची औरस सन्तती आहे, पित्याच्या वीर्यापासून उत्पन्न आहे. दुसरा पुत्र तो की ज्यास विद्या शिकवून विद्वान केले जाते. (म्हणजे तो गुरूचा शिष्य असून पुत्राप्रमाणे असतो.) सर्व मनुष्यांनी ईश्‍वराची प्रार्थना या करिता करावी की ज्या योगे आम्ही विद्यावान् होऊ, सर्व कर्म व्यवहारादीमधे कुशल व तज्ञ होऊ. तसेच सर्वांना अत्यंत आत्मीयतेने विद्या शिकविणारे पुत्रांचे पिता होऊ शकू (आमचे पुत्र इतरांना विद्या देणारे होवोत) ॥28॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top