Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 5
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्निवायुसूर्य्या देवताः छन्दः - दैवी बृहती,निचृत् बृहती, स्वरः - मध्यमः
    2

    भूर्भुवः॒ स्वर्द्यौरि॑व भू॒म्ना पृ॑थि॒वीव॑ वरि॒म्णा। तस्या॑स्ते पृथिवि देवयजनि पृ॒ष्ठेऽग्निम॑न्ना॒दम॒न्नाद्या॒याद॑धे॥५॥

    स्वर सहित पद पाठ

    भूः। भुवः॑। स्वः॑। द्यौरि॒वेति॒ द्यौःऽइ॑व। भू॒म्ना। पृ॒थि॒वीवेति॑ पृथि॒वीऽइ॑व। व॒रि॒म्णा॒। तस्याः॑। ते॒। पृ॒थि॒वि॒। दे॒व॒य॒ज॒नीति॑ देवऽयजनि। पृ॒ष्ठे। अ॒ग्निम्। अ॒न्ना॒दमित्य॑न्नऽअ॒दम्। अ॒न्नाद्या॒येत्य॑न्न॒ऽअद्या॑य। आ। द॒धे॒ ॥५॥


    स्वर रहित मन्त्र

    भूर्भुवः स्वर्द्यौरिव भूम्ना पृथिवीव वरिम्णा तस्यास्ते पृथिवि देवयजनि पृष्ठेग्निमन्नादमन्नाद्याया दधे ॥


    स्वर रहित पद पाठ

    भूः। भुवः। स्वः। द्यौरिवेति द्यौःऽइव। भूम्ना। पृथिवीवेति पृथिवीऽइव। वरिम्णा। तस्याः। ते। पृथिवि। देवयजनीति देवऽयजनि। पृष्ठे। अग्निम्। अन्नादमित्यन्नऽअदम्। अन्नाद्यायेत्यन्नऽअद्याय। आ। दधे॥५॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 5
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - याज्ञिक म्हणत आहे - मी (अन्नाद्याय) भक्षणीय अन्नधान्याच्या प्राप्तीसाठी या अग्नीची स्थापना करीत आहे. ज्याप्रमाणे (भूम्ना) आपल्या ऐश्‍वर्याने तेजाने (द्यौरिव) सूर्य आकाशात चमकत आहे आणि (वरिम्णा) आपल्या सद्गुणांनी (पृथिवीव) ही विशाल भूमी सुशोभित आहे, त्याप्रमाणे (ते) प्रत्यक्ष दिसणार्‍या अग्नीत अथवा (तस्या:) अप्रत्यक्ष असून आकाशयुक्त लोकांत राहणार्‍या अग्नीत (देवयजनि) जेथे देव म्हणजे विद्वज्जन यज्ञ करतात, त्या (पृथिवी) भूमीच्या (पृष्ठे) पाठीवर (मू:) भूमी (भुव:) अन्तरिक्ष आणि (स्व:) दिव म्हणजे प्रकाशरूप सूर्यलोक या सर्वांत राहणार्‍या आणि (अन्नादम्) यव आदी सर्व अन्नांचे भक्षण करणार्‍या (अग्निम्) भौतिक अग्नीची मी (आदधे) (वेदीत किंवा यज्ञकुंडात) स्थापना करीत आहे. ॥5।

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकाराचा दोन वेळा प्रयोग केला आहे. (भूम्ना घौरिव आणि वरिम्णा पृथिवीव) मंत्रात सांगितले आहे की हे मनुष्यांनो, परमेश्‍वराने तीन्ही लोकांवर उपकार करण्यासाठी सूर्याची निर्मिती केली आहे व उत्तमोत्तम गुण देऊन पृथ्वीला अलंकृत केले आहे. या सूर्यलोक आणि भूमिलोकामधे सर्व कार्यांच्या सिद्धतेकरिता अग्नी दिला आहे. हे मनुष्यांनो, तूम्ही या अग्नीचा यज्ञादीद्वारे उत्तम उपयोग करा. ॥5॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top