Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 9
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्निसूर्यो देवते छन्दः - पङ्क्ति,याजुषी पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    2

    अ॒ग्निर्ज्योति॒र्ज्योति॑र॒ग्निः स्वाहा॒ सूर्यो॒ ज्योति॒र्ज्योतिः॒ सूर्यः॒ स्वाहा॑। अ॒ग्निर्वर्चो॒ ज्योति॒र्वर्चः॒ स्वाहा॒ सूर्यो॒ वर्चो॒ ज्योति॒र्वर्चः॒ स्वाहा॑। ज्योतिः॒ सूर्यः॒ सूर्यो॒ ज्योतिः॒ स्वाहा॑॥९॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒ग्निः। ज्योतिः॑। ज्योतिः॑। अ॒ग्निः। स्वाहा॑। सूर्य्यः॑। ज्योतिः॑। ज्योतिः॑। सूर्य्यः॑। स्वाहा॑। अ॒ग्निः। वर्च्चः॑। ज्योतिः॑। वर्च्चः॑। स्वाहा॑। सूर्य्यः॑। वर्च्चः॑। ज्योतिः॑। वर्च्चः॑। स्वाहा॑। ज्योतिः॑। सूर्य्यः॑। सूर्य्यः॑। ज्योतिः॑। स्वाहा॑ ॥९॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्निर्ज्यातिर्ज्यातिरग्निः स्वाहा सूर्यो ज्योतिर्ज्यातिः सूर्यः स्वाहा अग्निर्वर्चा ज्योतिर्वर्चः स्वाहा सूर्यो वर्चा ज्योतिर्वर्चः स्वाहा ज्योतिः सूर्यः सूर्यो ज्योतिः स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्निः। ज्योतिः। ज्योतिः। अग्निः। स्वाहा। सूर्य्यः। ज्योतिः। ज्योतिः। सूर्य्यः। स्वाहा। अग्निः। वर्च्चः। ज्योतिः। वर्च्चः। स्वाहा। सूर्य्यः। वर्च्चः। ज्योतिः। वर्च्चः। स्वाहा। ज्योतिः। सूर्य्यः। सूर्य्यः। ज्योतिः। स्वाहा॥९॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 9
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (अग्नी) परमेश्‍वर (स्वाहा) पदार्थामुळे व वन्त करणारी म्हणजे वेदविद्या त्या विद्येला (जेति) विज्ञानाच्या प्रकाशाशी संयुक्त करून सर्व मनुष्यांच्या कल्याणासाठी देतो. (ज्ञान आणि विज्ञान मनुष्यांना देतो) तसेच (अग्नी) भौतिक अग्नी (ज्याति:) शिल्पविद्येचे ज्ञान प्रकाशित करतो, मनुष्यास अनेक लाभ देतो. (सुर्य:) चराचर जगाचा आत्मा तो परमेश्‍वर (ज्योति:) सर्वांचा आत्म्यामधे ज्ञानाचा प्रकाश करून व सर्व विद्यांची प्रेरणा करून उपदेश करतो की (स्वाहा)जो जमान माणसांच्या हृदयात आहे, तोच वाणीत असावा. (सूर्य:) आपल्या प्रकाशाद्वारे सर्वांचा जो प्रेरक हेतू आहे, तो सूर्य (ज्योति:) आमच्यासाठी मूर्तिमान द्रव्यांना प्रकाशित करतो (व त्या प्रकाशामुळे आम्ही सर्व पदार्थ पाहू शकतो) (अग्नी) सर्व विद्यांचा दाता परमेश्‍वर मनुष्यांकरिता (वर्च्च:) सर्व विद्यांचे प्रकाशक जे, वेद त्या चार वेदांना प्रकट करतो (ज्योती) विद्युत रूपाने शरिरात आणि ब्रह्मांडात वाहणारा अग्नी (वर्च्च:) विद्या (शिल्पविद्या) आणि वृष्टीचे कारण आहे. (सूर्य) सत्यविद्यांचा प्रकाश करणारा जगदीश्‍वर सर्व माणसांसाठी (स्वाहा) वेदवाणीद्वारे (वर्च:) समस्त विद्यांचा प्रकाश करतो आणि (ज्योति:) विद्युत, सूर्य आणि अग्नी या तेजोमय पदार्थांचा प्रकाश सर्वांसाठी देतो. (सूर्य:) सूर्यलोक देखील (वर्च्च:) शारीरिक आणि आत्मिक बळ प्रदान करतो. (सूर्य:) प्राणवायू (वर्च्च:) सर्व विद्यांचा प्रकाशक अशा ज्ञानास वृद्धिगत करतो आणि (ज्योति:) प्रकाशस्वरूप जगदीश्‍वर योग्य व चांगल्याप्रकारे यज्ञाग्नीत आहुत पदार्थांचा त्याने निर्मित केलेल्या पदार्थात स्वसामर्थ्याने मिश्रण करून त्यांना फैलावतो तोच अग्नीरूप परमात्मा सर्व मनुष्यांचा एकमेव उपास्य देव आहे आणि भौतिक अग्नी कार्यसिद्धीचे साधन आहे. ॥9॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात ‘स्वाहा’ शब्दाने जो अर्थ घेतला आहे, तो निरूक्तकाराने सांगितलेला पद्धतीप्रमाणे आहे. ईश्‍वराने आपल्या रचना-सामर्थ्याने अग्नीसह सर्व जगाची उत्पत्ती केली आहे. जगाला प्रकाशित वा व्यक्त केले आहे. सर्व पदार्थामधे केवळ अग्नीच असा आहे की जो स्वयं प्रकाशित असून अन्य सर्व पदार्थांना प्रकाशित करतो. त्याचप्रमाणे सूर्य म्हणजे परमेश्‍वर वेदांद्वारे सर्व विद्यांचा प्रकाश देतो, ज्ञान प्रकट करतो. तसेच अग्नी आणि सूर्य हे दोन्ही देखील शिल्प विद्येचे ज्ञान देतात. ॥9॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top