Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 49
    ऋषिः - और्णवाभ ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    पू॒र्णा द॑र्वि॒ परा॑ पत॒ सुपू॑र्णा॒ पुन॒राप॑त। व॒स्नेव॒ वि॒क्री॑णावहा॒ऽइ॒षमूर्ज॑ꣳ शतक्रतो॥४९॥

    स्वर सहित पद पाठ

    पू॒र्णा। द॒र्वि॒। परा॑। प॒त॒। सुपू॒र्णेति॒ सुऽपूर्णा। पुनः॑। आ। प॒त॒। वस्नेवेति॑ व॒स्नाऽइ॑व। वि। क्री॒णा॒व॒है॒। इष॑म्। ऊर्ज॑म्। श॒त॒क्र॒तो॒ऽइति॑ शतऽक्रतो ॥४९॥


    स्वर रहित मन्त्र

    पूर्णा दर्वि परा पत सुपूर्णा पुनरा पत । वस्नेव वि क्रीणावहा इषमूर्जँ शतक्रतो ॥


    स्वर रहित पद पाठ

    पूर्णा। दर्वि। परा। पत। सुपूर्णेति सुऽपूर्णा। पुनः। आ। पत। वस्नेवेति वस्नाऽइव। वि। क्रीणावहै। इषम्। ऊर्जम्। शतक्रतोऽइति शतऽक्रतो॥४९॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 49
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (दर्विः) होम करण्यास योग्य असे पक्व पदार्थांचे ग्रहण करणारी व (पूर्णा) उपकारक द्रव्यांनी परिपूर्ण अशी आहुती (परापत) हा हवन केलेल्या पदार्थांच्या अंशांना वर पाठविते अथवा ती आहुती आकाशात जाऊन दृष्टिजलाने (सुपूर्णा) परिपूर्ण होते. (पुनरापत) पुन्हा ती आहुती भूमीला उत्तम जलरूप रस देते. (शतक्रतो) असंख्य कर्म करणारे व असीम प्रज्ञेचे स्वामी हे जगदीश्‍वर, आपल्या कृपेने यज्ञ संपन्न करविणारा मी विद्वान होता आणि करणारा विद्वान यजमान, आम्ही दोघे (इषम्) उत्तमोत्तम अन्नादी पदार्थांची (ऊर्जम्) पराक्रमयुक्त वस्तूंचे ग्रहण करू (वस्नेव) वैश्य वा व्यापारी व्यवहाराप्रमाणे (विक्रीणावहै) देवाणघेवाण करू. (आम्ही यज्ञाग्नीत हव्य पदार्थांची आहुती देत राहू व त्याचे प्रतिदान म्हणून वृष्टिजल घेत राहू) ॥49॥

    भावार्थ - भावार्थ -या मंत्रात उपमा अलंकाराचा वापर केला आहे. जेव्हां मनुष्यगण अग्नीत सुगंधीयुक्त पदार्थांची आहुती देतात, तेव्हां त्या वस्तू आकाशात वर जाऊन वायु आणि वृष्टीजलास शुद्ध करतात आणि पुन्हा जलरूपाने भूमीवर येतात. त्यामुळे यव आदी औषधी शुद्ध होतात, सुखकारक व शक्तीदायक होतात. ज्याप्रमाणे वैश्य (व्यापारी) जन रूपया देतात-घेतात आणि अनेक प्रकारच्या अन्न आदी पदार्थ विकत घेतात आणि विकतात. त्याप्रमाणे आम्ही याज्ञिकजन देखील यज्ञाग्नीमधे शुद्ध द्रव्यांचे हवन करून मोबदला म्हणून पाऊस व अनेक सुख विकत घेतो. त्या वस्तू विकत घेऊन वृष्टी आणि सुख प्राप्त करण्यासाठी पुन्हा त्या वस्तूंचे अग्नीत हवन करतो. (याप्रकारे आदान-प्रदानाची ही क्रिया चालू राहते) ॥49॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top